सिंहगड fort of sinhagad
सिंहगड fort of sinhagad कृषी पर्यटनाचे महत्त्व पुण्याला गेल्यावर आम्ही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सिंहगडला जाण्याचे ठरवले. दुपारी बारा वाजता आम्ही सिंहगडा च्या पायथ्याशी पोहचलोत आणि सिंहगड चढण्यास सुरवात केली. मधूनच येणारा पावसाचा शिडकावा आणि सिंहगड चढताना होणाऱ्या पर्यटकांच्या फजितीने सर्वांचीच हसून हसून पुरेवाट होत होती. सिंहगडा वरील हिरवाकंच कोट आणि गडाखालचा हिरवा गालिचा पाहून मन अगदी प्रफुल्लित होत होते त्यामुळे सिंहगड चढताना सर्वांनाच मजा येत होती. सिंहगड fort of sinhagad गप्पा करता करता सिंहगडा च्या मध्यावर येऊन पोहचलोत . निम्मे अंतर चढून झाल्यावर सगळेच दमलेत नि तहानेने घसाही सुकू लागला नि मग लिंबू सरबत पाहून सगळे ओरडलेत, 'लिंबू सरबत घेऊ या.' लिंबू सरबतची ऑर्डर देताच सरबत विक्रेते काका लिंबू सरबत बनवायला लागले. लिंबू सरबत बनवतांना त्या काकांचे हात मोठ्या सफाईने ...