रूटस्
रूटस्
जीवनाची पाळंमुळं किती खोलवर रूजलेली असतात याचे प्रत्यंतर मला बालमैत्रीण निलिमा हिने पाठविलेल्या व्हीडिओज् पाहताना प्रकर्षाने जाणवले.
लंडनजवळ ग्लॉस्टर शहरात राहणाऱ्या मैत्रिणीने दिवाळीच्या पार्टीचे फोटोज्, व्हिडीओज् पाठवलेत नि खूप आनंद झाला. माझी बालमैत्रीण निलीमा जोशी कुलकर्णी मागच्याच महिन्यात भारतात येऊन गेली तेव्हा आम्ही मनसोक्त गप्पागोष्टी केल्यात आणि दिवाळीला भारतात येणे शक्य नसले तरी तेथील सर्व भारतीयांनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना मन अभिमानाने भरून आले. माणूस कुठे का जाईना पण तो आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला विसरूच शकत नाही. मला निलिमाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहताना अचानकपणे चौदा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली 'रूट्स' ही कथा आठवली. बहुतेक ती कथा मोनिका गजेंद्रगडकर यांची असावी.
©ज्योत्स्ना पाटील.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.