मी आणि पुस्तके 

                पुस्तकांसाठी मला नेहमीच झगडावे लागले आहे. अनेकवेळा मला हवे असलेले पुस्तक मिळत नाही तेव्हा मनाची होणारी घालमेल ही कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. ग्रंथपाल व्यक्तींना तर,"कुठून आली ही बया!"असेच वाटत असावे. अनेकवेळा हवे ते पुस्तक नाही मिळाले तर होणारी चिडचिड वेगळीच. अशाच काही पुस्तकांविषयीच्या मजेशीर आठवणी. आकाशवाणीवर 'माझे आभाळ तुला घे ' हे गीत चालू असताना अनेक गतस्मृतींना उजाळा देऊन गेले .या गीताने अनेक अडचणीतून दिलेली साहित्यभूषण परीक्षेची आठवण करून दिली .मी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानची परीक्षा देण्याकरिता नाव नोंदणी केली .ही परीक्षा मे महिन्यात घरूनच उत्तरपत्रिका लिहून दयायची असते .परंतु परिक्षेच्या कालावधीत मला अचानक गोव्यातील साखळीम या गावी जावे लागले .मी गोव्याहून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात फोन केला असता ,फोन लेखिका भावनाताई भार्गवे यांनी घेतला असता त्यांना मी माझी अडचण सांगितली .त्यांनी माझी अडचण जाणून मला साखळीमच्या पत्त्यावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पाठविण्याची तसदी घेतली आठशे कि .मी .अंतर पार करून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुखरूपपणे पोहोचल्यात परंतु अभ्यासक्रमासाठी असलेल्या पुस्तकांचा नेमका दुष्काळ .साखळीमच्या ग्रंथालयात तर त्यातले एकही पुस्तक नव्हते .त्याच वेळेला बेळगावच्या साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका आलेली होती .पणजी ते बेळगाव असा प्रवास करून संमेलनाला हजेरी लावली आणि मला अभ्यासासाठी म्हणजेच साहित्यभूषण परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व पुस्तके संमेलनातील बुक स्टालवर पाहून मला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता .दीड हजार रुपयांची पुस्तके २००० साली बेळगाव साहित्य संमेलनातून खरेदी केलीत .त्यात कोरडे नक्षत्र ,व्यासपर्व ,कावळे आणि माणसे ,रीटा वेलिणकर अशी पंधरा सोळा पुस्तके विकत घेतली . ' माझे आभाळ तुला घे ' हे गीत प्रकाश होळकर यांच्या 'कोरडे नक्षत्र 'या काव्यसंग्रहातील असून आणि त्या काव्यसंग्रहातील प्रश्नांची उत्तरे मी लिहित होते तेही गोव्याच्या निसर्ग सान्निध्यात .सारे जग गोव्याच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असते तर याउलट माझ्यासारखा अजब प्राणी गोव्यात बसून साहित्यभूषणच्या परिक्षेची प्रश्नपत्रिका सोडवीत बसली होती तीही कोरडे नक्षत्र या काव्यसंग्रहावर .... 'माझे आभाळ तुला घे ' हे गीत गोव्याचा निसर्ग ,पणजी ते बेळगाव प्रवास ,बेळगावचे साहित्य संमेलन आणि साहित्यभूषणची परिक्षा असे सर्व डोळ्यांसमोर साकार करून जात असते .कोणत्याही गोष्टीचा संबंध कशाशी जुळेल हे सांगणे मानवी आकलनापलीकडे असते .

Comments

  1. कष्टाचे फळ गोड असते

    ReplyDelete
  2. आपल्या लेखनातून असे दिसते की आपलं आणि साहित्याचं खूप जुनं नातं आहे, आजच्या गुंतागुंतीच्या काळात आपल्या सारख्या लोकांमुळेच आज हा छंद ख-या अर्थाने काही प्रमाणात का होईना पण जोपासला जातोय याचा जास्त आनंद होतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
      आपण म्हणता ते अगदी खरे आहे. माझं आणि वाचनाचं नातं इयत्ता दुसरीत असल्यापासून आहे आणि मला आठवणारे पहिले पुस्तक इयत्ता पाचवीत असताना वाचलेले 'रानमुलगा रामू.'

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या