Posts

Showing posts from May, 2019

बस्टचे जावळ

  बस्टचे जावळ                                 दि . २४ नोव्हेंबर २०१४ ला आम्ही पटायाच्या  विमानतळावर   पोहचताच आमची लक्झरी बस आणि आमचा गाईड बस्ट हजर होते. आमची चाळीस पर्यटकांची टीम आणि आमचा टूर मँनेजर अतुल भोबे व बस्ट अशी  ही बेचाळीस जणांची प्रवासी gang दहा दिवस धमाल करणार होती. अतुलने आमच्या गाइडचं 'बस्ट' नाव विचारताच सगळ्यांना आपण काही चुकीचे तर ऐकत नाही ना! असे वाटले. बस्टचे सर्वांनी 'बस' असे नामकरण एकमताने करून टाकले. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी एकमत करताना किती नाकीनऊ येते परंतु बस्टचे 'बस' असे नामकरण करताना एकमत व्हायला काहीच करावे लागले नाही म्हणजेच विनोद हा सर्वांच्या अंगी चांगलाच मुरलेला दिसतो असे दिसून आले. बस्टचे फक्त नावच आमच्या सहकाऱ्यांना खटकले नाही तर त्याची केशभूषासुध्दा आमच्या सहकाऱ्यांना खटकली. आता त्या बिच्चाऱ्या बस्टची केशभूषा तरी आमच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात का खुपावी! केस त्याचे स्वतःचे, त्याने ते कसे ठेवावेत हा त्याचा वैयक्तिक प्रश्न ...

आठवणीतील केशभूषा - अंबाडा

               आठवणीतील केशभूषा - अंबाडा                          १९८९ साली   आम्ही उधमपूरला माझ्या मोठ्या जेठकडे (त्यांना आम्ही आबा म्हणतो) गेलो असता तेथून आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलो. आमच्यासोबत माझे मोठे जेठ व जाऊही होते. आम्ही संध्याकाळी  पाच वाजता  कटरा येथून  वैष्णोदेवीचा  पर्वत  चढण्यास सुरुवात केली. जून महिन्यातील निरभ्र अशा वातावरणात आम्ही पर्वत चढत असताना देशभरातील पर्यटक आमच्यासोबत चालत होते. लहान मुलांपासून ते ऐंशी वर्षे वयाच्या वृद्धापर्यंत सर्वचजण एकाच उद्देशाने पर्वत चढत होते ते केवळ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. कुणी पायी चालत होते तर कुणी घोडयावर बसून तर कुणी पालखीत बसून तर कुणी पाठीशी लहान मुलांना घेत प्रवास करीत होते. पायी चालणारे स्वतःला चालता येत होते म्हणून नशीबवान समजत होते तर घोडयावर बसणाऱ्यांना वाटत होते जणूकाही आपण एखादे शूरवीर तर नाही ना! याउलट पालखीतून आरामात जाणाऱ्या भाविकांना वाटत होते, आमचे पाय सा...

अनुभूती निसर्गाची

Image
 अनुभूती निसर्गाची                                       दि . ३० ऑक्टोबर २०१४ ला आम्ही एर्नाकूलमहून सकाळी सात वाजता निघालो आणि चार तासात आलेप्पीला पोहचलो आणि  बँकवॉटर व हाऊसबोटची  चौकशी केली असता एका इसमाने आम्हांला एका हाऊसबोटच्या मालकाकडे नेले आणि त्याच्याशी विचारविनिमय करून आम्ही तीन कुटुंबियांनी एक हाऊसबोट बुक केली . आमच्या गाडया एका बंगल्याच्या आवारात पार्क केल्यात  आणि थोडेसे सामान घेऊन आम्ही हाऊसबोटमध्ये चढलो . हाऊसबोटमधील रूम्स खूपच छान होत्या . आमची हाऊसबोट सुरु होताच जो नजारा दिसला तो पाहून मन अगदी मोहून गेले . नेहमीच जमिनीवर राहणाऱ्या आमच्यासारख्या माणसांना पाण्यावर  राहण्याचा अनुभव नक्कीच वेगळा होता . पाणी म्हणजे जीवन हे ठाऊक असणाऱ्या आमच्यासारख्यांना  पाण्यावर जगणे व राहणे मात्र ठाऊक नसते . त्यामुळे दिवस व रात्र पाण्यात काढायची या निश्चयानेच आम्ही हाऊस बोटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला . जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी आणि त्या...

गड्या अपुला गांव बरा!

Image
  गड्या अपुला गांव बरा!                                                          दि . २७ डिसेंबर २०१४ ला आम्ही सकाळी ७ वाजताच तयारी करून पुकेतला हॉटेल disiut D २ मध्ये नाश्त्यासाठी डायनिंग हॉलमध्ये सर्वजण जमलो . नाश्त्यासाठी पंचवीस तीस पदार्थ असूनही काय घ्यावे आणि काय खावे ? असा प्रश्न सर्वांना पडलेला कारण नाश्ता म्हणताच पोहे ,उपमा ,मिसळ , भजी खाणाऱ्या महाराष्ट्रीयन माणसाची धाव ही खरे तर इडली , डोसा , उत्तपा ,छोले भटुरे आणि ब्रेड ऑम्लेटच्या पलिकडे जाणे तसे कठीणच असते . त्यामुळे सर्वजण प्लेट हातात घेऊन आपल्या आवडीचे काही मिळते का ? या शोधात इकडून तिकडे पाहत फिरत होते . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव होता की , दिसायला सर्वकाही छान आहे पण आपल्या खाण्यासाठी काहीच दिसत नाही . मांसाहारी व्यक्ती ब्रेड ऑम्लेट घेत होते परंतु त्यातही काहींना तेथील ऑम्लेटचा वास काही आवडला नाही तेव्हा वाटले आता या ऑम्लेटसाठीही एखादा डी . ओ . शोधायला पाहि...

पटाया टॉवर

Image
  पटाया टॉवर                              वर्षातून एखादाच चांगला चित्रपट पाहणे मला आवडते हे माझ्या मुलाला व मुलीला चांगलेच ठाऊक असल्यामुळे ' नीरजा ' चित्रपटाचे बुकींग करून आम्हांला चित्रपट पाहण्यास जायला सांगितले . ऑन लाईन बुकींग केल्यामुळे तसा मोबाईलवर मेसेज आला होताच . मुलांनी बुकींग केल्यामुळे कुठलीही सबब न सांगता चित्रपट पाहण्यास जाण्याशिवाय पर्यायच नव्हता . चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये आम्ही दोघेही चहा कॉफी काहीतरी प्यावे म्हणून बाहेर आलो आणि समोरून हातात पॉपकॉर्न घेऊन येणाऱ्या माहेश्वरी मॅडम दिसल्या आणि आनंदाने ओरडल्याच , " पाटील भाऊ , वहिनी !" जवळ येताच माहेश्वरी मॅडम म्हणाल्या , " वहिनी , पाठीमागे फिरा , मला तुमचे केस पाहू द्या . त्या बाबाची नजर तर नाही ना लागली . " त्यांच्या त्या वाक्याने आम्ही तिघेही थायलंडच्या आठवणीने पुन्हा हसलो .                 आजही तो दिवस आठवला की हसू येते त्याचबरोबर काही प्रश्न अनुत्तरित राहिलीत .  २...
वडा होता होता              माझ्या दृष्टीने स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच होय. स्वतःच्या मनाने वेगवेगळे प्रयोग करायचे आणि प्रयोगाच्या परिणामांना सामोरे जायचे. कधी यशाचा तर कधी अपयशाचा सामना करायचा. यश मिळताच आनंद आणि अपयश आले तर मग असंख्य प्रश्नांना सामोरे जायचे. कोणता पदार्थ अधिक झाला तर कोणता पदार्थ कमी झाला असेल? उष्णता कमी दिली गेली का?की अधिक दिली गेली? असे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उकल करण्याकरिता पुन्हा तो पदार्थ करून पाहण्याकरिता प्रचंड मानसिक तयारी करणे व पुन्हा खटाटोप करणे. अशाप्रकारे सर्व खटाटोपानंतर घरातील कुणाकुणाला हा पदार्थ आवडेल आणि कुणाला आवडणार नाही? याचे गणितीय आडाखे बांधण्याचेही महत् कार्य पार पाडावे लागते.               माझ्या या प्रयोगशाळेतील पदार्थ जसे अनेक प्रकारचे, अनेक चवींचे तसेच अनेक अनुभवांचे स्मरणही वेळोवेळी करून देणारे आहेत. माझ्या प्रत्येक पदार्थांबरोबर स्मरणांची बहुरंगी कारंजी सदोदित उचंबळत राहतात आणि त्यातूनच पुनःपुन्हा नवनवीन पदार्थ करून पाहण्याचे प्रयोग करण...
         पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा      आज सकाळी सकाळीच मालेगावच्या चिऊ ताईंचा फोन आला आणि त्यांच्याशी बोलताना आमच्या रावसाहेबांच्या आठवणींनी पुन्हा उचल खाल्ली. आज उठल्यापासूनच   एक वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे २मे २०१८ला सगळे अगदी आनंदात होते. चि. स्वप्नीलच्या लग्नानिमित्ताने माझे मोठे जेठ व जाऊबाई, लहान जाऊबाई, पुतण्या राकेश त्याची पत्नी कल्याणी, माझी आई, सासूबाई, नणंद, बहीण, बहिणीची मुलं, पूर्ती, स्वप्नील, असे अनेक पाहुणे घरात होते. इतके सगळे पाहुणे घरी असताना नि त्यातच आमचे रावसाहेब व कल्पना माई यांचा दोघांचा लग्नाचा वाढदिवस मग काय सगळ्यांनी त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले.         मुलांनी काका काकूसाठी केक आणला आणि सगळ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होताच रावसाहेब म्हणाले, " आजपर्यंत आमचा वाढदिवस साजरा झाला नव्हता. स्वप्नीलच्या लग्नानिमित्ताने आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस कायमचा लक्षात राहील." आणि रावसाहेबांचे बोल खरेच ठरले. जणुकाही त्यांना भविष्यातील काही गोष्टींचे ज्ञान झाले होते की काय! ...