श्रीजाचे जावळ नि आमच्या गप्पा आठ दिवसांपूर्वी दिपश्रीला फोन केला असता आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मला नेमकी तिच्या छोट्या मैत्रिणीची आठवण आली नि मी तिला विचारले, "तुझी टिल्लू, काय म्हणते?" असे विचारताच दिपश्री उत्साहाने म्हणाली, "अहो आई, तिचे जावळ काढले तर ती आता खूपच वेगळी दिसते. आधी ती किती छान दिसायची नि आता तिचे केस काढलेत तर खूपच वेगळी दिसते. बाळ लहान असतानाच बाळाचे जावळ काढायला हवे." तिचे श्रीजाच्या जावळाविषयीचे बोलणे ऐकताच मला हसूच आले. दोन तीन महिनाचे बाळ किती नाजूक असते नि त्यात बाळाला पुरेसे जावळ न येताच बाळाच्या कोवळ्या डोक्यावर कैची चालवणे शक्य तरी होईल का? "अगंबाई, बाळ बसायला लागल्यावर आणि त्याच्या डोक्यावर एक वर्षानंतरच बाळाचे जावळ काढतात." मग काय बाईसाहेब स्वतःच्या जावळ काढण्याच्या कल्पनेवर स्वतःच हसायला लागल्या. "श्रीजा जावळ काढताना रडली होती का गं?" मी असे विचारताच ती पुन्हा हसायला लागली. "आमचे हे नव्हते का, श्रीजाच्या पप्पांना मार्गदर्शन करायला. अहो आई हे सुमीतला इतके भारी सांगत होते की जसे काही चार-पाच पोर...
Posts
Showing posts from August, 2019
एक शाम चाओ प्राया के नाम
- Get link
- X
- Other Apps
सर्व रसिक वाचकांना, सप्रेम नमस्कार. माझे दोन्ही ब्लॉग नियमितपणे वाचणाऱ्या वाचकांमध्ये आता इतर देशातील वाचकांबरोबरच पोर्तुगाल, फिलिपिन्स, जपान, जर्मनी या देशातील वाचकही ब्लॉग वाचत आहेत याचा विशेष आनंद होत आहे. देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना मी मनापासून धन्यवाद देते! तुम्हां सर्वांमुळे मला लिहिण्यास प्रेरणा मिळत असते त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझ्या लेखातील न आवडणाऱ्या किंवा खटकणाऱ्या बाबींविषयी वाचकांनी आपली मते अवश्य कळवावीत कारण मला माझ्या लेखनातील त्रुटी जाणून घेण्यास वाचकांच्या मतांची नक्कीच मदत होईल. आशा करते की आपल्या सर्वांचे प्रेम व मार्गदर्शन मला नेहमीच मिळत राहील . ब्लॉगर, सौ. ज्योत्स्ना पाटील एक शाम चाओ प्राया के नाम ...
कालाय तस्मै नमः
- Get link
- X
- Other Apps
कालाय तस्मै नमः प्रवासाला निघाल्यावर कोण भेटेल आणि काय होईल हे सांगणे तसे कठीणच. आम्ही बँकॉकला जायला निघालो असता, आमचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे उत्सुकता होतीच आणि इतरांनी विमान टेक ऑफ होताना छातीत धडधड होते, भीती वाटते वगैरे बरेच काही काही सांगितले मी मात्र शांत कारण बऱ्याच मोठमोठ्या राईडसवर बसल्यामुळे हवेतल्या सगळ्या हेलकाव्यांचे अनुभव असल्यामुळे विमान प्रवासात फार काही विशेष नसावे अशी मनातल्या मनात कल्पना केलेली होती त्यामुळे मला मात्र विमानात बसल्यावर काहीही थ्रिल वगैरे वाटले नाही पण ढगातून विमान जात असताना मात्र असे वाटत होते की आपल्या आजूबाजूला बर्फ आहे की कापूस! आधीच मला पांढऱ्याशुभ्र रंगाचे नको तितके वेड आणि त्यात सर्वत्र पांढऱ्या रंगाची शुभ्र नैसर्गिक शाल पाहून असे वाटत होते की विमानाबाहेर सरळ उडी घ्यावी आणि ही पांढरीशुभ्र शाल लपेटून घ्यावी किंवा या ढगातून भन्नाट पळत सुटले तर काय होईल असे वाटून मन कुठल्याकुठे भरक...