Posts

Showing posts from December, 2018

हरवलेल्या बॅगेला धन्यवाद

हरवलेल्या बॅगेला धन्यवाद                           चि. स्वप्नील व दीपश्री दोघेही १२ डिसेंबर २०१८ ला स्वीडनला जाण्यासाठी मुंबईहून सकाळी दहा वाजता विमानाने निघालेत नि कार्गोमध्ये चार बॅग्ज टाकून दोन बॅग्ज त्यांनी स्वतःजवळ ठेवल्यात. रात्री साडेबाराला (भारतीय वेळेनुसार) स्टॊकहोमला पोहचले असता कार्गोने आलेल्या चार बॅगांपैकी फक्त तीनच बॅग्ज मिळाल्यात नि एक बॅग काही मिळाली नाही तेव्हा त्यांनी एअरपोर्टवर नियमानुसार एक बॅग न मिळाल्याची नोंद केली नि फार्म भरून कार्यवाही पूर्ण केली.                स्वप्नील यापूर्वी दोनदा स्वीडनला जाऊन आल्यामुळे त्याला स्वीडनच्या वातावरणाची तशी सवय झालेली होती पण दीपश्री (सून) प्रथमच स्वीडनला जात असल्यामुळे तिच्यासाठी सर्वकाही नवीनच होते. त्यात बॅग हरवल्याची खंत होतीच. रात्री तिच्याशी बोलताना तिला सांगितले, "बॅग हरवल्याचे दुःख वाटून घेऊ नकोस, तुम्ही एवढ्या लांब सुखरूप पोहोचलात याचाच आनंद खूप आहे. बॅग सापडली तर ठीक आहे, नाहीच मिळाली तर वस्तू गेल...

व्हॉटसअपवरील गंमतीजमती

व्हॉटसअपवरील गंमतीजमती                               ब्लॉगवरील 'माझी सवत भेंडी' हा लेख वाचून माझा वर्गमित्र अविनाश याने व्हॉटसअप ग्रुपवर एक पोस्ट टाकली 'मला ज्योत्स्ना ताईचे एक गुपित कळले आहे की,ज्योत्स्ना ताईला एक सवत आहे, हे वाचून मला खूप वाईट वाटले आहे आणि ज्योत्स्ना ताई कुणाकडे जेवायला आली तर भेंडीची भाजी अवश्य करावी कारण ज्योत्स्ना ताईला भेंडी खूप आवडते.' अविनाशच्या या पोस्टने सगळेच बालमित्र विचारात पडलेत नि दिवसभर कुणीच पोस्ट टाकायला धजावले नाही. अविनाशने सांगितले 'सवती' शब्दाची बघितली किती दहशत आहे! कुणीच पोस्टला रिप्लाय द्यायला तयार नाही.काही मित्रांनी अविनाशला फोन करून विचारले तर काही मित्र चक्क त्याला भेटलेच. जनाबाई या बालमैत्रिणीने तर संध्याकाळी न राहवून विचारलेच, 'हे काय आहे अवि!' त्यावर अविने तिला मोठ्या गंमतीने रिप्लाय दिला, 'खूपच दुर्दैवी घटना, किमान तुला तरी वाईट/आश्चर्य वाटले.' जनाबाईच्या पोस्टनंतर थोडेसे धाडस दाखवत अनिल साळुंकेने पोस्ट टाकली, 'अवि दादा हे काय? ज्योत्स्ना माई...

कुटुंबातील रँगिंग

 कुटुंबातील रँगिंग                                    अनेक कुटुंबात नव्या नवरीचे कौतुक वगैरे करण्याची फारशी पद्धत दिसत नाही. नवी नवरी घरात आली आणि कांकण सुटले की तिने कामाला लागले पाहिजे असा दंडक असतो. अठ्ठावीस वर्षांपूर्वी अशाच एका नवरीला  कांकण सुटताच कामाला लागावे लागले. कांकण सुटताच नव्या नवरीला फर्मान सोडण्यात आले वांग्याची भाजी करण्याचे. सासूबाईंनी नव्या नवरीकडे दीडएक किलो वांगी सुपूर्द केलीत. माहेरी आईकडे असताना वांगी म्हणताच तिच्या तोंडाला पाणी सुटायचे आणि सासरी मात्र सासूबाईने वांगी तिच्या हाती देताच तिच्या तोंडचे पाणीच पळाले शिवाय त्या वांग्यांच्या काटयांचे अक्राळविक्राळ रूप पाहून तर चांगलीच बावरली बिच्चारी ... आता मात्र आलिया भोगासी .... याशिवाय पर्यायच नव्हता.               नाटयाभिनय करून इतिहास शिकविणाऱ्या बाईंचे शिकविणे तिने जितक्या तन्मयतेने अनुभवले तितक्याच तन्मयतेने तिने वांगी कापण्यास सुरूवात केली परंतु काही नाठाळ...

पातोड्यांची आमटी - गोव्यात

    पातोड्यांची आमटी - गोव्यात                   मी मुलांना घेऊन गोव्याला पाटील साहेबांकडे गेले होते. आता गोव्याला पंधरा दिवस चंपाबाईच्या हातचे जेवण मिळणार म्हणून मी खूश होते. पंधरा दिवस स्वयंपाक घराशी मला काहीही देणेघेणे नाही,असा मी मनाशी ठाम निश्चय केला होता. परंतु सर्वच निश्चय पूर्णत्वास जातीलच असे सांगता येत नाही. माझा हा निश्चय दोन दिवसातच डळमळीत होण्याच्या मार्गावर दिसू लागला. मी गेल्यापासूनच भुपेशने(आमच्या कंपनीतील भागीदार रमेशभाई यांचा चिरंजीव) चांगलीच भुणभुण सुरू केली, "भाभीजी, तुम्ही आहेत तोपर्यंत चंपाबाईला रजेवर पाठवून देऊ." त्याच्या त्या वक्तव्यावर मी म्हणाले, "मी गोवा पाहण्यासाठी आले आहे. तुमची सर्वांची स्वयंपाकीण (कूक) म्हणून आलेली नाही." माझ्या उत्तरावर भुपेशकुमार अगदी अजीजीच्या स्वरात म्हणायचा, "भाभीजी, चंपाबाईच्या हातचं खाऊन इतका कंटाळा आला की, आता तिला आम्ही कायमची रजा देऊन टाकतो आणि नवीन गोवियन लडकीच शोधतो नि दिलिप भाऊला गोवेकर बनवून टाकतो." त्याच्या त्या वक्तव्यावर मीही ठासून म्हणाले, " दिलिप भाऊब...

निरीक्षण

 निरीक्षण        ​ भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी  १० नोव्हेंबर २०१८ ला  आमचे दोंडाईच्याचे व्याही आणि विहिणबाई लेकीला  (आमच्या सूनबाईला)  घ्यायला आले असता आमचे पाटील साहेब मला म्हणाले, "सकाळपासून कुणी ना कुणी पाहुणे येऊन राहिले आहेत तर आज आपण सर्वजण जेवायला हॉटेलमध्येच जाऊ या." आम्हीही खूपच दमलो होतो त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही लागलीच, 'हो'  म्हणालो.          ​ ​  शाकाहारी व मांसाहारी जेवण करायचे असल्यामुळे आम्ही 'हॉटेल याहू' ला गेलोत तेव्हा दुपारचे अडीच वाजायला आले होते. आम्ही पाचजण हॉटेलमध्ये पोहचलो नि माझा मुलगा व व्याही,विहिणबाई आमच्या नंतर आले असता. सगळ्यांनी पटापट ऑर्डर दिली कारण व्याह्यांना दोंडाईच्याला पोहचायला उशीर होईल म्हणून आम्ही पटकन जेवणाची ऑर्डर देऊन जेवण आटोपले नि वेटरने फिंगर बाऊल आणले आणि माझ्या सासूबाईंनी फिंगर बाऊलमध्ये हात बुडवला नि तितक्यात मी टेबलवरील टिश्यू पेपर काढून माझ्या सासूबाईंच्या हातात दिला आणि त्यानंतर मीही फिंगर बाऊलमध्ये हात धुऊन पर्समधला हातरुमाल काढून माझा ओ...

धन्यवाद रसिक हो!

धन्यवाद रसिक हो! सर्व साहित्य रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा, सप्रेम नमस्कार.  तुम्ही सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देऊन मला फोनद्वारे, व्हाटसएपद्वारे, व ब्लॉगवर कमेंट्स पाठवून भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे.       

आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या

 आपल्या पाल्याची आवड जाणून घ्या                                    इयत्ता दहावीच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि गणित, विज्ञान व इंग्रजी याच विषयांना महत्त्व देणाऱ्या पालकांना मराठी, हिंदी व समाजशास्त्र या विषयांचे महत्त्वच कळले नाही त्यामुळे भविष्यात समाजाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे कारण मातृभाषेचा अभ्यास योग्यप्रकारे केला तरच मुलांवर सुसंस्कार होतात, नैतिक मूल्ये ही मातृभाषेतूनच रूजत असतात. तसेच समाजशास्राचा अभ्यास चांगल्याप्रकारे केला तरच मुले चांगले नागरिक बनून देशासाठी योग्य काम करतील. आज डॉक्टर, इंजिनियर यांचे प्रमाण मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे त्यात यशस्वी करियर करणे म्हणजे खूपच कठीण झाले आहे. आज अनेक नवनवीन क्षेत्र मुलांसाठी उपलब्ध झाली आहेत त्यामुळे आपल्या मुलाचा कल, आवड ओळखून शिक्षण किंवा कौशल्य शिकविण्यातच शहाणपण आहे. आज वेळ व पैसा दोन्ही गोष्टी बहुमूल्य आहेत त्यामुळे लाखो रुपये क्लासेसची फी भरून मुलांना न आवडणाऱ्या क्षेत्रात टाकून वेळेचा व पैशांचा...

मिनी टिफिन

Image
     मिनी टिफिन                           प्रवासात वेळोवेळी अनेक हॉटेल्सला भेट दयावीच लागत असते आणि काही हॉटेल्स कायमच्या  स्मरणात राहतात  त्या एकतर चांगले जेवण मिळाले म्हणून किंवा सर्वात निकृष्ट , बेचव जेवण मिळाले म्हणून किंवा मेनूच्या गुणवत्तेपेक्षा अधिक दर आकारल्यामुळे किंवा हॉटेलच्या उत्कृष्ट वातावरण निर्मितीमुळे किंवा हॉटेलमधील वेटर , मँनेजर यांच्या सौजन्यपूर्ण व्यवहारामुळे .                 असेच एक हॉटेल आमच्या सर्वांच्या कायमचे लक्षात राहील कारण हे हॉटेल आम्ही कधीच विसरू शकत नाही ते त्याच्या खास अशा खासियतमुळे .  १ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही तीन कुटुंबिय कन्याकुमारीहून मदुराईला जाण्यास निघालो असता तिरुनेलवेली ( tirunelveli ) महामार्गाला लागलो असता रस्त्यात एक हॉटेल दिसताच आम्ही नाश्त्यासाठी गाडया थांबवल्यात . हॉटेल चांगले दिसत असल्यामुळे सर्वांनी नाश्ता करून पुढे जाण्याचे ठरवले .          ...
Image
आदर्श राजकीय व्यक्तिमत्त्व -    श्रीनिवास पाटील सर                          डिसेंबर २०१७ ला आमच्या साहेबांनी सिक्कीम ट्रीपचे बुकिंग केले आणि दोन गोष्टी डोळ्यांसमोर आल्यात त्या म्हणजे सिक्कीमचा निसर्ग आणि महाराष्ट्राला भूषण वाटावे असे व्यक्तिमत्त्व सिक्कीमच्या प्रगतीला हातभार लावीत आहे, अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटण्याची मनापासून इच्छा निर्माण झाली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून माननीय श्रीनिवास पाटील सरांची नेमणूक केली तेव्हाच एक कुतूहल निर्माण झाले होते पण श्रीनिवास पाटील सरांना भेटण्याचा योग येईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते परंतु सिक्कीम ट्रीपचे बुकींग झाल्याबरोबर मनात आशा निर्माण झाली नि काहीही झाले तरी आपण सिक्कीमला गेल्यावर दादासाहेबांची (माननीय श्रीनिवास पाटील) भेट घ्यायचीच. दोन महिन्यात अनेकवेळा मनात विचार येऊन गेला की, आपण सिक्कीमला गेल्यावर नेमके दादासाहेब (माननीय श्रीनिवास पाटील) कुठे दौऱ्यावर गेलेत तर आपली भेट होणार नाही किंवा टूरच्या नियोजनानुसार आपल्य...