Posts

Showing posts from 2019

डिसेंबरमधील जिलेबी

सर्व रसिक वाचकांना २०१९ या वर्षातील शेवटची पोस्ट ही बालपणीच्या आठवणीत रमणार करणारी असावी या उद्देशाने लिहित आहे. प्रत्येकाला बालपणीत भटकंती करावीशी वाटते. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी वेगवेगळ्या असल्यात तरी सर्वांचे बालपण अनेक गंमतीजमतीनी बहरलेले असते. चांगल्या वाईट अशा घटनांनी आपले जीवन व्यापलेले असते.  चला, आज वर्षाच्या शेवटी आपल्या बालपणात भटकंती करून नवीन वर्षात नव्या उमेदीने भटकंती करण्याचा निश्चय करू या. डिसेंबरमधील जिलेबी   डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा वर्षाचाही शेवटचा आठवडा आणि नाताळची धूम घेऊन येणारा आठवडा . कुणाला हा आठवडा ख्रिसमसच्या केकची आठवण करून देतो तर कुणाला सांताक्लॉजची सुंदर भेटीची आठवण करून देणारा असतो तर कुणाला चांगल्या वाईट क्षणांची आठवण करून देणारा असतो तर मला मात्र हा आठवडा गरमागरम जिलेबीची आठवण करून देत असतो .              आम्ही लहान असताना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आमची आई आम्हांला सर्वांना सकाळी सात वाजताच गरमागरम जिलेबी बनवून पोटभर खाण्यास दयायची . आम्ही चोघे बहीण भाऊ आणि दोन चुलत...

मनमोहक - दोनापावला बीच

Image
  मनमोहक - दोनापावला बीच                              गोवा म्हणताच डोळ्यांसमोर निळाशार समुद्र, उंचच उंच ताडामाडाची झाडे, आंब्या - फणसांची झाडे असे चित्र तरळून जाते. गोव्यातील समुद्रकिनारे म्हणजे संपूर्ण जगाचे दर्शन घडविणारे ठिकाण होय. गोव्याचा समुद्रकिनारा चित्रकाराला जसा आव्हान देतो, तसाच तो कवींनाही कविता लिहिण्यास भाग पाडीत असतो, तर छायाचित्रकाराला नवनवीन वेगवेगळ्या पोझ द्यायला नेहमीच तयार असतो. अनेक रंगगंधांचा समसमा संयोग जर कुठे होत असेल तर तो म्हणजे गोव्याच्या भूमीत.              गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याला समुद्रकिनारा किंवा चौपाटी म्हणणे तसे प्रशस्त वाटत नाही. कदाचित हा तेथील वातावरणाचाच  एक भाग असावा. गोव्यातील समुद्रकिनाऱ्याला 'बीच' म्हणणेच योग्य होय. हे तेथील वातावरण पाहिल्यावर जाणवल्याशिवाय राहत नाही. इंग्रजी भाषेतील एकाच शब्दाचा उच्चार किती प्रकारे कानांवर पडेल हे मोजायचे असेल तर त्यासाठी गोव्यातील बीच नक्कीच पायदळी तुडवावेत तरच ते लक्षात...

माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे

माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे मैत्रिणींचे फोन आलेत की सगळ्यांचे उद्गार असतात,"कालच तर तू नाशिकला होतीस नि आज वर्ध्याला पोहचली पण." पुन्हा पंधरा दिवसांनी मैत्रिणींचे फोन आलेत की, त्या हसतच म्हणतात, "वर्ध्यालाच आहेस की झाली पसार." मग मी म्हणते, " पसार व्हायला मी काय दरोडेखोर वाटली का तुम्हांला!" मैत्रिणी हसतच म्हणतात, "तुझा काही भरवसा नाही. एखादी लायब्ररी लुटली नाही म्हणजे झालं." मग त्यांना सांगावं लागतं आता मी लायब्ररीतून पुस्तके आणणेच बंद केले. वाटते तेव्हा पुस्तक विकत घेऊन वाचते त्यामुळे लायब्ररी सुरक्षित आहे. काळजी नका करू." मग मी हळूच सांगते कालच वर्ध्याहून पुण्याला आली." आता मी पुण्याला असल्याची बातमी सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहचलेली असते नि मग पुन्हा चार-पाच दिवसांनी दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतो तर मी तेव्हा नेमकी साक्री किंवा धुळ्याला असते नि मग ती मैत्रीण सर्व मैत्रिणींना लाईव्ह टेलिकास्ट देऊन मोकळी होते मग त्यातल्या दोघी-तिघींचे फोन येतात, " आम्हांला माहीत नाही यावेळेस तू ट्रीपला आलंच पाहिजे."         दुसरी मैत्र...

परीक्षार्थी

Image
                      परीक्षार्थी            नाशिकहून पुण्याची घरगुती भटकंती नि त्या भटकंतीतील परीक्षा घेणारा व पाहणारा दिवस.              एखादा दिवस आपली परीक्षा पाहणारा व आपल्यातलं सगळं धैर्य व सहनशीलतेचा कस पाहणारा ठरतो. असाच आजचा दिवस १९ नोव्हेंबर २०१९चा! १३ नोव्हेंबरला मुलगा एक महिन्यासाठी यूकेला गेला नि इकडे पुण्याला सूनेचा आठ दिवसांनी एका कंपनीत इंटरव्ह्यू असल्यामुळे मला पुण्यालाच थांबावे लागले. मी पुण्याला आली म्हणून सासूबाईंना पुतण्याकडे ठेवले. मी पुण्यात आल्यावर दोन दिवसांतच सासूबाई पडल्यात नि त्यांना कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक्स-रे, गोळ्या औषधे दिलीत पण काल त्यांच्या बोलण्यावरून जाणवले की त्यांना त्रास होत आहे आणि माझी कमी जाणवते आहे. पती महाशयांनाही आठ दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था. त्यातच मला अपरिचित असणाऱ्या व्यक्तीने पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केलेले अर्थात त्यांना मी कळविले...

रसिकांशी हितगूज

रसिकांशी हितगूज         नमस्कार रसिक वाचक, 'माझी भटकंती' हा ब्लॉग भटकंती विषयक अनुभवांवर तर आहेच पण त्याचबरोबर समाजातील व निसर्गातील इतर घटकांविषयी ही भटकंती घडवून आणणारा आहे. यात कौटुंबिक नातेसंबंधातील भटकंती आहे, सामाजिक विषयांची भटकंती आहे तशीच नैसर्गिक भटकंतीही घडवणारी आहे. वाचकांना ज्या विषयात रूची आहे त्यानुसार ते ब्लॉगवरील लेखन वाचू शकतात.            जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी बांधवांना माय मराठीची भेट घडवून आणणे नि त्यांची नाळ मराठी मातीशी घट्ट राहावी याच उद्देशाने मला ब्लॉग लिहण्यास प्रेरणा मिळत असते. मराठी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्यांची संख्या कमी आहे नि त्यातही ब्लॉगविषयी तांत्रिक अडचणी सांगणारी अनुभवी व्यक्ती नसल्यामुळे स्वतःच शिकत नि मुलगी व सूनेचं डोकं खाऊन चाचपडत चालणारी माझी ही वाट आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळे सुखावह होत आहे याचा आनंद वाटतो. धन्यवाद रसिक वाचकांनो! ब्लॉगर, ज्योत्स्ना पाटील

साहित्य आणि कला

नमस्कार रसिक वाचक, ब्लॉगची सेटींग्ज चेंज झाल्यामुळे अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया सेंड होत नाहीत पण आपण व्हाट्सएपवर प्रतिक्रिया पाठवून कळविले त्याबद्दल मनापासून धन्यवाद!  आता प्रतिक्रिया देताना तुमचा ई-मेल आयडी, पासवर्ड टाकल्यावर म्हणजेच लॉग इन केल्यावरच प्रतिक्रिया पोस्ट होत असते. तसदीबद्दल क्षमस्व. साहित्य आणि कलेतून मी काय मिळविते?                २००४ साली 'प्रतिबिंब मासिकाने एक लेखस्पर्धा आयोजीत केली होती. स्पर्धेचा विषय होता 'साहित्य आणि कलेतून मी काय मिळवतो?' मला स्पर्धेतला 'मिळवतो' हा शब्दच खटकला की अरे मिळवतो म्हणजे या स्पर्धेत स्रियांनी भाग घ्यायचा की नाही. पुल्लिंगी क्रियापद कदाचित स्पर्धा घेणाऱ्यांच्या लक्षात आले नसावे! असो, ही स्पर्धा नक्कीच स्त्री-पुरूष दोघांसाठी असावी असा विचार करून लेख लिहिला नि दिला पुण्याच्या पत्त्यावर पाठवून. स्पर्धेसाठी लिहिलेला लेख पोस्टाने पाठवून दिला नि त्यानंतर मी विसरूनही गेले नि जवळजवळ पाच-सहा महिन्यांनी एक मासिक माझ्या पत्त्यावर आले नि बघते तर काय? माझ्या लेखाला द्वितीय पारितोषिक मिळाले ...

रूटस्

                     रूटस्           जीवनाची पाळंमुळं किती खोलवर रूजलेली असतात याचे प्रत्यंतर मला बालमैत्रीण निलिमा हिने पाठविलेल्या व्हीडिओज् पाहताना प्रकर्षाने जाणवले.       लंडनजवळ ग्लॉस्टर शहरात राहणाऱ्या मैत्रिणीने दिवाळीच्या पार्टीचे फोटोज्, व्हिडीओज् पाठवलेत नि खूप आनंद झाला. माझी बालमैत्रीण निलीमा जोशी कुलकर्णी मागच्याच महिन्यात भारतात येऊन गेली तेव्हा आम्ही मनसोक्त गप्पागोष्टी केल्यात आणि दिवाळीला भारतात येणे शक्य नसले तरी तेथील सर्व भारतीयांनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना मन अभिमानाने भरून आले. माणूस कुठे का जाईना पण तो आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला विसरूच शकत नाही. मला निलिमाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना अचानकपणे चौदा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली 'रूट्स' ही कथा आठवली. बहुतेक ती कथा मोनिका गजेंद्रगडकर यांची असावी. ©ज्योत्स्ना पाटील.

रसिक वाचक

नमस्कार रसिक वाचक, आता माझा ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांमध्ये इंडोनेशिया, फिलिपीन्स येथील वाचकांचीही भर पडली याचा विशेष आनंद होत आहे. मराठी भाषेशी माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांची नाळ किती घट्ट जोडली गेली आहे, याचा अभिमान वाटतो. मराठी भाषेत ब्लॉग लिहून माय मराठीची सेवा करण्यात खारीचा वाटा उचलता आला नि माझ्या लिहण्याचे सार्थक झाले. असो, सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद नि जाता जाता महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर एक चारोळी, पक्षाला बहुमत नसता सारे बांधावर धावले हातात जुडी असता सारे कास्तकार झाले ©ज्योत्स्ना पाटील.

कौटुंबिक आठवणी

कौटुंबिक आठवणी मागील वर्षाच्या दिवाळीच्या आठवणी खैरनार पाटील परिवार कधीच विसरू शकत नाहीत. मागच्या वर्षी दिवाळी साजरी करताना कुणालाच वाटले नव्हते की, आमच्या कुटुंबातील एक सदस्य या वर्षाच्या दिवाळीत नसणार. काळाची चक्र केव्हा, कशी फिरतील ते कधीच कुणी सांगू शकत नाही. आम्ही सर्वजण दिवाळीत धमाल करीत असताना आमचे रावसाहेब सोफ्यावर बसून शांतपणे सर्वांचे निरीक्षण करीत बसले होते. त्यांना तसे बसलेले पाहून वाटते की त्यावेळी त्यांच्या मनात कोणते विचार चालले असतील. त्यांना वाटत होते का की, मी हे क्षण पुन्हा अनुभवू शकेल की नाही! कसल्या विचारात ते गुंतले होते. त्यांचे तसे शांत राहणे सर्वांनाच त्यावेळी जाणवले होते. आमच्या महाशयांनी दोन-तीनदा विचारले देखील, "रावसाहेब, कसला विचार करीत आहेस?" त्यांनी "काही नाही." एवढेच त्रोटक उत्तर दिले आणि आता वाटते, त्यांच्या मनात काय चालले होते त्यावेळेला? हा प्रश्न आजही मनात येतो नि मन कासावीस करीत असतो. माणसाचं जगणं इतकं क्षणभंगुर असू शकते, या विचारापाशी येऊन मनाला आवरणे कठीण होत असते. हा व्हिडीओ शूट करण्याची मला सुचले कसे याचेही मला आश्चर्य वाट...

रसिक वाचक

नमस्कार रसिक वाचक, माझा ब्लॉग तुम्ही सर्वजण मोठ्या उत्साहात वाचत आहात याचा खूप आनंद होत आहे. आज युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, फिलिपीन्स, स्वित्झर्लंड, पोर्तो रिको, स्विडन,आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन आणि अननोन रिजन येथून वाचक ब्लॉग वाचत आहेत आणि वाचन संस्कृती टिकून आहे याचा विशेष आनंद होत आहे. आज जगभरातल्या भारतीय व महाराष्ट्रीयन वाचकांना घर घ्यायचे असल्यास खालील व्हिडीओ पाहून रूंग्ठा ग्रुपशी संपर्क करू शकता नि आपले स्वतःचे घर योग्य व माफक दरात घेऊ शकता. धन्यवाद रसिकांनो! ©ज्योत्स्ना पाटील.

निसर्गमित्र बनू या!

 चला निसर्गमित्र बनू या! जगात कुठेही जा निसर्ग आपल्याला मोहीनी घालतच असतो. पण आज या निसर्गाला द्रुष्ट लागली ती म्हणजे 'प्लॅस्टिकची'. आज प्लॅस्टिक कमीत कमी वापरण्याचा निश्चय करून घराबाहेर पडताना कापडी पिशवी जवळ बाळगण्याची सवय केल्यास प्लॅस्टिक वापरापासून आपण मुक्त होऊ शकतो. तर चला मग कुठूनतरी सुरवात करू या आणि प्लॅस्टिकला रामराम ठोकून धरणीमातेचे खरे पुत्र (स्त्रीलिंगी, पुल्लिंगी दोन्ही अर्थाने) बनू या.        निसर्गात भटकायला आपल्याला आवडते तर मग निसर्गाला वाचवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, याची जाणीव ठेवून आपापल्यापरीने प्रयत्न करू या.     मी एवढेच आवाहन करते की,     'कापडी पिशवी वापरा       धरणी मातेला सावरा।' ©ज्योत्स्ना पाटील.
नमस्कार रसिक वाचक, आज मला खूप आनंद होत आहे कारण जगभरातल्या वाचकांमध्ये आता स्पेन, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल येथील वाचकही माझा ब्लॉग वाचत आहेत. जेथे माझी पुस्तके पोचू शकत नाहीत तेथे मी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचकांपर्यंत माझे विचार पोचवू शकते याचा आनंद अधिक आहे. वाचकांचे प्रेम असेच लाभत राहो, हीच इच्छा.        सर्व रसिक वाचकांना मनापासून धन्यवाद! ब्लॉगर, ज्योत्स्ना पाटील. नाशिक, महाराष्ट्र.

धन्यवाद स्क्रिनशॉट

                    धन्यवाद स्क्रिनशॉट          शीर्षक वाचून गोंधळलात ना! आपण चुकीचे तर वाचत नाही ना! असेही क्षणभर वाटले असणार किंवा लेखिकेनेच काहीतरी चुकीचे टाईप केले असेल, कदाचित नजरचुकीने टाईप झाले असणार पण असे काहीच नाही. तुम्ही योग्यच वाचले आणि मीदेखील योग्यच टाईप केले आहे. जीवनात कोणत्या गोष्टीचा कुठे संदर्भ लागेल आणि काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. चला तर मग, तुमच्याही जीवनात कधी असा प्रसंग उद्भवला तर तंत्रज्ञानाचा योग्य कामासाठी उपयोग कसा करायचा ते नक्कीच कळेल तुम्हांलाही!           मला नेहमीच निसर्गातल्या   सर्वच सजीव निर्जीव घटकांविषयी कृतज्ञता वाटत असते. आज मी तंत्रज्ञानाविषयीही कृतज्ञ आहे. कारण तंत्रज्ञानामुळे खूप गोष्टींची विश्वासार्हता जोखून पाहणे सहज शक्य झाले आहे. माणूस एकवेळ खोटं बोलेल पण तंत्रज्ञानामुळे सत्य जोखून पाहणे माणसाला सहज शक्य झाले आहे. असाच एक अनुभव.             मला एका व्यक्तीने सांगितले की, "अमुक ए...

तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....

Image
   चला, आज थोडी वेगळ्या वाटेने म्हणजेच निसर्गासोबत तेही घरातल्याच निसर्गासवे भटकंती करून येऊ या!         तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....!              पुणे व बारामती येथे १९ ऑगस्ट २०११ ला गेलो होतो. दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑगस्ट २०११ ला सायंकाळी साडे सात वाजता घरी पोहचलो. घरी येताच सर्वांना चहा करण्याकरिता मी किचनमध्ये येताच किचनच्या खिडकीसमोर खूप मोठा काळ्या आकाराचा डोंगरच चिकटलेला दिसला. त्या डोंगराला पाहताच प्रथम मी घाबरलेच. अरे बाप रे! हे काय लागले आहे आपल्या घराला असे वाटून जास्तच घाबरले नि आमच्या महाशयांना जोरात आवाज दिला, "पाटील साहेब इकडे या. हे बघा काय आहे येथे!" असे म्हणत मी बारकाईने पाहिले तर मधमाश्यांनी पोळं बनविण्यास सुरवात केली होती. हजारो मधमाश्यांना एकाच जागी आणि तेही इतक्या जवळून पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. दोनच दिवसांत हजारो मधमाश्या कुठून आणि कशा आल्यात? या प्रश्नाने डोक्यात चांगलेच थैमान घातले होते. छताला चिकटलेल्या या मधमाश्यांनी उलटा डोंगरच माझ्या डोळ्यांपुढे तयार करून ठेवला आणि जणुका...
सर्व रसिक वाचकांना नमस्कार. साहित्यिक कामाच्या व इतर कामांच्या गडबडीत बऱ्याच दिवसांपासून लेख पोस्ट करू शकले नाही त्याबद्दल नियमितपणे ब्लॉग वाचणाऱ्या रसिकांची माफी मागते. आजपासून आठवड्यातून एक लेख पोस्ट करण्याचा प्रयत्न करून वाचकांना वाचनानंद देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद! लेखिका, ज्योत्स्ना पाटील.

​​ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला

देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना, ज्योत्स्नाचा नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून पोस्ट टाकली नाही म्हणून काही वाचकांनी फोन करून तर काही वाचकांनी मेसेज करून विचारणा केली तेव्हा खूप आनंद झाला कारण वाचन-संस्कृती टिकून आहे. असो,  चला तर मग आज अशाच एका किल्ल्याची सैर करू या. ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली असेल त्यांनी आपल्या स्मृतींना उजाळा देऊन आनंद घ्यावा नि ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली नसेल त्यांनी कल्पनेनेच तेथे जाऊन सैर करण्याचा आनंद लुटावा हाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू। चला, तर मग एक फेरफटका गोव्याला मारून येऊ या                                           ​​ ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला                गोवा म्हणताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो समृध्द निसर्ग आणि तेही समुद्राची गाज घेऊनच. समुद्राने गोव्याला फक्त बीचच दिले असे नव्हे तर तेथील लोकांना व्यवसाय आणि भरभरून अर्थसंपत्तीही बहाल केली आहे. गोव्याचे अर्थकारण नेहमीच भरभ...
श्रीजाचे जावळ नि आमच्या गप्पा आठ दिवसांपूर्वी दिपश्रीला फोन केला असता आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मला नेमकी तिच्या छोट्या मैत्रिणीची आठवण आली नि मी तिला विचारले, "तुझी टिल्लू, काय म्हणते?" असे विचारताच दिपश्री उत्साहाने म्हणाली, "अहो आई, तिचे जावळ काढले तर ती आता खूपच वेगळी दिसते. आधी ती किती छान दिसायची नि आता तिचे केस काढलेत तर खूपच वेगळी दिसते. बाळ लहान असतानाच बाळाचे जावळ काढायला हवे." तिचे श्रीजाच्या जावळाविषयीचे बोलणे ऐकताच मला हसूच आले. दोन तीन महिनाचे बाळ किती नाजूक असते नि त्यात बाळाला पुरेसे जावळ न येताच बाळाच्या कोवळ्या डोक्यावर कैची चालवणे शक्य तरी होईल का? "अगंबाई, बाळ बसायला लागल्यावर आणि त्याच्या डोक्यावर एक वर्षानंतरच बाळाचे जावळ काढतात." मग काय बाईसाहेब स्वतःच्या जावळ काढण्याच्या कल्पनेवर स्वतःच हसायला लागल्या. "श्रीजा जावळ काढताना रडली होती का गं?" मी असे विचारताच ती पुन्हा हसायला लागली. "आमचे हे नव्हते का, श्रीजाच्या पप्पांना मार्गदर्शन करायला. अहो आई हे सुमीतला इतके भारी सांगत होते की जसे काही चार-पाच पोर...

एक शाम चाओ प्राया के नाम

Image
सर्व रसिक वाचकांना, सप्रेम नमस्कार.  माझे दोन्ही ब्लॉग नियमितपणे वाचणाऱ्या वाचकांमध्ये आता इतर देशातील वाचकांबरोबरच पोर्तुगाल, फिलिपिन्स, जपान, जर्मनी या देशातील वाचकही ब्लॉग वाचत आहेत याचा विशेष आनंद होत आहे. देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना मी मनापासून धन्यवाद देते! तुम्हां सर्वांमुळे मला लिहिण्यास प्रेरणा मिळत असते त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे.              माझ्या लेखातील न आवडणाऱ्या किंवा खटकणाऱ्या बाबींविषयी वाचकांनी आपली मते अवश्य कळवावीत कारण मला माझ्या लेखनातील त्रुटी जाणून घेण्यास वाचकांच्या मतांची नक्कीच मदत होईल. आशा करते की आपल्या सर्वांचे प्रेम व मार्गदर्शन मला नेहमीच मिळत राहील . ब्लॉगर, सौ. ज्योत्स्ना पाटील                                                     ​​   एक शाम चाओ प्राया के नाम           ...

कालाय तस्मै नमः

                  कालाय तस्मै नमः              ​​   ​​ प्रवासाला निघाल्यावर कोण भेटेल आणि काय होईल हे सांगणे तसे कठीणच. आम्ही बँकॉकला जायला निघालो असता, आमचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे उत्सुकता होतीच आणि इतरांनी विमान टेक ऑफ होताना छातीत धडधड होते,  भीती वाटते वगैरे बरेच काही काही सांगितले मी मात्र शांत कारण बऱ्याच मोठमोठ्या राईडसवर बसल्यामुळे हवेतल्या सगळ्या हेलकाव्यांचे अनुभव असल्यामुळे विमान प्रवासात फार काही विशेष नसावे अशी मनातल्या मनात कल्पना केलेली होती त्यामुळे मला मात्र विमानात बसल्यावर काहीही थ्रिल वगैरे वाटले नाही पण ढगातून विमान जात असताना मात्र असे वाटत होते की आपल्या आजूबाजूला बर्फ आहे की कापूस! आधीच मला  पांढऱ्याशुभ्र रंगाचे नको तितके वेड आणि त्यात सर्वत्र पांढऱ्या रंगाची शुभ्र नैसर्गिक शाल पाहून असे वाटत होते की विमानाबाहेर सरळ उडी घ्यावी आणि ही पांढरीशुभ्र शाल लपेटून घ्यावी किंवा या ढगातून भन्नाट पळत सुटले तर काय होईल असे वाटून मन कुठल्याकुठे भरक...

पाऊस

                        पाऊ स             नमस्कार रसिक वाचक, बाहेर पाऊस पडत आहे तर मग भटकंती करायलाच हवी ना! चला तर मग आपापला पाऊस अनुभवू या. कुणाला गावाकडचा पाऊस खुणावतो, कुणाला पावसातली फजिती तर कुणाला प्रियकर प्रेयसी सोबतचा पाऊस आठवतो तर बळीराजाला त्याच्या कारभारणी सोबत रानातला पाऊस आठवतो. मला मात्र पावसाच्या पाण्यात मनसोक्त हुंदडणारे बालपण लाभले म्हणून पाऊस म्हणजे चैतन्याचा खराखुरा महासागर होय या महासागरात प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार उडी मारून आनंदाचे मोती गोळा करावेत त्याचसाठी हा लेखप्रपंच.          समोर पाऊस पडताना दिसतो परंतु हा पाऊस माझ्या मनाला कधीच स्पर्श करीत नाही. मनाला स्पर्श न करणारा असा हा शहरातला पाऊस देखील मला शहरासारखाच उपरा भासतो. शहरातला पाऊस देखील कर्तव्य म्हणूनच शहरात पडत असतो. तो देखील शहरात येतांना आपुलकी विसरूनच येत असतो. त्यालाही ठाऊक असते येथे अंकुरण्यासाठी आहेच काय! काँक्रिटच्या भिंतीवरून घरंगळून गटारीच्या पाण्यातच मिसळायचे आहे. त...

वाघ आजी

      नमस्कार रसिक वाचकांनो, चला, आज फिलिपिन्स देशातूनही वाचक ब्लॉग वाचत आहेत याचा आनंद वाटतो. वाचन संस्कृती टिकून राहणार यावरचा विश्वास अधिक द्रुढ होत आहे. आजची भटकंती ही आपल्याच जवळच्या माणसांमध्ये करू या नि स्वतःलाही पुन्हा नव्याने तपासून पाहू या की, आपल्यातलं माणूसपण कितपत जीवंत आहे. आपणच आपापल्या फूटपट्टीने तपासून पाहू या.                                                          आमच्या वाघ आजी           वीस वर्षांपूर्वी नाशिकला मेरी येथे राहायला आलोत. आमच्या 'राजमती' बिल्डिंगमध्ये वाघ साहेब आणि त्यांचे कुटुंब तळमजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहायला आले. त्यांच्या कुटुंबात दोघे पती-पत्नी, दोन मुले व व्रुद्ध आई होती. आम्ही सर्वजण वाघ साहेबांच्या आईला 'वाघ आजी'म्हणायचो. सकाळ झाली की आंघोळ करून चहापाणी घेतले की वाघ आजी ओट्यावर बसायच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी दोन शब्द बोलायच्या. त्यांचे दोन शब्द ...

हँडमेड कुस्करा

Image
नमस्कार रसिक वाचक,  आजची भटकंती आपण महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत करू या. त्याचबरोबर घरघरातील नातेसंबंधातही फेरफटका मारून येऊ या आणि   माझ्या लेखन प्रवासात साथ देणाऱ्या वाचकांनाही भेटू या. या एकाच लेखात तुम्हांला वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करण्याचा आनंद नक्कीच मिळेल. अशी मला आशा आहे. जिच्यावर हा लेख लिहिला ती आज एकवीस वर्षांची झाली पण तिचे बालपण आजही डोळ्यांसमोर नाचत आहे, बागडत आहे. आजचा लेख माझी पुतणी चि. सायली खैरनार हिच्यासाठी       हॅण्डमेड कुस्करा                 माझी पुतणी चार वर्षांची होती तेव्हा ती प्रथमच एकटी आमच्यासोबत नाशिकला आली होती. दीर व जाऊ तिला आमच्यासोबत पाठवायला तयार नव्हते. त्या दोघांना भीती वाटत होती की ती रात्री झोपताना रडेल व आम्हांला त्रास देईल. माझ्या पुतणीने आमच्याबरोबर येण्याचा हट्ट करताच आम्ही तिला आईबाबांच्या आठवणीने रडणार नसशील तरच आम्ही तुला नाशिकला नेऊ, अशी अट घालताच बाईसाहेब एकदम खूष. शेवटी आम्ही दीर व जावेला राजी केले नि तिची बॅग भरायला सांगितले. त्या दोघांना त...

स्वयंचलित कॅमेरा

Image
   स्वयंचलित कॅमेरा                                        जून १९८९ मध्ये मी व माझे पती काश्मीरला जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग करून प्रवासाच्या तयारीला लागलो . आमची तयारी चालू असतानाच नुकतीच ओळख झालेले सुजय दोडल आमच्या घरी आले व त्यांनी विचारले , " कसली धावपळ चालू आहे ." आम्ही काश्मीरला चाललो म्हणून थोडीशी तयारी चालू आहे . त्यांनी कधी व कशाने चाललो याविषयी विचारपूस केली . माझे पती म्हणाले , " बऱ्यापैकी तयारी झाली आता फक्त माझा कॅमेरा खूप जुना आहे त्यामुळे एक नवीन कॅमेरा तेवढा घ्यायचा आहे . कॅमेराचे  नाव काढताच दोडल साहेब म्हणाले , " कॅमेरा कशाला विकत घेता ? मी आताच नवीन कॅमेरा घेतला आहे तोच घेऊन जा ." दोडल साहेबांनी असे म्हटल्यावर आम्ही नवीन कॅमेरा न घेता त्यांचाच कॅमेरा घेऊन जायचे ठरवले पण जेव्हा दोडल साहेबांनी कॅमेरा आणून दिला तेव्हा तो न्यावा की नेऊ नये असा पेच पडला कारण त्यांचा कॅमेरा हा खूप किंमती होता . त्यांनी दिलेला तो महागडा कॅमेरा बिघडला किंवा हरवला तर...

गोव्याचा निसर्ग

गोव्याचा निसर्ग              गोवा म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारं, तरुणांना वेडं करणारं, नवविवाहितांना धुंद करणार, तुम्हां - आम्हां सर्वांना नैसर्गिक सुख लुटू देणारं असं हे गोवा सदा चिरतरूण.              गोवा म्हटले की उंचच उंच ताडामाडाची झाडे, आंब्या-फणसाची झाडे व सोबतच समुद्रकिनारा डोळ्यांसमोरून तरळून जातो. गोव्याचा निसर्ग चित्रकाराला आव्हान देतो तसाच तो कवींनाही कविता लिहिण्यास भाग पाडीत असतो तर फोटोग्राफरला नवनवीन पोझ देत असत.               'माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले'                या बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळींचा खरा अर्थ जाणून घ्यायला गोव्यातच जायला हवे . आपल्याकडे हिरव्यागार पानांमध्ये पांढऱ्या रंगांची उधळण करीत फुलणारा बहारदार चाफा पाहण्याची डोळ्यांना सवय तेथे पाने नसलेला चाफा पाहून आश्चर्य वाटते . चाफ्याच्या झाडाला पानांचे जणूकाही वावडेच असावे . फक्त फुलांचे गुच्छ पाहून वाटते की हे गुच्छ झा...