नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि सोशल मिडीयावर उलटसुलट पोस्ट वाचून तशी करमणूकच झाली. आम्ही सगळेच कसे एकाच व्यक्तीकडून न्यायाची अपेक्षा करीत असतो. आम्ही सज्ञान होतो म्हणजे नेमके काय होतो. सज्ञान झालेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या न्यायासाठी स्वतःच लढणे आणि सक्षम असणे. परंतु आमचे दुर्देव असे की, आम्हांला सगळ्याच गोष्टी आयत्याच हव्या असतात.
आयुक्त तुकाराम मुंढे हे सहा महिन्यातच का असेना त्यांचे काम चोखपणे बजावून गेलेत. आता मात्र नागरिकांनी काय करायचे हे नागरिकांनीच ठरवावे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व जनतेने निवडून दिलेले जनतेचे सेवक(पंतप्रधानांच्या भाषेत) जर आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत नसतील तर त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे हे प्रत्येक महापालिकेत सहा महिने कार्यरत असणे हीच त्यांची खरी भूमिका आहे. बेशिस्त लोकांना शिस्त लावणे व जनतेला जागरूक करून जाणे नि पुढील येणाऱ्या आयुक्ताला मी केलेल्या कामावर बोळा फिरवू नकोस याची जाणीव करून देणे हाच त्यांचा उद्देश आहे.
चोखपणे काम करणाऱ्या लोकांना घमेंडी, शिष्ट ही विशेषणे बहाल करणे ही कामचुकार लोकांची लक्षणे आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे किती काळ कार्यरत राहिलेत याला महत्त्व नसून त्यांनी काम कसे केले नि झोपलेल्या जनतेला खडबडून कसे जागे केले हे महत्त्वाचे आहे. जनतेला सुखी करण्याचा वसा घेतलेल्या शिवाजी महाराजांचा वारसा तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी चालवित आहेत याचा आनंद वाटतो नि आजच्या या शिवाजीला मनोमन सलाम!
कौतुकभरली पुरणपोळी
सर्व रसिक वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! होळी रे होळी पुरणाची पोळी अशी बोंब मारीत होळीभोवती उड्या मारणारे सगळे सवंगडी आजही प्रत्येकाला हमखास आठवतात आणि बालपणाच्या मधुर आठवणी घेऊन येणारी होळी जीवनाला एका वेगळ्याच रंगात न्हाऊन काढीत असते. मला मात्र माझ्या सर्व बालमैत्रिणींची हमखास आठवण करून देणारी होळी पुरणपोळीचीही वेगवेगळी तऱ्हा आठवण्यास भाग पाडते नि पुन्हा बालमैत्रीण संगीताची प्रकर्षाने आठवण करून देत असते. कौतुकभरली पुरणपोळी मराठी माणूस दुसऱ्याचे कौतुक करण्यास फारसा उत्सुक नसतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे असे मला नेहमी वाटत असते कारण मला मात्र नेहमीच याच्या विपरीत अनुभव आलेले असल्यामुळे असावे. मला मात्र माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेणारे नातेवाईक व मित्रमंडळी भेटल्यामुळेही असावे. असाच एक पदार्थ मला नेहमीच कौतुक भरली थाप मिळवून देतअसतो आणि तो पदार्थ म्हणजेच महाराष्ट्रीयन जेवणातील खरीखुरी राणी असणारी अशी तुमची माझी आवडती ' पुरणपोळी ...
एकदम सही
ReplyDeleteवस्तुस्थिती अचूक मांडली आहे..
ReplyDeleteThanks
Delete