Posts

Showing posts from January, 2019

माझ्या उद्योगाविषयी घरादाराचे शेरे

माझ्या उद्योगाविषयी घरादाराचे शेरे   लहरी मना, थांब ना जरा,  असे मी कितीही म्हटले तरी ते लहरी, चंचल मन मात्र थांबण्याऐवजी सुसाट धावत असते नि जे काय करायचे ते करून मोकळे होत असते. नुकतेच सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचे व मागच्या महिन्यात मुलीचे लग्न होताच मी सगळ्यांना सांगितले, "मी या प्रदर्शनात फूड स्टॉल टाकणार आहे." झालं, जे व्हायचे तेच झाले. सगळ्यांचा एकच प्रश्न, "तुला दमायची हौस आहे का?"  मी एखाद्या गोष्टीची घोषणा करताच माझ्या लहान बहिणीला चांगलीच धडकी भरत असते.  मी कोणतीही गोष्ट करायचे म्हटले की, सर्वात जास्त टेन्शन येते ते म्हणजे माझी  लहान बहीण शारदा पवार हिला! मी काही करायचे म्हटले की, तिचा पहिला प्रश्न असतो, "तुला काय गरज आहे असले उद्योग करायची?" मला तिच्या या प्रश्नाचे नेहमीच हसू येत असते. मी तिला गंमतीने म्हणत असते, "उद्योग मी करते नि तुला टेन्शन का येते!" यावर ती जाम चिडते, "तू सगळ्या घरादाराला तुझ्या उद्योगात गुरफटून वैताग आणित असते." अर्थात हे ती गंमतीने म्हणत असते पण मी काहीही करायचे ठरवले की, तिला बयेला टेन्शन आलेच....

पानीमा बुडिसन मरी का जायेना

सर्व साहित्य रसिकांना, वाचकांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  सव्वीस जानेवारी म्हणजे एका मुलीने स्त्रीत्वाची कशी किंमत चुकवली याची जाणीव करून देणारा दिवस. दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या मंगलला कधीच कुठला पुरस्कार मिळाला नाही आणि पोहण्याची आवड कशी धडपून टाकावी लागली याचे वाईट वाटत असते. अशा या मंगलची ही कहाणी.                                                                           पानीमा बुडिसन मरी का जायेना               २६ जानेवारी जसजसा जवळ येतो तसतशी मला तिची हमखास आठवण येते . तिची आठवण येण्याचे कारण म्हणजे तीस बत्तीस वर्षापूर्वी मी पाण्यात पडले आणि मला पोहता येत नसल्यामुळे मी गटांगळ्या खात असताना तिने पाण्यात उडी घेतली आणि माझी मानगूट पकडून मला पाण्यातून बाहेर काढले . अर्थात तिने मलाच पाण्यात  बुडता बुडता वाचवले असे नाही...

सात फेरे

सात फेरे  कणिक तिंबता तिंबता  दुःखाचे कढ तिंबत गेली  लाटी लाटता लाटता  अपमान रगडीत गेली  पोळी शेकता शेकता  फुंकर घालित गेली  अग्नीभोवतीची सात फेरे  आताशी उलगडू लागली 

उकडपेंडीची गोष्ट

 उकडपेंडीची गोष्ट              आपल्या पूर्वजांनी म्हणींचा व वाक्प्रचारांचा खजिना आपल्यासाठी जपून ठेवला आहे. म्हणींचा हा खजिना आपले जीवन ऐश्वर्यसंपन्न करीत असतो. म्हणींची अनुभव संपन्नता जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हाच त्या म्हणीतील गहन अर्थ अधिकाधिक उलगडत जातो. अशीच एक म्हण 'कोंड्याचा मांडा करणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ खऱ्या अर्थाने अनुभवला गोव्याच्या निसर्गसंपन्न भूमीत.               मी उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना घेऊन एक महिना गोव्याला गेले होते. गोव्याला असताना आमचे दुपारचे जेवण कंपनीतच बनविले जायचे आणि सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण घरी होत असे. कंपनीत जेवण बनविण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य व खाद्यपदार्थ असायचे. सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत मी व मुले दिलिप सोबतच कंपनीतच राहत असू. मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी चिवडा, बिस्किटे असे पदार्थ मी कंपनीत जाताना सोबत नेत असे. एके दिवशी कंपनीत दिलिपचे मित्र आले असता त्यांना चहाबरोबर चिवडा व बिस्किटे खाण्यास दिली त्यामुळे मुलांना दुपारच्या वेळेस ख...

मैत्रीपूर्ण वास्तू - सागर दर्शन

मैत्रीपूर्ण वास्तू - सागर दर्शन                 तेरा चौदा वर्षांपूर्वी मे महिन्यात गोव्याला गेले असताना आम्ही दोना पावला बीचवर जाण्यासाठी निघालो आणि अचानकपणे रस्त्याच्या उजव्या बाजूला ' सागर - दर्शन ' नाव दिसताच खूप आनंद झाला . खरे तर सागर - दर्शन या नावाशी माझं कोणते नाते जोडले गेले होते ! ' सागर - दर्शन ' नाव वाचल्यावर मला आनंद का व्हावा ? एक वास्तू ! जिचे नाव ' सागर - दर्शन ' . काय होते त्या वास्तूत ? खरे तर आजच्या घडीला काहीच नव्हते तरीही मला त्या ' सागर - दर्शन ' या नावाने वेड लावले होते . कितीतरी वेळ मी त्या वास्तूकडे पाहत राहिले . या वास्तूने माझी मैत्री हरवली होती . या वास्तूने मला माझ्या मैत्रीपासून लांब नेले होते .                 माझ्या डायरीत लिहिलेल्या पत्त्यावर ' सागर - दर्शन ' , दोना पावला असे लिहिले होते आणि आज मी चक्क त्या वास्तूसमोर उभी होती , परंतु हात पसरवून स्वागत करणारी माझी मैत्रीण त्या वास्तूत नव्हती . ' सागर - दर्शन ' राहणारी माझी मैत्रीण खरोखरीच सागर दर्शनाकरि...

मुलांचे बालपण संपल्याची जाणीव करून देणारा दिवस

          मुलांचे बालपण संपल्याची जाणीव करून देणारा दिवस                      सर्व रसिक वाचकांना काल मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकले नाही त्याबद्दल क्षमा असावी . वरवर शुभेच्छा देणे मला खरेच जमत नाही कारण काल मी स्वतःच दिवसभर वेगळ्या विचारात होते. काल मी दिवसभर माझ्या मुलांचे बालपण आठवण्यात इतकी मग्न होते की कुणालाही शुभेच्छा पाठवू शकले नाही.                  चार- पाच दिवसांवर मकर संक्रांत आली की आमच्या कॉलनीत पतंग उडवणारी मुले घरासमोरचे पटांगण दणाणून सोडायची. चि. स्वप्नील व चि. पूर्ती जसे चालायला लागलेत तसे त्यांना बाहेर पतंग उडवणारी मुले दिसलीत की, त्यांच्या बाबांना पतंग आणायला सांगायची आणि त्यांचे बाबा डझनभर पतंग आणून द्यायचे. मग दोघे मला लाल रंगाची पतंग हवी तर कधी मला हिरवी पतंग पाहिजे अशी तुतुमैंमैं करीत पतंगांची वाटणी करायची नि दोघे आपापल्या पतंग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून एक एक पतंग हातात घेऊन बाहेर पडायची. दोघेही दिवसभर फक्त हातात पतंग घे...

धन्यवाद व रेसिपी

माझा ब्लॉग वाचणाऱ्या सर्व रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा नमस्कार.  अनेक वाचकांनी आम्हांला ब्लॉगवर प्रतिक्रिया पाठवता येत नाहीत असे व्हाटसअपवर कळविले. तर काही वाचकांनी 'मावस सासूबाईंची खव्याची पोळी'  हा लेख वाचून खव्याच्या पोळीची रेसिपी पाठविण्याविषयी सूचना केली त्यामुळे आज खव्याच्या पोळीची रेसिपी संक्रांतीच्या सणाकरिता लिहून पाठवित आहे.  खव्याच्या  पोळीची   पाककृती  साहित्य  : पाव किलो खवा, एक वाटी साखर, पाच-सहा वेलदोडे, शंभर ग्रॅम मैदा, शंभर ग्रॅम गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ, शेंगदाणा तेल दोन टेबल स्पून, तूप पन्नास ग्रॅम.  कृती  : सारण : प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात खवा परतून घ्यावा नंतर हा खवा थंड होऊ द्यावा. थंड झालेल्या खव्यात वेलदोडे घालून बारीक पावडर केलेली साखर(पिठी साखर) टाकून चांगले मिक्स करणे. अशाप्रकारे खव्याचे सारण तयार करावे .  मैदा, गव्हाचे पीठ, मीठ,तेल टाकून चांगले मिक्स करून पाणी टाकून कणिक मळून घेणे. पारीसाठी कणिक तयार झाल्यावर त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून ओल्या कपड्याने सर्व गोळे झाकून ठेव...

नखरेल लसूणी मेथी

                                           नखरेल लसूणी मेथी                     हॉटेलमध्ये जेवायला जाणे म्हणजे स्वतःला मूर्ख व बावळट बनवून घेण्यासारखेच होय . असे मला वाटते . कारण मेनू कार्डवरील पदार्थांची छान छान नावे वाचून तोंडाला पाणी सुटते आणि ऑर्डर दिल्यानंतर पुढयात आलेल्या पदार्थावर ताव मारण्याच्या उद्देशाने पहिला घास घेताच ऑर्डर दिलेल्या डिशच्या नावाचा आणि गुणांचा ताळमेळ घालणे म्हणजे एक महादिव्यच ठरते . तसेच आपल्यापुढे आलेला पदार्थ कसाही असला तरी त्याविषयी चकार शब्द बोलायचे नाही म्हणूनच की काय हॉटेल चालकांनी हॉटेल मँनर्स नावाची टूम काढलेली दिसते . आणि हॉटेल मँनर्स पाळत एक डीश आवडली नाही तर दुसऱ्या डीशची ऑर्डर देऊन आमचा धंदा तेजीत चालवा असेच तर हॉटेल चालक, मालक आपल्याला सांगत नाहीत ना! असे सारखे वाटत असते .                 एकच पदार्थ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कस...

माझी चुलबुली

माझी चुलबुली                            आज सून दीपश्रीचा स्टॉकहोमहून कॉल येताच तिच्या आवाजात नेहमीप्रमाणे खदखदून हसण्याचा सूर काही दिसत नव्हता म्हणून मला शंका आली आणि मी तिला न राहवून विचारलेच, "का रे बेटा! आज नाराज का आहेस?" मी असे विचारताच तिला खूप रडायला आले. तिला शांत करताच ती म्हणाली, "आई, खूप एकटं एकटं वाटतं. तुम्हां सर्वांची खूप आठवण येत आहे. आत्ता आम्ही पुण्याला राहायला हवे होते. ताऊ पुण्याला नि मी, स्वप्नील इकडे आलोत त्यामुळे आम्हांला ताऊचीही खूप आठवण येत आहे." तिची समजूत घालून तिला शांत केले नि फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर बराच वेळ मी विचार करीत बसले. 'जग एक खेडे आहे. जग जवळ आले.' असे आपण किती सहज म्हणून जातो पण प्रत्यक्षात तसे असते का? मोबाईल, व्हॉटसअप चॅट, व्हिडीओ कॉलिंग ही सर्व साधने फक्त आभासी वाटतात. या आभासी जगाऐवजी माणसाला सहवास हवा असतो. राग, रुसवा, फुगवा, कौतुक, मायेचा स्पर्श या सर्व गोष्टींसाठी एकत्र राहणे महत्त्वाचे असते. सोशल मिडिया दुधाची तहान ताकावर भागवण्याचे काम करीत असले तरी माणस...

लेकीची बॅग

लेकीची बॅग                          लेकीच्या घरी गेल्यावर लेक म्हणते कशी, "आई, मला आपल्या फ्लॅटवर जाऊन माझं सामान आणायचे आहे." सासरी गेलेल्या लेकीने माझं सामान आणायचे, असे म्हणताच काळजात चर्र झाले. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत म्हणाले, "बेटा, तुझं राहिलेले सामान उद्या परवा कधीही आणता येईल. आजच आणायला पाहिजे का?" मी असे म्हणताच ती कळवळून म्हणाली, "अगं आई, दोन दिवसांनी जॉबला गेल्यावर मला आपल्या फ्लॅटवरून सामान आणणे कसे शक्य होईल बरे." तिचे म्हणणेही खरेच होते पण लेकीचं सामान आपल्या घरातून तिच्या सासरच्या घरी जाणे म्हणजे काय असते हे त्या लेकीला नि तिच्या आईलाच ठाऊक असते. एक एक वस्तू बॅगेत भरताना लेकीचा चेहरा बघण्याचे साहस मला होत नव्हते. जणुकाही एकेका वस्तूबरोबर ती माहेरच्या घरापासून दूर दूर जात आहे याचे वाईट वाटत होते. तिच्याबरोबर केलेली शॉपिंग आणि त्या शॉपिंगवरून आमचे होणारे लुटुपुटुचे वाद आठवत होते. एक नेलपेंटची बाटली घ्यायला जायचे नि चार-पाच नेलपेंटच्या बॉटल्स खरेदी करायची तेव्हा तिची नि माझी होणारी तू तू ...

मावस सासूबाईंची खव्याची पोळी

मावस सासूबाईंची खव्याची पोळी              लग्नानंतर मी व दिलीप दोघेही त्यांच्या मावस बहिणीकडे गेलो होतो. माझ्या मावस नणंद सौ. आशा अशोक मराठे या साक्रीला राहतात. त्यांच्या घरी आम्ही प्रथमच गेलो त्यामुळे त्या आम्हांला जेवणाचा आग्रह करीत होत्या परंतु आम्हांला जेवणासाठी थांबणे शक्य नव्हते; तेव्हा आम्ही फक्त चहा घेऊन निघतो असे सांगताच नणंदबाई म्हणाल्या, " जेवायला नाही थांबत; तर निदान नाश्ता तरी करावाच लागेल." असा दम दिल्यावर त्यांनी नाश्त्याची जी डिश दिली ती जेवणातल्या पदार्थांसारखीच भरून होती. नाश्त्याला चार-पाच पदार्थ दिले होते त्यातला एक पदार्थ मला खूप आवडला. मी नणंदेला विचारले,"ताई, तुम्ही दिलेली गोड पोळी खूपच छान आहे. फारच चविष्ट लागली. पोळी कशाची आहे?" मी असे विचारताच त्या म्हणाल्या, "वहिनी, खव्याची पोळी आहे. मुलांना खूप आवडते म्हणून आईने चांगल्या अर्धा किलो खव्याच्या पोळ्या कालच हेमंतबरोबर पाठवल्यात. मुलं दोन दिवसही पोळ्या राहू देत नाहीत. तुम्ही उद्या आल्या असतात तर तुम्हांला चवीलाही मिळाली नसती." "मग तर आम्ही नशिबवानच आहोत , सासूबाईंच्या ...

गरीबी शाप की वरदान

गरीबी शाप की वरदान            २९ डिसेंबर २०१८ ला माझ्या लेकीचे लग्न झाले आणि लग्न यशस्वी व्हावे म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांची देणी देण्याचे काम चालू असताना माझ्या घरात काम करणारी माझी मदतनीस गीता समाधान अंभोरे  ​ हिला मी पैसे देत असताना तिने चक्क पैसे घेण्यास नकार दिला. ती काही केल्या पैसे घेण्यास तयारच होत नव्हती. मी खूप आग्रह केला तरीही ती पैसे घेईना. ती मला म्हणाली,"ताई, मी ताऊ दीदीच्या लग्नात काहीच काम केले नाही म्हणून पैसे घेणार नाही." कारण लग्नाच्या वेळेस आठ दिवस केटरर्सकडूनच जेवण येत असल्यामुळे व जेवणासाठी पत्रावळींचाच उपयोग केल्यामुळे आमच्या गीताला भांडी धुण्याचे कामच नव्हते. रोजच्याप्रमाणे थोडीफार भांडी घासण्यासाठी असायची त्यामुळे तिने यावेळेस पैसे घेण्यास साफ नकार दिला तेव्हा तिचे मला खूपच कौतुक वाटले. एक अशिक्षित स्त्री की, जिला आपल्या कामाचे मूल्यमापन करता येते नि याउलट आमच्या देशातील सरकारी नोकरदार वर्गाला आपण घेत असलेल्या पैशाचे मूल्यमापन का करता येत नाही? मला सरकार ज्या कामासाठी पैसे देते ते काम म...
सर्व साहित्य रसिकांना,  ज्योत्स्नाचा सप्रेम नमस्कार.  नूतन वर्षाच्या सर्व रसिक वाचकांना हार्दिक शुभेच्छा!  गेल्या पंधरा दिवसांपासून एकही पोस्ट टाकली नाही म्हणून अनेक रसिक वाचकांनी विचारणा केली तर काही ओळखीच्या वाचकांनी,"काय! लेकीचं लग्न म्हणून लेखन बंद आहे का?" आणि हो! खरंच गेल्या पंधरा दिवसांपासून घरात लेकीच्या लग्नाची जी गडबड चालू होती त्यामुळे क्षणभरही विचार करण्यास वाव नव्हता. लेक सासरी गेली नि मुलगा व सून स्विडनला गेल्यावर पुन्हा घर खायला उठू लागले नि मग पुन्हा शब्दांशी झटापट करण्याशिवाय पर्यायच उरला नाही त्यामुळे पुन्हा लेखन हाच माझा श्वास होय याची प्रचीती आली आणि आजपासून पोस्टचा सिलसिला सुरू करीत आहे रसिक वाचकांसाठी.  धन्यवाद!   २०१९