Posts

Showing posts from November, 2018
Image
धर्मनिरपेक्ष देश            २४ डिसेंबर २०१७ ला बागडोग्रा विमानतळावर पोहोचलो आणि तेथे आमच्या दिमतीला संतोष अर्धलकर व कॅल्टन  परेरा हे दोघे हजर. दोघांनी आमचे स्वागत केले आणि संतोषने त्यांचा दोघांचा परिचय देताच त्याचे आडनाव ऐकून सगळ्यांनी, "काय म्हणालास ?"त्यालाही त्याच्या आडनावाचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे त्याने सर्वांना पुन्हा एकदा स्लो स्पीचमध्ये आडनावाचा सगळ्यांना समजेल असा उच्चार केला नि सगळे एका तालासुरात म्हणाले , " संतोषच ठीक आहे." अशाप्रकारे संतोषच्या नावाचा अर्धविराम वगैरे होऊ नये म्हणून सगळ्यांनी संतोषमध्येच संतोष मानून घेतला आणि संतोषने त्याच्या साथीदाराचे नाव कॅल्टन  परेरा असे उच्चारताच सगळ्यांना कॅल्टन  ऐवजी परेराच ठीक वाटले. या दोघा टूर मँनेजरच्या नावात एकाचे नाव आवडले तर दुसऱ्याचे आडनाव. काय गंमत आहे ना नावांची! सगळ्यांच्या नावांची बाराखडी वाचून झाल्यावर आम्ही बागडोग्राला एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला नि गंगटोकला जाण्यासाठी किती वेळ लागेल व एका गाडीत किती पर्यटकांनी बसायचे अशी सविस्तर माहिती दिली. सिक्कीममध्ये प्रव...
तिची नि माझी भाषा                          फेब्रुवारी महिना येताच कुसुमाग्रजांची जशी आठवण येते त्याचप्रमाणे तिरुअनंतपूरमला भेटलेल्या एका महिलेचीही हमखास आठवण येत असते . २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना मला तिची नेहमीच आठवण येते आणि भाषा म्हणजे काय ? याचे उत्तर खऱ्या अर्थाने मिळत असते . १२ नोव्हेंबर २००५ ला मी व माझी नणंद तिरुअनंतपूरमला एका रेस्टारंटमध्ये जेवण करीत असताना आमच्या गप्पा चालू होत्या . गप्पा करीत जेवणाचा आस्वाद घेत असतानाच एक स्री आमच्याजवळ आली आणि मला म्हणाली , "एक्सक्यूज मी , तुम्ही महाराष्ट्रीयन का ?" मी हो म्हणताच ,तिने लागलीच दुसरा प्रश्न विचारला , "कुठून आलात ?" आम्ही आमची सविस्तर माहिती सांगितली तेव्हा ती स्री म्हणाली ,"मराठी शब्द कानावर पडले की खूप छान वाटते . मला मराठी बोलणारे भेटताच माझे बालपण परत मिळाल्यासारखे वाटत असते . " तिच्या त्या भावना जाणून मी तिला बोलते केले . तुम्ही तर तेलगू बोलतात मग तुम्हांला मराठी कसे बोलता येते ? माझ्या या प्रश्नावर त्या स्रीने माझ्यासम...
जशी दृष्टी तशी सृष्टी                        मी एका नामांकित क्लासेसमध्ये मराठी ,हिंदी व समाजाशास्र विषय शिकवीत असे .एके दिवशी मी विदयार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीविषयी माहिती सांगत असताना एका विद्यार्थ्याचे पालक आले असता त्यांनी त्यांच्या पाल्याला काही कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी मागितली .मी त्या विद्यार्थ्याला बाहेर जाण्याची परवानगी देताच त्याने त्याची चप्पल शेल्फ्वरून काढून पायात घालताच शेवटच्या बाकावरचा एक विदयार्थी हळू आवाजात त्याला म्हणाला , "तुझी चप्पल तर फारच सेक्सी आहे ." बाहेर जाणारा विदयार्थी त्या विद्यार्थ्याकडे रागाने पाहत ,"बाहेर ये मग बघतो तुझा बेत ." असे हळू आवाजात पुटपुटत बाहेर पडला .त्या दोघांनाही वाटले की माझे त्यांच्याकडे लक्षच नाही .मी चपलेला नाव ठेवणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात उभे केले आणि सांगितले ,"तू आत्ता जे वाक्य बोललास ते वाक्य सर्वांसमोर बोल ." चप्पलला सेक्सी म्हणणारा विदयार्थी खजिल झाला आणि खाली मान घालून उभा राहिला .मी वर्गातील सर्व विदयार्थ्यांना उद्देशून सांगितले," जे वा...

शिऱ्याची गोडी

शिऱ्याची गोडी                   दर पंधरा दिवसांनी लोणी काढताना दोन गोष्टी हमखास आठवतात, त्या म्हणजे शेवाळी (दातर्ती , जि. धुळे )येथील आजोबांचे ( मामाचे ) गाव आणि संत तुकारामांच्या अभंगातील ओवी. संत तुकाराम महाराज म्हणतात, मृदु सबाह्य नवनीत (लोणी ) तैंसे सज्जनाचे चित्त दैनंदिन व्यवहारातील साध्या, सोप्या उदाहरणांनी जीवनाचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या संत तुकारामांच्या प्रतिभेला खरे तर तोड नाही. असं हे आतून बाहेरून मृदु असणारे लोणी जेव्हा माझी मामी भांडयात काढायची तेव्हा ते भांडयात पडण्यापूर्वीच माझ्या तोंडात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात गडप व्हायचे. मामी ताक घुसळेपर्यंत व लोणी काढेपर्यंत पाव किलो लोणी तरी माझ्या पोटात ठाण मांडून बसायचे. पोटात गेलेल्या या पांढऱ्या लोण्याचे रक्तात रूपांतर कसे होते? हा बालपणी पडलेला प्रश्न दरवेळी लोणी काढताना आठवतो आणि नकळत ओठांवर हसू उमटते. मामीने काढलेल्या लोण्यापासून दीड ते दोन किलो तूप तयार व्हायचे. तूप झाल्याबरोबर ...
पाण्याचे महत्त्व उशीरा कळले                           तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्हां भावंडाकडून पाण्याचा नळ किंवा विजेचा दिवा कारण नसताना चालू राहून गेलाच तर माझे वडील म्हणायचे," पाणी आणि वीज काही तुमच्या बापाची नाही आहे .ती राष्ट्राची संपत्ती आहे ." दुसरं कुणी असं बोललं असतं तर त्याला चौदावं रत्न दाखवलं असतं पण आमचे वडीलच 'आमचे बाप' काढायचे तेव्हा फिर्याद तरी कुणाकडे करणार?आमचे वडील पाण्याला आणि विजेला राष्ट्राची संपत्ती का म्हणतात ? तेच कळत नसे . नदीत तर पाहिजे तेवढे पाणी वाहून जाते तर मग नळाचे थोडेसे पाणी वाहून गेले तर आपले वडील एवढे चिडतात का ?असा प्रश्न आम्हां भावंडाना पडत असे .तीच गोष्ट विजेच्या बाबतीत .आणि राष्ट्रीय संपत्ती म्हणजे काय ? हा आणखी गोंधळात टाकणारा विषय .अर्थात कॉलेजला गेल्यावर सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळालीत .आम्हांला ज्या प्रश्नांची उत्तरे कॉलेजला गेल्यावर मिळालीत त्याच प्रश्नांनी आज किती गंभीर स्वरूप धारण केले आहे याची जाणीव होऊन वडिलांची पर्यावरण संरक्षणाची तीस पस्तीस वर्षापूर्वीची तळमळ लक...
गरज पर्यावरण संस्कारांची                            एके दिवशी मी माझ्या मुलाला फोन केला असता तो उत्साहाने म्हणाला , " आई , आज मी एक पर्यावरणाचं रोपटं लावलं . " त्याचं पर्यावरणाचं रोपटं काही मला उलगडेना तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून आला . २००७ मध्ये माझ्या मुलाने चि . स्वप्नीलने पुण्याला सिंहगड कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला . कॉलेजच्याच होस्टेलमध्येच राहण्याची व्यवस्था होती . होस्टेलमधील त्याचे रुममेट हे गुजरातमधून आलेले होते . माझा मुलगा रूमबाहेर पडताना प्रत्येकवेळेस रूममधील पंखा व दिवा बंद करूनच बाहेर पडायचा तर याउलट त्याचे तिघे सहकारी पंखा व दिवे बंद न करताच बाहेर पडायचे . एके दिवशी माझा मुलगा व त्याचे तिघे सहकारी एकाचवेळी रूमबाहेर पडलेत आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या मुलाने पंखा व दिव्याचे बटन बंद केले असता त्याचे सहकारी त्याला म्हणाले , " पंखा व दिवा चालूच राहू दे, बंद करू नकोस, आपल्याला चाळीस हजार रुपये भरूनही गरम पाणी मिळत नाही, चांगले जेवण म...
रसिक वाचकहो, सप्रेम नमस्कार. ​माझी ब्लॉगवरील ही पोस्ट माझ्याकडूनच डिलीट झाली त्यामुळे ही पोस्ट पुन्हा पब्लिश करीत आहे. ​ ​खूप वर्षांपासून ब्लॉगवर लिहिण्याचे ठरवूनही योग येत नव्हता नि शेवटी काल म्हणजेच १६ नोव्हेंबर २०१८ ला मी ब्लॉगवर पहिला लेख लिहिला तो आमच्या घरचा दिवाळीचा सण याविषयी. तसेच मी माझ्या ब्लॉगला 'माझी भटकंती' असे नाव दिले कारण की भटकंती ही फक्त प्रवासापुरतीच सिमित नसून ती सर्वच क्षेत्रात असणारी भटकंती होय. कधी माझी लेखणी भावभावनांची भटकंती घडवेल तर कधी खाद्ययात्रेत असेल तर कधी नात्यागोत्यात भटकेल तर कधी देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींवर स्वार होईल तर कधी काव्य प्रांतात भटकेल तर कधी ललितच्या (साहित्यातला ललित हं, नाहीतर तुम्हांला दुसराच ललित वाटायचा) वाटेला जाईल तर कधी कथेत विहार करेल तर कधी नाटकातही विहरणार अशी सर्वत्र विहार करणारी मी व माझी लेखणी ब्लॉगवर फेरफटका मारणार तेव्हा तुम्ही रसिक वाचकांनी माझा रस्ता चुकल्यावर योग्य रस्ता दाखवण्याचे काम मात्र जरूर करावे तरच हा लेखन प्रवास सुखकर होईल नि इप्सित साध्य होऊन भटकंतीचा आनंद सर्वांनाच मिळेल. धन्यवाद. ...
स्पर्धा घेण्यामागचा उद्देश                                स्रियांची मासिक पाळी या विषयावर स्पर्धा घेण्यामागे माझा मुख्य उद्देश होता की, स्रियांना वर्षानुवर्षे ज्या गोष्टी मनात जाचत असतात त्या गोष्टीतून मोकळे करणे आणि पुरुषांनी या गोष्टीकडे निर्मळ मनाने पाहणे. मासिक पाळीचा पहिला अनुभव बऱ्याच स्रियांचा व मुलींचा हा कष्टप्रदच नव्हे तर मानसिक संतुलन बिघडवणारा देखील असतो. एका मुलीने तर शाळेत पाळी आल्यामुळे मुलांनी चिडवले होते म्हणून शाळाच सोडून दिली होती. एकीने तर आईकडे गर्भपिशवी काढून टाकण्याचाच हट्ट धरला अशा अनेक गोष्टी समाजात घडत असतात पण त्याविषयी समाज अनभिज्ञ असतो तेव्हा समाजाला अशा नाजूक विषयावर सजग करणे हाच खरा या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश होय. बारा-तेरा वर्षाची मुलगी अल्लडपणे खेळत असते, बागडत असते आणि एके दिवशी तिला पाळी आली की, अचानक मोठे केले जाते नि सांगितले जाते."तू आता मुलगी नाही तर स्त्री आहेस." हे ऐकल्यावर तिची होणारी तारांबळ आणि त्यातच पाळीमुळे होणारा शारीरिक त्रास...
'वेडावूनी गेले वय'                             तिचे दहावीचे प्रथम सत्र संपले होते. प्रथम सत्राची परीक्षा नुकतीच संपली होती म्हणून ती आनंदात होती. सगळीकडे दिवाळीच्या कामांची लगबग चालली होती. कुणी घराला रंग देण्याचे काम करीत होते तर कुणी अंगण ठाकठीक करण्यात दंग. घरातील बायका फराळासाठी गहू दळून रवा, मैदा काढण्याच्या कामात गर्क होत्या. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीच्या तयारीला लागले होते. त्यात तीही रांगोळी काढणे, रांगोळीत रंग भरणे यासारखी कामे करीत सुटीचा व दिवाळीचा आनंद ऊपभोगत होती. ऊदया दिवाळी म्हणून ती खूप आनंदात होती आणि अचानक तिच्या पोटात व पायात वेदना होऊ लागल्यात परंतु दिवाळीच्या आनंदापुढे तिने शरीराला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी ती अंगणात रांगोळी काढत असतानाच काहीतरी झाले असे वाटून ती बाथरुममध्ये गेली आणि स्वतःचे कपडे नीट न्याहाळून पाहिले असता तिला तिचे अंतर्वस्र रक्ताने लाल झालेले दिसले. ती तशीच बाहेर आली आणि ओटयावर बसून रडू लागली. तिला रडताना पाहून आजी तिच्याजवळ आली आणि तिला म्हणाल...
अनुभव पहिला                                                         ('मासिक पाळीचा पहिला अनुभव' या स्पर्धेतील पहिला लेख) ती नऊ दहा वर्षाची असताना खेळता खेळता पडली . तिच्या गुडघ्याला मोठी जखम झाली आणि संपूर्ण पाय रक्ताने लाल झाला . रडत रडत ती घरी आली परंतु घरात आई नव्हती .तिची आई बाहेर गेलेली असल्यामुळे तो एवढासा जीव हमसून हमसून रडत बसला . एकटीच रडत बसली आईची वाट पाहत . थोडया वेळात आई येताच तिने त्या एवढ्याशा जीवाला रडताना पाहून जवळ घेतले . आई त्या छोटयाशा जीवाला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांसमोर म्हणाली , " बेटा यापुढे खेळताना काही झालेच तर लागलीच डॉक्टर काकांकडे यायचे आणि ड्रेसिंग करून घ्यायचे . " त्यानंतर मात्र तिला खेळताना काही झालेच तर ती लागलीच डॉक्टर काकांकडे धाव घ्यायची . ती अकरा वर्षाची झाली आणि निसर्गाने आपली किमया दाखविली . ती आपल्याच मस्तीत , धुंदीत वावरत होती . अल्लड बालपण उपभोगत आनंदाने जगत होती . अशीच एके दि...
 मासिक पाळी                              मासिक पाळीचा पहिला अनुभव २८ मे हा प्रथमच 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस ' म्हणून साजरा करण्यात येत आहे . मी स्वतः या विषयावर गेल्या पाच सहा वर्षांपासून वैयक्तिकरित्या काम करीत आहे . माझ्या नात्यातील , परिवारातील ,मैत्रिणींना तसेच महिला मंडळे व भिशी ग्रुपमधील स्रियांना या विषयावर मी लिहिण्यास प्रवृत्त केले . नाशिक शहरातील काही शिक्षिकांनी मला जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात म्हणजेच शाळा सुरु होण्याच्या वेळेस अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी मला इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थींनीसाठी स्पर्धा घेण्यास सुचविले त्यामुळे मला खूप आनंद झाला . एका स्रिचा मासिक पाळीचा दुःखद अनुभव ऐकल्यावर व मन्ना डे यांचे ' लागा चुनरी में दाग ' हे गाणे ऐकले तेव्हापासून आणि दासू वैद्य यांची ' जाळभाज ' ही कविता वाचली तेव्हापासून ' मासिक पाळी ' हा विषय माझ्या डोक्यात थैमान घालीत होता . पुरुष जर या विषयावर बोलू किंवा लिहू शकतात तर मग स्रियांनी का या विषयाला वर्ज्य करावे ? या विचारासरशी...
Image
हम हैं हिंदुस्थानी                               दि . २९ डिसेंबर २०१४ ला आम्ही बँकॉकला पोहचलो असता आमच्या टूर मँनेजरने आम्हांला तीन दिवसाचे नियोजन थोडक्यात सांगितले आणि grand howard हॉटेलमध्ये नेऊन सोडले . हॉटेलची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरली आणि तेथील प्रत्येक गोष्टीने मन मोहून घेतले . आमची रूम अठराव्या मजल्यावर होती . आम्ही आपापल्या रुमचे कार्ड घेतले आणि लिफ्टमध्ये कार्ड स्वाईप केल्याबरोबर आमच्या मजल्याचा अठरावा क्रमांक आला आणि बरोबर अठराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली नि डोअर ओपन झाल्याबरोबर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो . त्याच कार्डने आमच्या रूमचा दरवाजा उघडला . रूममधील आतली प्रत्येक वस्तू आकर्षक होती . बाथरूमविषयी तर विचारायलाच नको . पंचतारांकित हॉटेलमधील बाथरूम कितीही आकर्षक असले तरी बादलीतील पाण्याने आंघोळ करण्यातली जी काही मजा असते ती शॉवर व बाथटबने येत नाही काय करणार ! ' आदत से मजबूर ' असे म्हणण्याची वेळ येते . grand हॉवर्ड हॉटेल त्याच्या भव्यता , स्वच्छता व उत्कृष्ट वास्तुरचनेचा नमुना म्हणून जि...
मी आणि पुस्तके                  पुस्तकांसाठी मला नेहमीच झगडावे लागले आहे. अनेकवेळा मला हवे असलेले पुस्तक मिळत नाही तेव्हा मनाची होणारी घालमेल ही कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. ग्रंथपाल व्यक्तींना तर,"कुठून आली ही बया!"असेच वाटत असावे. अनेकवेळा हवे ते पुस्तक नाही मिळाले तर होणारी चिडचिड वेगळीच. अशाच काही पुस्तकांविषयीच्या मजेशीर आठवणी. आकाशवाणीवर 'माझे आभाळ तुला घे ' हे गीत चालू असताना अनेक गतस्मृतींना उजाळा देऊन गेले .या गीताने अनेक अडचणीतून दिलेली साहित्यभूषण परीक्षेची आठवण करून दिली .मी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानची परीक्षा देण्याकरिता नाव नोंदणी केली .ही परीक्षा मे महिन्यात घरूनच उत्तरपत्रिका लिहून दयायची असते .परंतु परिक्षेच्या कालावधीत मला अचानक गोव्यातील साखळीम या गावी जावे लागले .मी गोव्याहून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात फोन केला असता ,फोन लेखिका भावनाताई भार्गवे यांनी घेतला असता त्यांना मी माझी अडचण सांगितली .त्यांनी माझी अडचण जाणून मला साखळीमच्या पत्त्यावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिक...
सर्व रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा नमस्कार. सर्वांनी माझ्या ब्लॉगला चांगल्याप्रकारे पसंती दिली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद! अनेक वाचकांनी फोन करून व व्हॉटसएपवर प्रतिक्रिया देताना विचारले की आम्ही ब्लॉगवर कमेंटस पाठवली पण पोस्ट झालीच नाही. तरी सर्व रसिक वाचकांना मी विनंती करते की मीही आताच कुठे ब्लॉग लिहिण्यास सुरवात केली आहे त्यामुळे मलाही बरीचशी फंक्शनस अजून चांगल्याप्रकारे माहिती झाले नाहीत. आपण जर कमेंट बॉक्समध्ये 'कमेंट' लिहिली तर 'पब्लिश' या शब्दावर क्लिक केले तरच ती पोस्ट सेंड होते अन्यथा ती सेंड होत नाही. सर्व रसिक वाचकांनी मनमोकळेपणाने विचारले त्यामुळे खूप आनंद वाटला. तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे नाव व गावाचे व शहराचे नाव कमेंटच्या खाली अवश्य लिहावे कारण मी माझ्या पुस्तकात मला प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांची नावे आवर्जून लिहित असते. माझ्या पूर्वीच प्रकाशित झालेल्या तीनही पुस्तकात मी वाचकांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपण स्वतःचे नाव व गावाचे, शहराचे नाव अवश्य टाकावे. पुन्हा एकदा धन्यवाद!

बोच

बोच  कुणी दलितांचा कैवारी म्हणूनी   हिणविती मजला   कुणी घटनेचा शिल्पकार म्हणूनी   उदो उदो करती माझा   कुणी धर्मांतर करणारा म्हणूनी   दुर्लक्षंती मजला   कुणी भारतरत्न म्हणूनी   गौरविती मजला   कुणी बौद्धवादी म्हणूनी   झिडकारिती मजला   कुणी बुद्धिवंत म्हणूनी   ओळखती मजला   कुणी न म्हणती भारतीय मजला   ही खंत लागली जीवाला   कुणी न म्हणती माणूस मजला   ही बोच लागली जीवाला
पुस्तकांच्या जगात                               मनाची पकड घेणारी पुस्तके तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात नि असेच एक पुस्तक ' गेले लिहायचे राहून.' खरंच हे पुस्तक वाचताना जाणवते की अजून खूप काही लिहायचे राहूनच गेले आहे . लेखक विनायक पाटील यांच्या अनुभवांचा खजिना हा न संपणारा आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना हमखास होत असते . खरे तर हे पुस्तक फार पूर्वीच प्रकाशित व्हायला हवे होते परंतु उशिराने का होईना हे पुस्तक प्रकाशित झाले आणि समाजातील सर्वच घटकांसाठी ते किती उपयुक्त आहे याची जाणीव झाली . हे पुस्तक म्हणजे राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर जसा प्रकाश टाकते तसेच ते कृषी क्षेत्रालाही समृद्ध करते नि सरकारी व शैक्षणिक कार्य प्रणालीवरही भाष्य करते व समाजाला उन्नतीचा मार्गही दाखवते . प्रत्येक घरी विनायक पाटील यांचे ' गेले लिहायचे राहून ' हे पुस्तक संग्रही असावे , असे हे पुस्तक वाचताना सारखे वाटत असते . या पुस्तकातील १०२ अनुभव हे लेखकाच्या प्रांजळपणाचे निदर्शक होय . संपूर्ण महाराष्ट्र विनायक ...
Image
मराठी अस्मिता                           पुण्याला अनेकवेळा येणे व्हायचे पण पुण्याला येऊन सिंहगड किल्ला पाहणे काही व्हायचे नाही . प्रत्येक वेळेला ठरवायचे की यावेळेस पुण्याला गेलो की सिंहगड किल्ला पाहायचाच पण हा ' च ' काही पाहण्याचा योग आणीत नव्हता त्यामुळे ' च ' जोडूनही उपयोग नव्हता . शेवटी मनात म्हटले , जाऊ दया . जेव्हा आपलं आणि सिंहगडाचं गोत्र जुळून येईल त्यादिवशी भेटीचा योग येणारच आणि खरोखरच एके दिवशी ध्यानीमनी नसताना माझी लेक म्हणाली , " आज रविवार आहे आपण सर्वजण सिंहगडावर जाऊ या , गड चढताना सगळ्यांचीच दमछाक होत होती तर काही तरूण मुले भराभर गड चढून जात होती . काही मुले मात्र चार - पाच मुलींना पाहून रेंगाळत आणि शेरेबाजी करीत गड चढत होती तेव्हा त्या मुलींसोबत आम्हांला हळूहळू गड चढणे भाग पडले . त्या मुली आम्हांला म्हणाल्या , " काका , काकू , तुम्ही आमच्यासोबतच राहा ." आम्ही त्यांची विचारपूस केली असता कळले की , त्या पाची मुली बहिणी होत्या . आम्ही पाच बहिणी असे म्हणताच , त्या एका सुरात म्हणाल्या , आम्...
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि सोशल मिडीयावर उलटसुलट पोस्ट वाचून तशी करमणूकच झाली. आम्ही सगळेच कसे एकाच व्यक्तीकडून न्यायाची अपेक्षा करीत असतो. आम्ही सज्ञान होतो म्हणजे नेमके काय होतो. सज्ञान झालेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या न्यायासाठी स्वतःच लढणे आणि सक्षम असणे. परंतु आमचे दुर्देव असे की, आम्हांला सगळ्याच गोष्टी आयत्याच हव्या असतात. आयुक्त तुकाराम मुंढे हे सहा महिन्यातच का असेना त्यांचे काम चोखपणे बजावून गेलेत. आता मात्र नागरिकांनी काय करायचे हे नागरिकांनीच ठरवावे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व जनतेने निवडून दिलेले जनतेचे सेवक(पंतप्रधानांच्या भाषेत) जर आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत नसतील तर त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे प्रत्येक महापालिकेत सहा महिने कार्यरत असणे हीच त्यांची खरी भूमिका आहे. बेशिस्त लोकांना शिस्त लावणे व जनतेला जागरूक करून जाणे नि पुढील येणाऱ्या आयुक्ताला मी केलेल्या कामावर बोळा फिरवू नकोस याची जाणीव करून देणे हाच त्यांचा उद्देश आहे. चोखपणे काम ...
' स्वच्छ नाती , स्वच्छ भारत '   सुषमा : अरे , बारा वाजायला आलेत , आत्ता मुलांची शाळेतून येण्याची वेळ होईल , भरभर आवरावे लागेल , चला स्वयंपाकाला लागू या !  सुषमा : ( सुषमा भाजी चिरते आणि तितक्यात सुरी बोटाला लागते आणि ओरडते ) आई गं ... ,  सासूबाई : काय झालं गं सूनबाई ! ( सुनेचा कापलेला बोट बघून ) अरे देवा ! हे काय केलंस गं ! जरा बघून तर काम करायचे ना !  सुषमा : अहो आई , मुलं येतील म्हणून ते घरी येण्याच्या आत जेवण तयार झाले की गडबड होणार नाही पण भलतीच गडबड होऊन बसली . सासूबाई : ( हळद शोधून सुनेच्या जखमेवर लावतात ) सुषमा : अरे देवा ! आई गं ... किती आग आग होत आहे !  सासूबाई : (जखमेवर हळद लावता लावता ) आता पाण्यात हात नको घालूस , जा तिकडे बैस , मी करते आज स्वयंपाक .  सुषमा : अहो आई , तुम्हांला सवय नाही आता स्वयंपाक करायची , मी करीन थोड्या वेळाने . सासूबाई : नको , मी करते हळूहळू , एवढे वर्षांची सवय आहे गं , माणूस काही विसरत नाही त्याचे काम ! एवढेच आहे की पूर्वीसारखे भरभर काम करायला जमत नाही एवढेच .  सुषमा : आ...
बहुरूपी                    तो आज माझ्यासमोर आला आणि मी बघतच राहिले त्याचा नखरेलपणा असा काही की विचारूच नका. बिच्चाऱ्या कॉलेजकन्यका देखील त्याच्यापुढे माघार घ्यायच्या. त्याचे रूप जेव्हा पाहावे तेव्हा वेगळेच. कॉलेजात जाणारी तरुणीदेखील दिवसाला चार-चार ड्रेस बदलत नसेल परंतु हा मात्र मॉडेलप्रमाणे वेगवेगळा ड्रेस परिधान करून तुमच्यापुढे हजर. जेव्हा पाहावे तेव्हा वेगळेच रूप घेऊन उभे ठाकणार. कधी तो पांढऱ्या सफेद वेशात थोडीशी लाली कमी लावून तर कधी अगदीच लालभडक वेशात. कधी थोडंसं लोशन कमी लावून तर कधी अगदीच काळा नाहीतर एकदम निस्तेज, पावडर कमी, लोशन कमी, फाउंडेशन, मस्करा कधी आहे तर कधी नाही काय वर्णावा त्याचा नखरा! तरी असे असूनही महाशय सर्वांना अगदी हवाहवासा. त्याच्यात काय एवढी जादू आहे की, भल्याभल्यांना त्याचा मोह पडावा. त्यादिवशी हळदीकुंकवाला सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या तेवढ्यात निता म्हणते,"अगं बघ तर किती पाणचट आहे." आता त्याला बिच्चाऱ्याला पाणचट पदवी तरी का द्यावी? काल हीच निता त्याला 'किती कडक आहे', असे म्हणत होती तर परवा बि...

'अर्ध्या रात्री शुभेच्छा!'

Image
        अर्ध्या रात्री शुभेच्छा                          दिवाळीच्या दिवशी सगळी आवराआवर करता करता रात्रीचा म्हणजेच पहाट पाडव्याचा एक वाजला आणि मोबाईल चार्जिंगला   लावताना मेसेज पाहून थक्कच झाले. ग्रुप स वर एकवेळ मेसेजस् नाही पाठवलेत  तर चालून जाते पण जवळच्या नातलगांचे व स्नेह्यांच्या संदेशांना उत्तर न देणे म्हणजे कृतघ्नपणाच होय. शेवटी झोप येत असतानाही मनाची तयारी करून दिवाळीच्या शुभेच्छा उशीराने का होईना दिल्यात आणि काय दुसऱ्या दिवशी काही नातलग व  मित्र मैत्रिणींनी फोन करून तर काहींनी मेसेज करून विचारलेच,"काय गं, एवढ्या रात्री शुभेच्छा!" काहीजणांनी तर 'अर्ध्या रात्री शुभेच्छा' माझ्या लहान बहिणीची जाऊ समिधा माझ्या बहिणीला म्हणते कशी,"ताई, बाईपण ऑनलाईन आहेत." तिने लागलीच मला रिप्लाय दिला. त्या पाचही  जावांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्यांना ठाऊक आहे की दिवाळीचे चार दिवस झोपेच्या वाटेला जायचेच नसते. पण इतरांना कुठे ठाऊक असते,मग काय सगळ्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. आमच्य...

गावाची शान - गावाचा पार

                  गावाची शान-गावाचा पार             आम्ही लहान असताना पाराजवळ पिंपळाच्या झाडाखाली सागर गोटया खेळायचो त्यामुळे पार आणि पिंपळाचे झाड या दोन गोष्टींशी आमचे एक भावनिक नाते जोडले गेले ते कायमचेच . धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी या गावाचे भद्रावती नदीने दोन भाग केले आहेत . भद्रावती नदीने एका काठावरील गावाला उंचावर नेऊन ठेवले आहे तर दुसऱ्या काठावरील गावाला अगदी खाली आणून ठेवले आहे . उंचावर असणाऱ्या गावाला नेमके उलट नाव मिळाले आहे . उंचावर असणाऱ्या गावाला ' खालनं गाव ' व खाली असलेल्या गावाला ' वरनं गाव ' अशी नावे येथील गावकऱ्यांनी दिली आहेत . असे उलट नाव देण्यामागे कदाचित या गावाचा बाजाराच्या म्हणजेच तालुक्याच्या गावाशी असलेला संबंध कारणीभूत असावा कारण तालुक्याच्या गावाच्या दिशेला असणाऱ्या गावाला ' वरनं गाव ' असे नाव पडले असावे . खरे तर भौगोलिक दृष्टया पाहिले तर ते गाव ...