बोच
बोच
कुणी दलितांचा कैवारी म्हणूनी
हिणविती मजला
कुणी घटनेचा शिल्पकार म्हणूनी
उदो उदो करती माझा
कुणी धर्मांतर करणारा म्हणूनी
दुर्लक्षंती मजला
कुणी भारतरत्न म्हणूनी
गौरविती मजला
कुणी बौद्धवादी म्हणूनी
झिडकारिती मजला
कुणी बुद्धिवंत म्हणूनी
ओळखती मजला
कुणी न म्हणती भारतीय मजला
ही खंत लागली जीवाला
कुणी न म्हणती माणूस मजला
ही बोच लागली जीवाला
Very nice
ReplyDeleteThank you!
ReplyDelete