पाण्याचे महत्त्व उशीरा कळले 

                         तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्हां भावंडाकडून पाण्याचा नळ किंवा विजेचा दिवा कारण नसताना चालू राहून गेलाच तर माझे वडील म्हणायचे," पाणी आणि वीज काही तुमच्या बापाची नाही आहे .ती राष्ट्राची संपत्ती आहे ." दुसरं कुणी असं बोललं असतं तर त्याला चौदावं रत्न दाखवलं असतं पण आमचे वडीलच 'आमचे बाप' काढायचे तेव्हा फिर्याद तरी कुणाकडे करणार?आमचे वडील पाण्याला आणि विजेला राष्ट्राची संपत्ती का म्हणतात ? तेच कळत नसे . नदीत तर पाहिजे तेवढे पाणी वाहून जाते तर मग नळाचे थोडेसे पाणी वाहून गेले तर आपले वडील एवढे चिडतात का ?असा प्रश्न आम्हां भावंडाना पडत असे .तीच गोष्ट विजेच्या बाबतीत .आणि राष्ट्रीय संपत्ती म्हणजे काय ? हा आणखी गोंधळात टाकणारा विषय .अर्थात कॉलेजला गेल्यावर सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळालीत .आम्हांला ज्या प्रश्नांची उत्तरे कॉलेजला गेल्यावर मिळालीत त्याच प्रश्नांनी आज किती गंभीर स्वरूप धारण केले आहे याची जाणीव होऊन वडिलांची पर्यावरण संरक्षणाची तीस पस्तीस वर्षापूर्वीची तळमळ लक्षात येते आणि त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो .ज्या काळी पर्यावरणाचे गांभीर्य फारसे कुणाच्या लक्षात आले नव्हते त्या काळात वडिलांनी स्वतःच्या शिक्षकी पेशाचा आदर करीत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरुकता निर्माण केली .भूगोल विषय शिकविताना इस्राईल देशाने खडकाळ जमिनीत शेती कशी केली ते सांगत आणि पस्तीस वर्षांपूर्वी आम्हांला जेव्हा आमचे वडील सांगत की भविष्यात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होईल तेव्हा आम्हांला ते खरे वाटत नसे पण आज मात्र त्यांचे शब्द खरे ठरू पाहतात तेव्हा प्रश्न पडतो की, काळाच्या पुढचा विचार करणाऱ्यांना समाज नेहमीच वेड्यात काढत असतो हीच खरी आमची शोकांतिका होय. आज मात्र अभ्यासक्रमात दहा गाभाघटकांमध्ये व दहा मूल्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा समावेश करूनही अनेक शिक्षकांना त्याचे गांभीर्य समजले नाही तेव्हा ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचणार ?हा प्रश्न पडतो .

Comments

  1. खुपखुप छान आहे

    ReplyDelete
  2. Respect for his vision . Climate change and water crisis are leading issues the world is facing now . It deserves more attention. And what you have said is completely true smart people always sounds crazy to dumb people .

    ReplyDelete
  3. आज असे खूप कमी शिक्षक आहेत जे पुढच्या समस्या जाणून आहेत आणि आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
    अप्रतिम लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या