हरवलेल्या बॅगेला धन्यवाद
हरवलेल्या बॅगेला धन्यवाद चि. स्वप्नील व दीपश्री दोघेही १२ डिसेंबर २०१८ ला स्वीडनला जाण्यासाठी मुंबईहून सकाळी दहा वाजता विमानाने निघालेत नि कार्गोमध्ये चार बॅग्ज टाकून दोन बॅग्ज त्यांनी स्वतःजवळ ठेवल्यात. रात्री साडेबाराला (भारतीय वेळेनुसार) स्टॊकहोमला पोहचले असता कार्गोने आलेल्या चार बॅगांपैकी फक्त तीनच बॅग्ज मिळाल्यात नि एक बॅग काही मिळाली नाही तेव्हा त्यांनी एअरपोर्टवर नियमानुसार एक बॅग न मिळाल्याची नोंद केली नि फार्म भरून कार्यवाही पूर्ण केली. स्वप्नील यापूर्वी दोनदा स्वीडनला जाऊन आल्यामुळे त्याला स्वीडनच्या वातावरणाची तशी सवय झालेली होती पण दीपश्री (सून) प्रथमच स्वीडनला जात असल्यामुळे तिच्यासाठी सर्वकाही नवीनच होते. त्यात बॅग हरवल्याची खंत होतीच. रात्री तिच्याशी बोलताना तिला सांगितले, "बॅग हरवल्याचे दुःख वाटून घेऊ नकोस, तुम्ही एवढ्या लांब सुखरूप पोहोचलात याचाच आनंद खूप आहे. बॅग सापडली तर ठीक आहे, नाहीच मिळाली तर वस्तू गेल...