Posts

Showing posts from April, 2019

आईच्या वरणासारखे नव्हेच!

                                         आईच्या वरणासारखे नव्हेच!                 माझी लेक गावाहून आली की तिची पहिली फर्माईश असते, "आई, आजी करते तसंच गोड आंबट वरण बनव."  तिच्या या फर्माईशला माझ्याकडे एकच उत्तर असते, "आजीला फोन करून सांग, आजी मी आली आहे." मी असे सांगताच बेटी म्हणते कशी, "का गं, तू आजीची मुलगी असून आजीला स्वयंपाक करण्याचा त्रास देतेस." यावर आमची दोघींची खडाजंगी सुरू होते, "तू माझी मुलगी असून मला त्रास दिलेला चालतो नि मी तुला फक्त आजीला फोन करायला सांगताच मला लेक्चर देत बसलीस." "वा! वा! तुला सगळे ठाऊक आहे. आजीला मी आली आहे असे सांगताच, आजी माझ्यासाठी गोड आंबट वरण तयार ठेवेल आणि तू मात्र आई असून माझ्यासाठी गोड आंबट वरण न करताच आजीकडे पाठवून मोकळी होतेस." असा हा संवाद नेहमीच होत राहतो कारण मला चांगले ठाऊक आहे की आई बनविते तसे गोड आंबट वरण बनविणे मला या जन्मी तरी शक्य नाही. आईच्या हातचे गोड आंबट वरण ज्या व्यक्तीन...

अनमोल नाती

अनमोल नाती         ६ मे २०१८ला माझ्या मुलाचे लग्न झाले आणि माझ्या लहान दोघी बहिणींची मुलं नि माझ्या नणंदेचा मुलगा हे तिघेही आपापल्या आईला म्हणाले, "आता वहिनी आली मग आम्ही दादाकडे कसे जायचे?"               या माझ्या तिघा भाच्यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या आयांना गंमतच वाटली. त्या तिघींनी मुलांना सांगितले, "दादा, ताऊ असताना तुम्ही दादाच्या रूमवर जायचे ना! मग वहिनी आली तर रूम बदलली का? दादा बदलला का?" माझ्या बहिणींनी व नणंदेने मुलांना सांगितले,"वहिनी आली तर तुम्ही आनंदाने दादाकडे जायचे. वहिनीच्या हातचे गरमागरम जेवण मिळेल नि वहिनीला चिडवायला मजा येईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शनिवारी, रविवारी वहिनीकडे जायचे. तुम्ही गेलात तरच वहिनीला ओळख होईल आणि तुमचे नाते घट्ट होईल."                 मधल्या बहिणीचा मुलगा विनू(विनीत), लहान बहिणीचा मुलगा अभी(अभिषेक) आणि लहान नणंदेचा मुलगा दादू(दिप्तेश) हे तिघेही पुण्याला हॉस्टेलवर राहत होते त्यामुळे ते तिघेही माझा मुलगा चि. स्वप्निल व मुलगी...

About world book day

  योग्य हातात दिलेले पुस्तक              २३एप्रिल 'पुस्तक दिन' म्हणून सर्वत्र साजरा होत असताना मला मात्र  २२ मार्च २०१९चा दिवस आठवला नि मनात खूप कालवाकालव झाली. नियती कोणती गोष्ट आपल्याकडून नकळत करून घेईल ते सांगणे खरंच कठीण असते. २२ मार्चला मैत्रिणीच्या मुलीचे लग्न होते म्हणून आम्ही दोघे नवराबायको साक्रीला गेलो होतो. छायाच्या मुलीच्या लग्नाला जाण्यापूर्वी घरून निघताना अचानक लक्षात आले की, माझे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "अंतरंग सुगरणींची, खवय्येगिरी सर्वांची' हे पुस्तक साक्रीला राहणारे मोठे जेठ व जाऊबाई यांना देण्यासाठी घ्यायला हवे तर दुसरे मन म्हणत होते की, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल तेव्हाच रावसाहेबांना पुस्तक द्यावे. असे मनात चालले असतानाच पुस्तक बॅगेत टाकले.                छायाच्या मुलीचे लग्न आटोपताच आम्ही माझ्या जेठकडे म्हणजेच रावसाहेबांकडे गेलोत. रावसाहेबांच्या घरी गेल्यावर दीड-दोन तास गप्पा झाल्यात. गावाकडच्या शेतीपासून ते पुतण्याच्या लग्नाविषयी दोघा भावांच्या गप्पा चालल्या ...

फक्त

     फक्त  गुलमोहराच्या झाडा  उधळणा रक्तवर्णी फुले  सळसळू दे माझेही रक्त  पेटून ऊठू दे तुझ्यासंगे  फक्त न्यायासाठीच........ ! सोनचाफ्याच्या झाडा  शिंपडना पीतवर्णी फुले  भळभळू दे माझेही रक्त  खवळू दे तुझ्यासंगे  फक्त लढण्यासाठीच.......! पारिजातकाच्या झाडा  उधळणा शुभ्रवर्णी फुले  हुळहुळू दे माझेही रक्त  चेतवू दे तुझ्यासंगे  फक्त शांततेसाठी........!   
   विदेशी नहीं , इंडियन मँगता              दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . आम्ही सहकुटुंब सहपरिवार गोव्याला गेलो होतो . एके दिवशी आम्ही कलंगुट बीचवर फिरत असताना फिरून फिरून पाय थकलेत आणि पोटात कावळे ओरडू लागलेत म्हणून आम्ही बीचवरील एका हंगामी हॉटेलमध्ये गेलो . हंगामी हॉटेल म्हणजे गोव्याला बीचवर नोव्हेंबर ते मे या कालावधीत छोटे छोटे शेड उभारलेले असतात आणि त्या शेड्समध्ये भारतीय चटपटीत खाद्यपदार्थ मिळतात . आम्ही अशाच एका हॉटेलमध्ये गेलो . तेथे नाश्ता करीत असताना त्या हॉटेल चालकाशी गप्पा करीत असताना गप्पांच्या ओघात त्याला विचारले," या वर्षी बरेच पर्यटक आलेले दिसतात तुमचा धंदा तेजीत असेल ." यावर तो लागलीच उत्तरला ," नाही , पुढच्या महिन्यात येतील पर्यटक , तेव्हा आमचा धंदा तेजीत राहील ." त्याचे उत्तर ऐकून आम्ही स्तंभितच झालो . आम्ही त्याला म्हणालो , "विदेशी पर्यटक तर खूप आलेले दिसतात . "आमच्या या वक्तव्यावर तो पटकन म्हणाला , "हमको विदेशी  नही , इंडियन मंगता . "त्याचे उत्तर ऐकून आम्ही चकीतच ...
                                            एक मळभ                 नुकतेच एका निबंध स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळाली. जवळ जवळ एक हजार निबंध तेही नाशिक शहरातील चौदा-पंधरा शाळांचे. या एक हजार निबंधांमध्ये मनाला भावणारा, मनापासून वाचावा असा एकही निबंध नसावा याचे आश्चर्य आणि खेदही वाटला.              शालेय जीवनात इयत्ता दुसरीपासून निबंध लिहायला देण्यामागचा अर्थ नेमका पालकांच्या व शिक्षकांच्या विस्मरणात गेला की काय अशी शंका आली.                'निबंध' लिहिणे म्हणजे विद्यार्थ्याच्या मनाचा खराखुरा आरसा होय. निबंधातून मुलांची आवड शिक्षकांना व पालकांना जाणून घेता येते. निबंधाच्या मांडणीतून विद्यार्थ्याचा कल कशात आहे हे ओळखून त्याला भविष्याच्या दृष्टीने दिशा दाखवण्याचे काम खरे तर शिक्षकांनी व पालकांनी करायचे असते. कल्पनेची भरारी म्हणजे निबंध. विचारांची बैठक...