Posts

Showing posts from 2020
 नमस्कार रसिक श्रोत्यांनो, कोरोनाने जगभर काहूर माजवले आहे नि माणसांची मती कुंठित झाली आहे. अशावेळेस स्वतःला आशावादी ठेवून स्वतःची व इतरांची काळजी कशी घ्यायची? हा आपल्या सर्वांसमोर पडलेला प्रश्न आहे. परंतु प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच. जेथे प्रश्न आहे तेथे उत्तर हे असणारच हे लक्षात घेऊन आजच्या समस्येवर मार्ग काढू या. काही कोरोनाबाधित लोकांना भीती वाटते ती एकटे राहण्याची पण अशावेळेस मला मात्र माझ्या वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवते आणि ते बळही देत असते. कोणतीही समस्या जेव्हा समोर उभी ठाकते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, "माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो." खरे तर वरवर पाहता हे वाक्य निराशावादी वाटण्याची शक्यता आहे पण त्याच्या मुळाशी गेले की लक्षात येते की, माझी अडचण, माझी समस्या ही माझी आहे आणि तिला सामोरे जाणे, त्यावर मार्ग शोधणे हे माझेच काम आहे. त्यांच्या या एका वाक्याने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अपेक्षा कधीच केली नाही. कदाचित यामुळेच धीर, संयम हे गुण आपोआपच येत गेलेत.          मला वाटते, करोनाबाधित बांधवांनी न घाबरता, एकटेपणाचे भय न बाळगता आले...

भाभूमायची टोपली

  नमस्कार रसिक वाचकांनो व श्रोत्यांनो, आज मी तुम्हांला १९७५च्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाची ओळख माझ्यापरीने करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी जीवनाचाही कधी कधी आपल्याला उबग येतो नि मग अशावेळेस अस्सल ग्रामीण जीवनाची मजा अनुभवण्यात एक वेगळाच आनंद असतो. आज आपण 'भाभूमायची टोपली' याविषयी जाणून घेऊ या. भाभूमायची टोपली इतकी खास आहे की, तिचं संपूर्ण आयुष्यच त्या टोपलीत समाविष्ट झाले की काय! असे पाहणाऱ्याला वाटत असते. चला तर मग आज आपण भाभूमायची टोपली वाचण्यापेक्षा ऐकू या. खालील लिंकवर आपण 'भाभूमायची टोपली' ऐकू शकतात. धन्यवाद! https://youtu.be/j2d9P9V7cKY https://youtu.be/KlWU4cJtRn4

क्षमा असावी

सर्व रसिक वाचकांना, सप्रेम नमस्कार. मध्यंतरीत बऱ्याच दिवसांत मी ब्लॉगवर पोस्ट टाकू शकले नाही त्याबद्दल क्षमा असावी. बरेचसे वाचक माझ्या ब्लॉगवर पोस्ट वाचत आहेत हे पाहून आनंद वाटला नि पुन्हा पोस्ट टाकण्यास उत्साह आला. आता आपण माझ्या ब्लॉगवर खालील लिंकवर क्लिक केल्यास यूट्यूबवर माझे साहित्य कोणतेही काम करता करता ऐकू शकतात.  धन्यवाद! https://youtu.be/j2d9P9V7cKY

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या

                 वाचन एक चांगली सवय            आज २३ एप्रिल २०२०, जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने मला लिहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या रसिक वाचकांचे आभार मानणे आवश्यक आहे. वेळोवेळी मला अभिप्राय देणाऱ्या नातलगांचे, मित्रमैत्रिणींचे आणि रसिक वाचकांचे आभार मी माझ्या आधीच्या पुस्तकात वाचकांच्या नावासह मानले आहेतच पण आज मात्र एकाच लेखावरील प्रतिक्रियेविषयी तेही अनोळखी वाचकांविषयी लिहून त्या सर्वांचे आभार पुस्तक दिनानिमित्त मानत आहे.             वाचन करणारे वाचक कमी झालेत, अशी ओरड सर्वत्र होत असते पण मला मात्र नेहमीच याच्या उलट अनुभव येत असतो. आज ललित वाचन करणारे वाचक कमी झाले असे दिग्गजांचे निरीक्षण सांगते परंतू मी जेव्हा जेव्हा ललित लेख लिहला तेव्हा तेव्हा मला वाचकांच्या प्रतिक्रिया सर्वात अधिक प्रमाणात आलेल्या आहेत.       दै. गांवकरी, दै. सकाळ, दै. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दै. दिव्य मराठी या सर्व व्रुतपत्रात जेव्हा जेव्हा माझे लेख प्रकाशित झालेत तेव्हा तेव्हा अनेक व...

सूर्याचे रंग चोरणारा गुलमोहर

Image
         करोनाशी सामना करू या जगभरातल्या रसिक वाचकांनो, दिवसेंदिवस करोनाने कहर मांंडला आहे. काही ठिकाणाहून आलेल्या बातम्यांनी मन खंतावले. अनेक ठिकाणी करोनाची लक्षणं आहेत हे जाणवल्यावर काही तरूणांनी आत्महत्या केली हे ऐकून व वाचून खूपच वाईट वाटले. चला तर मग करोनाशी लढायला आपल्याला गुलमोहर कितपत मदत करू शकतो. ©ज्योत्स्ना पाटील.

धन्यवाद वाचकांनो

नमस्कार रसिक वाचकहो, मी माझ्या ब्लॉगचे नाव बदलल्यामुळे ब्लॉग बरेच दिवस कार्यरत नव्हता त्याबद्दल नियमितपणे ब्लॉग वाचणाऱ्यांची गैरसोय झाल्याबद्दल क्षमा असावी. आता तर करोनाने सगळ्या जगभर कहर माजविल्यामुळे व सततच्या त्याच त्याच बातम्या ऐकून भीती व नैराश्य या दोन गोष्टींनी सर्वच परेशान झाल्यामुळें हलकंफुलकं आणि जगण्यावर विश्वास ठेवता येईल असे लेखन वाचण्याकडे वाचकांचा कल वाढत आहे त्यामुळे मी माझ्या परीने असे लेखन पुरवून आपली जगण्याविषयीची आसक्ती कशी वाढेल याचा विचार करून लेखन करण्याचा यापुढे प्रयत्न करीन. आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व! आपण माझा ब्लॉग वाचून मला लिहण्यास प्रव्रुत्त करतात त्याबद्दल मनापासून जगभरातल्या ब्लॉग वाचकांना धन्यवाद!     वाचत राहा, मनाला रिफ्रेश करीत राहा, घरात राहण्याचा आनंद स्वतः घ्या आणि आपल्या परिवाराला आनंदित ठेवा. मान-अपमान हे सर्व आपल्या मनाचे नसते खेळ असतात त्याला तिलांजली द्या आणि आजूबाजूचा निसर्ग आपल्या घराच्या खिडकीतून न्याहळा नि निसर्गाकडून नम्रता व देणे या दोन गोष्टी शिकू या नि स्वच्छ मनाने जगू या. काळजी घ्या, स्वस्थ व निरोगी राहा याच शुभेच्छा ...

खाली पडलेला मोबाईल

खाली पडलेला मोबाईल                  गेल्या वीस वर्षांमध्ये प्रवास करताना आम्हांला तीन मोबाईल सापडलेत आणि हे तिन्ही मोबाईल सुखरूपपणे त्यांच्या मालकांपर्यंत पोहचते करताना जो काही त्रास झाला तो आम्हांलाच ठाऊक आहे. त्यातलाच हा एका मोबाईलचा अनुभव!           दि. २५ सप्टेंबर २०१३ रोजी मी व माझे पती अशोक स्तंभाकडून एस. टी. कॉलनीकडे येत असताना दिवट्या बुधल्यांच्या सर्कलजवळ आमच्या गाडीच्या पुढेच रस्त्यावर एक मोबाईल खाली पडला. मोबाईल आमच्या गाडीच्या पुढे जाणाऱ्या रिक्शेतून पडला होता. मोबाईल आमच्या कारच्या चाकाखाली येणार तितक्यात  दिलिपने  मागच्या गाड्यांचा अंदाज घेत गाडी वळवली आणि गाडीखाली येणाऱ्या मोबाईलला मोठया शिताफीने वाचविले. मोबाईल तर सहीसलामत राहिला परंतु वाचवलेला मोबाईल त्याच्या मालकाकडे पोहचविण्याचे काम करणे भाग होते म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि मागच्या गाडयांनाही ब्रेक दाबण्याशिवाय पर्याय नव्हता. गाडी थांबताच मी गाडीतून उतरले आणि रस्त्यावर पडलेला...

सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा

Image
सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा                      आपल्याकडून कधीकधी जी चूक होत असते ती आठवल्यावर आपल्यालाच हसू येत असते. अशीच एक चूक माझ्याकडून सिक्कीमच्या भूमीत झाली आणि आजही आठवण येताच माझे मलाच हसू येत असते. अर्थात अशी चूक माझ्याकडून झाली नसती तरच नवल घडले असते कारण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मी माझी राहतच नाही. निसर्गाचं नि माझं कोणतं असं अतूट नातं आहे ते मलाही कळत नसते. सिक्कीमचा निसर्ग तर बघायलाच नको! हिमालय पर्वताच्या उंचचउंच रांगा, खोल दऱ्या नि त्यातून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांच्या पाण्याचे झालेले बर्फ, उंचचउंच झाडी नि तितकीच शांतता! अशा या निसर्गरम्य परिसरात वावरताना आपणही तितकेच निरागस बालक झालो नाहीत तर आपल्याइतके कर्मदरिद्री कुणीच नसावे, असे माझे प्रामाणिक मत आहे.                          आम्ही भल्या पहाटे उठून पेलिंग सोडले आणि 'लाचुंग' येथे जाण्यासाठी निघालो. निघण्यापूर्वी पेलिंग येथून आम्ही कोट, ग्...