Posts

Showing posts from February, 2019
माय मराठी म्हाईंभटांची लिळा सांगे मराठीची कळा ज्ञानेशांची ओवी सांगे मराठीची थोरवी तुकोबांची गाथा सांगे मराठीची कथा शाहिरांची ललकारी सांगे मराठीची लयकारी जोतीबांचे अखंड सांगती मराठीचे खंड बहिणाईची बोली सांगे मराठीची खोली माय मराठीची गोडी कोणासही ना सोडी माय मराठीचा गजर करू साऱ्या जगभर माय मराठीची लेक ज्योत्स्ना आहे एक            ज्योत्स्ना पाटील
Image
अमराठी भाषिकांचे प्रयत्न मी ब्लॉग लिहायला सुरवात केली नि बेटीने तंबी दिली,"तुझ्या ब्लॉगमुळे मला किती डोकेदुखी होते माहीत आहे का तुला!" अरे वा! ब्लॉग मी लिहते त्यात तुला त्रास व्हायचे काही कारण नाही. तितक्यात बेटी लटक्या रागाने म्हणते कशी, कुठून मला बुद्धी सुचली नि तुझी ब्लॉगची लिंक मित्रमैत्रिणींना पाठवली गेली. सगळे मला विचारतात, पूर्ती इसका मिनिंग क्या हैं, उसका मिनिंग क्या हैं। आता मी माझं कामधाम सोडून काय ट्रान्सलेटरचंच काम करू का? तो निशांत, अपूर्वा ओरडतात, पूर्ती,आँटी को हिंदी भाषा में ब्लॉग लिखने को बोल." बेटीचे माझ्या ब्लॉगवरील शेरे खरेच होते याचे प्रत्यंत्तर लवकरच आले. २९ डिसेंबर २०१८ या दिवशी माझी लेक पूर्तीच्या विवाहानिमित्ताने तिचे मित्रमैत्रिणी आले होते. पूर्तीने तिच्या  मित्रमैत्रिणींची ओळख करून दिली असता तिने एका मित्राकडे निर्देश करीत सांगितले, "आई, हा सिद्धार्थ धामा आणि त्याची नियोजित वधू रीना कटारिया दोघेही दिल्लीहून आलेत. आम्ही तिघे काँग्निझंट कंपनीत बरोबर होतो. आता त्याची स्वतःची कन्सल्टन्सी आहे." तितक्यात सिद्धार्थने,"नमस्ते आँटी, म...
Image
  पुस्तके माझे सांगाती                 दि.१८ जानेवारी २०१९ ला आमची बालपणीची वर्गमैत्रिण सुरेखा हिच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने काही मित्रमैत्रिणी लग्नासाठी नाशिकला आले असता, सगळ्यांनी बालपणीच्या आठवणी काढून त्यावेळच्या जगण्यातला आनंद आज कुठेतरी हरवल्याची खंत व्यक्त केली. आमच्यासोबत आमच्या आदरणीय गुरू कमलबाई पण होत्या. त्यांनी आमच्यावर घेतलेली मेहनत वेळोवेळी दिलेली शिक्षा आज आम्हांला खूप प्रगल्भ बनवून गेली. याचा सर्वांनाच अभिमान वाटत होता कारण असे हाडाचे शिक्षक भेटायलाही नशीब लागते. सर्वजण सुरेखाच्या मुलगा विनय व सूनेला आशीर्वाद देऊन माझ्या घरी आले आणि जवळ जवळ दीड तास गप्पागोष्टी व चहापाणी करून जाण्यासाठी निघाले असता मी माधुरी वहिनी व भारती वहिनीला म्हणाले, "वहिनी, इकडे या मी तुम्हांला माझी लायब्ररी दाखवते." मी माझ्या दोन्ही रूममधील पुस्तकांचे कपाट दाखवत होते तितक्यात अविनाश म्हणाला, "ज्योत्स्नाताई, बायका कपाटातल्या साड्या दाखवतात आणि तू मात्र पुस्तके दाखवित आहेस." अविनाशने असे म्हणताच अनिल, संजय, सुभाष व सर्वचजण हसायला लागलेत. अर्थात त...

fort of raigarh (raigad)

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान - किल्ले रायगड                                   काल १९ फेब्रुवारी, सगळ्यांनी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी केली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहून मन प्रफुल्लित होत होते. सगळे नाशिकच शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहो हीच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची इच्छा आहे. शिवाजी महाराजांचा एक जरी गुण प्रत्येकाने अंगी बाणवायचे ठरवले तरी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होय. अशीच एक आठवण रायगडाविषयी.                         केरळला जात असताना पहिला मुक्काम अलिबागला केला आणि दुसऱ्या दिवशी अलिबागहून निघताना प्रथम रायगडाला भेट द्यायचे ठरले . संध्याकाळी पाचाडला पोहचलो आणि रायगडाच्या पायथ्याशी आल्यावर वरती किल्ल्याकडे नजर टाकताच मन भूतकाळात केव्हा गेले ते कळलेच नाही .चौथीत असताना कमलबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे केलेले वर्णन आठवले आणि बाईंनी ...
  प्रेरणेचे आगार-डॉ. उषाताई सावंत                             मला नेहमीच प्रेरणा देणाऱ्या डॉ. उषाताई सावंत यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, "ज्योत्स्ना, तुझा 'उकडपेंडीची गोष्ट' हा लेख वाचून मला जो आनंद झाला तो मी तुला शब्दात नाही सांगू शकत. खरंच तुझ्या या लेखाने माझा संपूर्ण भूतकाळ डोळ्यांसमोर उभा केला आणि विशेष म्हणजे मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण झाली. माझी आई कुणीही पाहुणा आला की, झटपट उकडपेंडी करून सगळ्यांना खाऊ घालायची. आईची ती मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि खरं सांगू का! तुझे लेखन वाचताना ते प्रसंग अगदी हुबेहुब आपल्यासमोर घडत आहेत असा भास होत असतो. तुझं लेखन मला खूपच मोहात टाकत असतं. तुझ्या लेखनातली सहजता मनाला खूप भावते. तू लेखाला दिलेले शीर्षक तर मला खूपच आवडते. तुझी ती 'नखरेल लसूणी मेथी' शीर्षक वाचूनच भुरळ घालते. 'अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट' वाचतांना तर खूपच मजा आली. तुझा प्रत्येक लेख वेगळा असतो नि वाचताना गुंतवून ठेवत असतो.  जवळ जवळ पंचवीस-तीस मिनिटे ताई माझ्या लेखांवर ब...
हेल्दी ड्रायव्हिंग               १४ फेब्रुवारी २०१९ ला मी एका कार्यक्रमासाठी धुळ्याला गेले होते. एक तासात कार्यक्रम आटोपून मी तीन वाजता धुळे बस स्टॅन्डवर आले तर बसमधील शेवटची सीट भरली गेली नि तिकीट काउंटरवरच्या महिला वाहकने दहा मिनिटांसाठी तिकीट काउंटर बंद केले. दहा मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा तिकीट काउंटर उघडले नि तिकीट घेऊन मी गाडीत जाऊन बसले. साडे तीन वाजता आमची बस नाशिकच्या दिशेने निघाली. बसने पाच वाजता चांदवड सोडले आणि आमची बस ठराविक वेगाने चालली असता अचानक एक बस मागून आली आणि आमच्या बसला ओव्हरटेक करीत असतानाच आमच्या बसमधील चालकाने ओव्हरटेक करणाऱ्या बस चालकाला शिटी वाजून आणि हाताने इशारा करीतच सांगितले, "तू मला ओव्हरटेक करून जाऊ शकत नाही. माझीच बस पुढे राहील." अर्थात ते दोघे चालक एकमेकांना चांगले ओळखत होते, हे त्यांच्या इशाऱ्यावरून नि बोलण्यावरून कळत होते. मागून पुढे जाणाऱ्या बसला मागे टाकण्यासाठी आमच्या बस चालकाने स्टिअरिंग अशा काही सफाईने फिरवली नि एक्सलेटर देत गाडीचा वेगही वाढवला. गाडीला वेगाने चालवीत नि मागे...
सर्व रसिक वाचकांना, सप्रेम नमस्कार.  काल झालेल्या आतंकवादी हमल्याने संपूर्ण देशच दुःखाच्या खाईत लोटला गेला. खरंच माणसाचं जीवन इतके कवडीमोल आहे का की, कुणीही, केव्हाही, कुणालाही या जगातून उठवून टाकावे! जागतिकीकरणाचे परिणाम सर्वांनाच कशा ना कशाप्रकारे भोगावे लागत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी मी 'जागतिकीकरण आणि खाद्यसंस्कृती' हा लेख लिहिला आणि हा लेख माझ्या 'अंतरंग सुगरणींची खवय्येगिरी सर्वांची' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आणि पुन्हा 'आतंकवाद' या शब्दाने चीड, घृणा तर निर्माण केलीच त्याचबरोबर मनाला जी वेदना झाली ती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. माझ्या देशासाठी शहीद झालेल्या देशबांधवांना आक्रंदणाऱ्या मनाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. शहीद झालेल्या बांधवांचे कुटुंब डोळ्यांसमोर येऊन मनात खूपच कालवाकालव होते आणि प्रश्न पडतो की माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? तर उत्तर नाही असेच द्यावे लागेल कारण माणसातला राक्षस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आतंकवादी या भूतलावर राहणार हे निर्विवाद सत्य स्विकारण्याशिवाय तरणोपाय नाही...

अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट

अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट            वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न झाले आणि लग्नानंतर स्वयंपाक करणे भाग पडले. अर्थात तोपर्यंत स्वयंपाक म्हणजे आईने करायचा नि आम्ही गरमागरम स्वयंपाकावर ताव मारायचा हाच काय तो माझा नि स्वयंपाकाचा संबंध (तीन - चार वेळा तुटक संबंध सोडून) लग्नानंतर सासरच्या माणसांशी जुळवून घेता घेताच स्वयंपाकाशी जुळवून घेण्याची कसरत पार पाडणे भाग पडले. आहारशास्राचा अभ्यास करताना माणसांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचाही अभ्यास करण्याची संधीही आपोआप उपलब्ध होत गेली.             लग्नानंतर पाटील साहेबांबरोबर नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच मनमाडला गेले आणि संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि खऱ्या अर्थाने जगण्याला प्रारंभ झाला. त्यातच पाटील साहेबांचे मित्र घरी येताच होणारी त्रेधातिरपिट तर विचारायलाच नको. माझ्या बिघडलेल्या पाककृतींचे खरे साक्षीदार कवडे भावोजी आणि सुजय दोडल साहेब हे दोघे होत.              एके दिवशी (१९८९ साली) मी सकाळी नाश्त्यासाठी टोमॅटो ऑम्लेट करण्याचे ठरविले आणि...

समाधान देणारी पोळी

Image
  समाधान देणारी पोळी             २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१९, या पाच दिवसात फूड स्टॉल टाकला असता जे अनुभव आलेत ते खूपच उत्साहवर्धक होते. मी फूड स्टॉल टाकला असे सांगताच सर्वांचा एकच प्रश्न,नफा किती झाला? अर्थात फूड स्टॉल टाकण्यामागे अनेक कारणं होती. त्यातील काही कारणांचा उहापोह हा नंतर होईलच पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या हातचे पदार्थ घरच्या लोकांना व नातलगांना आवडतात तितकेच ते बाहेरच्या लोकांनाही आवडतात का? हे मला खऱ्या अर्थाने अजमावून पाहायचे होते. तसेच वयोमानानुसार आपल्या कामात शिथिलता तर नाही ना आली! हे माझे मलाच अजमावून पाहायचे होते. त्यानंतर मुलांच्या लांब जाण्याने आलेली एक पोकळी आणि या पोकळीला छेदण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले आवडते काम सतत करीत राहणे पण घरात इनमीन तीन माणसे यांच्यासाठी माझ्या आवडीचे काम म्हणजे वीस-पंचवीस मिनिटात करून पुन्हा मोकळेपण. तीन माणसांना स्वयंपाक करतानाही त्रिकोणी स्वयंपाक करायचा त्यातही चार पाचच भाज्या आवडीच्या मग काय विचारता! अशा या कारणांमुळे फूड स्टॉल टाकून स्वतःला तपासून पाहण्याची नि पुन्हा ताज...