गोव्याचा निसर्ग
गोव्याचा निसर्ग गोवा म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारं, तरुणांना वेडं करणारं, नवविवाहितांना धुंद करणार, तुम्हां - आम्हां सर्वांना नैसर्गिक सुख लुटू देणारं असं हे गोवा सदा चिरतरूण. गोवा म्हटले की उंचच उंच ताडामाडाची झाडे, आंब्या-फणसाची झाडे व सोबतच समुद्रकिनारा डोळ्यांसमोरून तरळून जातो. गोव्याचा निसर्ग चित्रकाराला आव्हान देतो तसाच तो कवींनाही कविता लिहिण्यास भाग पाडीत असतो तर फोटोग्राफरला नवनवीन पोझ देत असत. 'माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले' या बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळींचा खरा अर्थ जाणून घ्यायला गोव्यातच जायला हवे . आपल्याकडे हिरव्यागार पानांमध्ये पांढऱ्या रंगांची उधळण करीत फुलणारा बहारदार चाफा पाहण्याची डोळ्यांना सवय तेथे पाने नसलेला चाफा पाहून आश्चर्य वाटते . चाफ्याच्या झाडाला पानांचे जणूकाही वावडेच असावे . फक्त फुलांचे गुच्छ पाहून वाटते की हे गुच्छ झा...