कौटुंबिक आठवणी
कौटुंबिक आठवणी
मागील वर्षाच्या दिवाळीच्या आठवणी खैरनार पाटील परिवार कधीच विसरू शकत नाहीत. मागच्या वर्षी दिवाळी साजरी करताना कुणालाच वाटले नव्हते की, आमच्या कुटुंबातील एक सदस्य या वर्षाच्या दिवाळीत नसणार. काळाची चक्र केव्हा, कशी फिरतील ते कधीच कुणी सांगू शकत नाही. आम्ही सर्वजण दिवाळीत धमाल करीत असताना आमचे रावसाहेब सोफ्यावर बसून शांतपणे सर्वांचे निरीक्षण करीत बसले होते. त्यांना तसे बसलेले पाहून वाटते की त्यावेळी त्यांच्या मनात कोणते विचार चालले असतील. त्यांना वाटत होते का की, मी हे क्षण पुन्हा अनुभवू शकेल की नाही! कसल्या विचारात ते गुंतले होते. त्यांचे तसे शांत राहणे सर्वांनाच त्यावेळी जाणवले होते. आमच्या महाशयांनी दोन-तीनदा विचारले देखील, "रावसाहेब, कसला विचार करीत आहेस?" त्यांनी "काही नाही." एवढेच त्रोटक उत्तर दिले आणि आता वाटते, त्यांच्या मनात काय चालले होते त्यावेळेला? हा प्रश्न आजही मनात येतो नि मन कासावीस करीत असतो. माणसाचं जगणं इतकं क्षणभंगुर असू शकते, या विचारापाशी येऊन मनाला आवरणे कठीण होत असते. हा व्हिडीओ शूट करण्याची मला सुचले कसे याचेही मला आश्चर्य वाटते कारण सगळे उत्साहाने खेळत होते नि रावसाहेब सोफ्यावर शांतपणे बसून मुला-सूनांची, मुलींची व नातवंडांची गंमत पाहत बसले होते नि मी लागलीच माझ्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपून घेतलेत, याचे आश्चर्य वाटते.
©ज्योत्स्ना पाटील.
लेख वाचून जीव कासावीस झाला
ReplyDeleteसगळ्यांची तीच अवस्था, धन्यवाद!
Deleteरावसाहेब!!
Deleteआज तू आसपास आहे असाच भास होत आहे.
छान! मागच्या दिवाळीच्या आठवणी जाग्या झाल्या..
Deleteधन्यवाद आबा, आपण हे क्षण कधीच विसरू शकत नाही.
Deleteआठवणींच्या रुपाने ते आज ही आपणां सर्वांसोबत आहेत.
ReplyDeleteखरंच शिवानी, धन्यवाद सखी.
Delete