Posts

Showing posts from March, 2019

अखेर अरुणा भेटली ....!

Image
अखेर अरुणा भेटली ....!      अनेक वर्षांपासून 'मी अरुणा बोलतेय' हा एकपात्री प्रयोग पाहण्याची इच्छा होती. अनेक वृत्तपत्रांतून 'मी अरुणा बोलतेय' या एकपात्री प्रयोगाविषयी वाचण्यात येत होते त्यामुळे एक उत्सुकता होतीच. तसेच प्रयोग करणाऱ्या डॉ. प्रतिभा जाधव यांना एका संमेलनात सूत्रसंचालन करताना पाहिलेले, ऐकलेले होते त्यामुळेही त्यांचा एकपात्री प्रयोग पाहण्याची इच्छा अजूनच बळावली. मध्यंतरी रविंद्र मालुंजकर सरांनी याच एकपात्री प्रयोगाचे निमंत्रण पाठवले तेव्हाही 'मी अरुणा बोलतेय' पाहण्याची संधी हुकली नि मनाला एक रुखरुख लागून राहिली नि अचानक २४ मार्च २०१९ ला महिला साहित्य संमेलनात 'मी अरुणा बोलतेय' पुढ्यात येऊन उभी राहिली तेव्हा अंगावर जे शहारे आलेत आणि त्यानंतर अरुणाची कहाणी ऐकताना मन  इतके सैरभैर झाले की, पुन्हा तोच प्रश्न 'का?' 'असे का व्हावे?' एखाद्याच्या नशिबात इतकी सारी वेदना,अवहेलना का? डॉ.प्रतिभा जाधव निकम यांच्या अभिनयातून जिवंत होऊन पुढ्यात उभ्या राहिलेल्या अरुणाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमतच आपल्यात उरत नाही नि आपण स्वतःच माणूस ...

आठवणीतील पोहे

आजचा लेख आईची मैत्रिण श्रीमती वत्सलाबाई ठाकरे यांच्यासाठी. वत्सलाबाई या नेपाळ, चेतवन व पोखरा ट्रीपला गेल्या असून त्यांना हा लेख वाचता यावा म्हणून खास त्यांच्यासाठी व त्यांच्या मैत्रिणींसाठी. बाई, खूप धमाल करा नि तुमच्या जुन्या मैत्रीणींबरोबरचे धमाल क्षण आठवून भरपूर हसा.       आठवणीतील  पोहे                इ. स. १९९४ साली दिलिप यांनी मनमाडची नोकरी सोडून दिंडोरी येथे रूजू झाले होते त्यामुळे मनमाडचे घर सोडून आम्ही दिंडोरीला येण्याचा दिवस निश्चित झाला. आम्ही मनमाड सोडून दिंडोरीला जाणार म्हणून नांदापूरकर वहिनी व त्यांची जाऊ या दोघीजणी भेटायला आल्या. दोघींशी मनसोक्त गप्पा केल्या. माझ्या मुलाचा व मुलीचा त्या दोघींना चांगलाच लळा लागला होता. कोणतेही घर सोडताना शेजाऱ्यांशी दुरावण्याचे दुःख हे होतच असते. मला व दोघी नागपूरकर वहिनींना दुरावण्याचे दुःख होतेच. मनमाडचे घर सोडण्याच्या आदल्या दिवशी नांदापूरकर वहिनींनी आम्हांला सर्वांना नाश्त्यासाठी बोलावले. वहिनींनी नाश्त्यासाठी पोहे केले परंतु त्या पोह्यांमध्ये क...
Image
व्हॉटसअपवरील विहिरीच्या शोधा त    ऑक्टोबर २०१५ ला आम्ही कास पठार येथे गेलो आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनीच व्हॉटसअपवर साताऱ्याजवळील शिवकालीन विहिरीविषयी माहिती व विहिरीचे फोटो आलेत आणि ते पाहून मनाला सारखी चुटपूट लागून राहिली की विहिरीविषयीची माहिती दोन दिवस अगोदर आली असती तर नक्कीच आपण ती विहीर पाहायला गेलो असतो . बरेच दिवस व्हॉटसअपवरच्या विहिरीने मनात घर केले होते आणि योगायोगाने २४ जून २०१६ ला कोल्हापूरहून पुण्याकडे येताना साताऱ्याचा फलक दिसताच  व्हॉटसअपवरची विहीर मनात लख्खकन झळकली आणि पती महाशयांना सांगितले , " आपल्याला साताऱ्याजवळची विहीर पाहायला जायचे आहे . " मी असे म्हणताच , " ती विहीर कोठे आहे ? " आता आली का पंचाईत ! वर्षभरापूर्वीच्या   व्हॉटसअपवरच्या  मेसेजमधील सगळं काही आठवत होते परंतु त्या ठिकाणाचे नाव मात्र काही केल्या आठवेना . ज्यांना ज्यांना मी तो संदेश पुढे पाठवला होता त्या सर्वांना फोन करून विचारले की , " साताऱ्याजवळील शिवकालीन विहीर असलेले ठिकाण नेमके कोठे आहे ? " सगळ्यांनी माहीत नाही असे सांगताच , मी माझ्याच भ्रमणध्...

कौतुकभरली पुरणपोळी

सर्व रसिक वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! होळी रे होळी  पुरणाची पोळी  अशी बोंब मारीत होळीभोवती उड्या मारणारे सगळे सवंगडी आजही प्रत्येकाला हमखास आठवतात आणि बालपणाच्या मधुर आठवणी घेऊन येणारी होळी जीवनाला एका  वेगळ्याच रंगात न्हाऊन काढीत असते. मला मात्र माझ्या सर्व बालमैत्रिणींची हमखास आठवण करून देणारी होळी पुरणपोळीचीही वेगवेगळी तऱ्हा आठवण्यास भाग पाडते नि पुन्हा बालमैत्रीण संगीताची प्रकर्षाने आठवण करून देत असते.    कौतुकभरली पुरणपोळी                    मराठी माणूस दुसऱ्याचे कौतुक करण्यास फारसा उत्सुक नसतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे असे मला नेहमी वाटत असते कारण मला मात्र नेहमीच याच्या विपरीत अनुभव आलेले असल्यामुळे असावे. मला मात्र माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेणारे नातेवाईक व मित्रमंडळी भेटल्यामुळेही असावे. असाच एक पदार्थ मला नेहमीच कौतुक भरली थाप मिळवून देतअसतो आणि तो पदार्थ म्हणजेच महाराष्ट्रीयन जेवणातील खरीखुरी राणी असणारी अशी तुमची माझी  आवडती ' पुरणपोळी ...

Miramar beach in Goa

  गोवियन बीच - मीरामार                    ज्या मीरामार बीचच्या सप्तरंगी आठवणी होत्या त्याच मीरामार बीचच्या कालच्या आठवणींनी यापुढे एक कटू आठवणही स्मरणात राहील ती म्हणजे एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व कायमचे या बीचवर चिरनिद्रा घेत तेथील कणाकणात विलीन झाले. गोव्याचा लाल, भारताचा सुपुत्र मनोहर पर्रीकर यांचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. चौदा-पंधरा वर्षापूर्वीचा मीरामार बीच आणि कालचा टी. व्ही. वर पाहिलेला मीरामार बीचने दुःखाचा दिलेला झटका. एक सुसंस्कृत व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते तेव्हा प्रत्येकालाच हळहळायला लावून जात असते आणि हीच गोष्ट पर्रीकरांच्या बाबतीत झाली. त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला नि राजकीय क्षेत्राची फार मोठी हानीही झाली. मनोहर पर्रीकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!            ' गोव्यातील मीरामार ' बीच हा पणजी शहराजवळ असल्यामुळे मीरामार बीचवर गोवियन वातावरण अनुभवता येत असते . गोव्यातील इतर बीचवर ज्याप्रमाणे विदेशी पर्यटकांनी कब्जा करून घेतलेला दिसतो तसा...

Housewife

  आहे ना मग गंमत गृहिणी पदाची!                            पंधरा दिवसांपूर्वी डॉ. प्रतिभा जाधव यांचा फोन आला, "मॅडम, आपल्याला १७ मार्च २०१९ ला 'अभिव्यक्ती महिला साहित्य संमेलनाची' मिटींग घ्यायची आहे." तेव्हा मी प्रतिभा मॅडमला म्हणाले, "मॅडम, मी १७ तारखेला नाशिकला असेल की वर्ध्याला हे मला आत्ता तरी सांगता येणे शक्य नाही पण नाशिकला असले तर मी मीटिंगसाठी नक्कीच येईन." असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर आमची व्हाटसऍपद्वारे संदेशांची देवाणघेवाण चालू होती आणि योगायोगाने १७ तारखेला म्हणजेच आज मी नाशकात असल्यामुळे आज सकाळीच मिटींगला जाण्यासाठी तयारी करू लागले. सकाळी उठल्याबरोबर माझ्या घरापासून एक कि. मी. अंतरावर राहणाऱ्या स्वाती पाचपांडे या मैत्रिणीला फोन केला की, आपण दोघी दहा वाजता नाशिकरोडला मिटिंगसाठी बरोबर जाऊ या. तिला फोन करून मी माझ्या नवऱ्यासाठी व सासूबाईंसाठी स्वयंपाक करण्याच्या तयारीला लागणार तितक्यात मोबाईल वाजला, पलिकडून एक अनोळखी स्त्री बोलत होती, "तुमच्या एका नातलगाची तब्येत ठीक नाही ते तुमच्...

Friendship

  मैत्री  शिकवणारी आई              दोन घरांची  जेव्हा एकच सामाईक भिंत असते तेव्हा त्या घरातील गृहिणी या एकतर पक्क्या मैत्रिणी असतात किंवा पक्क्या वैरीणी तरी असतात . अशाच ब्राम्हणगावसारख्या खेडयातील एकच सामाईक भिंत असलेल्या घरातील दोन गृहिणी या पक्क्या मैत्रिणी . या दोघींची बरीचशी कामे ही  एकत्रच होत असत . अगदी दररोजची धुणी भांडी करणे असो , धान्य निवडणे असो की भाजी निवडणे असो . आठवडयातले दोन दिवस शनिवार , रविवार म्हणजे या दोघींचे चक्क स्वातंत्र्य उपभोगण्याचे दिवस . कारण दोघींचे नवरे शनिवारची सकाळची शाळा आटोपून जे पसार व्हायचे ते रविवारी रात्री उशीराच उगवायचे त्यामुळे या दोघींच्या घरी शनिवार, रविवारी एकच चूल पेटायची . दोघीजणी एकत्रच स्वयंपाक करायच्या . दररोज वरण भात भाजी पोळी व भाकरी असा साग्रसंगीत स्वयंपाक करून दोघींना कंटाळा यायचा म्हणून या दोघी शनिवार रविवारी दुपारचा जेवणाचा बेत करायच्या आणि तो म्हणजे गरम गरम मसालेदार खिचडी आणि गरमागरम शिरा . आणि मला वाटते दररोजच्या रुटीनचा कंटाळा त्या शनिवार रविवारच्या या आगळ्यावेगळ्...