रसिकांशी हितगूज
रसिकांशी हितगूज
नमस्कार रसिक वाचक,
'माझी भटकंती' हा ब्लॉग भटकंती विषयक अनुभवांवर तर आहेच पण त्याचबरोबर समाजातील व निसर्गातील इतर घटकांविषयी ही भटकंती घडवून आणणारा आहे. यात कौटुंबिक नातेसंबंधातील भटकंती आहे, सामाजिक विषयांची भटकंती आहे तशीच नैसर्गिक भटकंतीही घडवणारी आहे. वाचकांना ज्या विषयात रूची आहे त्यानुसार ते ब्लॉगवरील लेखन वाचू शकतात.
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी बांधवांना माय मराठीची भेट घडवून आणणे नि त्यांची नाळ मराठी मातीशी घट्ट राहावी याच उद्देशाने मला ब्लॉग लिहण्यास प्रेरणा मिळत असते. मराठी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्यांची संख्या कमी आहे नि त्यातही ब्लॉगविषयी तांत्रिक अडचणी सांगणारी अनुभवी व्यक्ती नसल्यामुळे स्वतःच शिकत नि मुलगी व सूनेचं डोकं खाऊन चाचपडत चालणारी माझी ही वाट आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळे सुखावह होत आहे याचा आनंद वाटतो.
धन्यवाद रसिक वाचकांनो!
ब्लॉगर,
ज्योत्स्ना पाटील
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.