माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे
माझ्या भ्रमंतीवरील ताशेरे मैत्रिणींचे फोन आलेत की सगळ्यांचे उद्गार असतात,"कालच तर तू नाशिकला होतीस नि आज वर्ध्याला पोहचली पण." पुन्हा पंधरा दिवसांनी मैत्रिणींचे फोन आलेत की, त्या हसतच म्हणतात, "वर्ध्यालाच आहेस की झाली पसार." मग मी म्हणते, " पसार व्हायला मी काय दरोडेखोर वाटली का तुम्हांला!" मैत्रिणी हसतच म्हणतात, "तुझा काही भरवसा नाही. एखादी लायब्ररी लुटली नाही म्हणजे झालं." मग त्यांना सांगावं लागतं आता मी लायब्ररीतून पुस्तके आणणेच बंद केले. वाटते तेव्हा पुस्तक विकत घेऊन वाचते त्यामुळे लायब्ररी सुरक्षित आहे. काळजी नका करू." मग मी हळूच सांगते कालच वर्ध्याहून पुण्याला आली." आता मी पुण्याला असल्याची बातमी सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहचलेली असते नि मग पुन्हा चार-पाच दिवसांनी दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतो तर मी तेव्हा नेमकी साक्री किंवा धुळ्याला असते नि मग ती मैत्रीण सर्व मैत्रिणींना लाईव्ह टेलिकास्ट देऊन मोकळी होते मग त्यातल्या दोघी-तिघींचे फोन येतात, " आम्हांला माहीत नाही यावेळेस तू ट्रीपला आलंच पाहिजे." दुसरी मैत्र...