पाऊस
पाऊ स नमस्कार रसिक वाचक, बाहेर पाऊस पडत आहे तर मग भटकंती करायलाच हवी ना! चला तर मग आपापला पाऊस अनुभवू या. कुणाला गावाकडचा पाऊस खुणावतो, कुणाला पावसातली फजिती तर कुणाला प्रियकर प्रेयसी सोबतचा पाऊस आठवतो तर बळीराजाला त्याच्या कारभारणी सोबत रानातला पाऊस आठवतो. मला मात्र पावसाच्या पाण्यात मनसोक्त हुंदडणारे बालपण लाभले म्हणून पाऊस म्हणजे चैतन्याचा खराखुरा महासागर होय या महासागरात प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार उडी मारून आनंदाचे मोती गोळा करावेत त्याचसाठी हा लेखप्रपंच. समोर पाऊस पडताना दिसतो परंतु हा पाऊस माझ्या मनाला कधीच स्पर्श करीत नाही. मनाला स्पर्श न करणारा असा हा शहरातला पाऊस देखील मला शहरासारखाच उपरा भासतो. शहरातला पाऊस देखील कर्तव्य म्हणूनच शहरात पडत असतो. तो देखील शहरात येतांना आपुलकी विसरूनच येत असतो. त्यालाही ठाऊक असते येथे अंकुरण्यासाठी आहेच काय! काँक्रिटच्या भिंतीवरून घरंगळून गटारीच्या पाण्यातच मिसळायचे आहे. त...