कोंदण

         कोंदण    

विहीणबाई विनंती करते तुम्हांला  
थोडंसं जाणून घ्या माझ्या लेकीला 
तुमचा सासरचा पहिला दिवस 
नि माझ्या लेकीचा पहिला दिवस 
यात फक्त काळाचे अंतर आहे 
भावभावनांची चलबिचल तीच आहे 

विहीणबाई तुमच्या सासूबाई नऊवारीत
नि तुम्ही मात्र उठून दिसल्यात सहावारीत 
आज तुम्ही जरी असल्यात सहावारीत 
नि माझी लेक आधुनिक पोशाखात 
तरी फक्त पोशाखांची अदलाबदल झाली 
संस्कारांची  शिदोरी मात्र तीच राहिली 

दान करणारा दाता  श्रेष्ठ असतो 
हे  मनाशी तर बजावित असतो 
तरीही मग का कुणास ठाऊक 
कन्यादान करताना का होतो भावूक 
विहीणबाई मीही एकच मागणं मागते 
कन्यादानाला प्रेमदानाचं कोंदण मागते
©ज्योत्स्ना पाटील

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या