डिसेंबरमधील जिलेबी
सर्व रसिक वाचकांना २०१९ या वर्षातील शेवटची पोस्ट ही बालपणीच्या आठवणीत रमणार करणारी असावी या उद्देशाने लिहित आहे. प्रत्येकाला बालपणीत भटकंती करावीशी वाटते. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी वेगवेगळ्या असल्यात तरी सर्वांचे बालपण अनेक गंमतीजमतीनी बहरलेले असते. चांगल्या वाईट अशा घटनांनी आपले जीवन व्यापलेले असते. चला, आज वर्षाच्या शेवटी आपल्या बालपणात भटकंती करून नवीन वर्षात नव्या उमेदीने भटकंती करण्याचा निश्चय करू या. डिसेंबरमधील जिलेबी डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा वर्षाचाही शेवटचा आठवडा आणि नाताळची धूम घेऊन येणारा आठवडा . कुणाला हा आठवडा ख्रिसमसच्या केकची आठवण करून देतो तर कुणाला सांताक्लॉजची सुंदर भेटीची आठवण करून देणारा असतो तर कुणाला चांगल्या वाईट क्षणांची आठवण करून देणारा असतो तर मला मात्र हा आठवडा गरमागरम जिलेबीची आठवण करून देत असतो . आम्ही लहान असताना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आमची आई आम्हांला सर्वांना सकाळी सात वाजताच गरमागरम जिलेबी बनवून पोटभर खाण्यास दयायची . आम्ही चोघे बहीण भाऊ आणि दोन चुलत...