गरज पर्यावरण संस्कारांची 

                          एके दिवशी मी माझ्या मुलाला फोन केला असता तो उत्साहाने म्हणाला , " आई , आज मी एक पर्यावरणाचं रोपटं लावलं . " त्याचं पर्यावरणाचं रोपटं काही मला उलगडेना तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून आला . २००७ मध्ये माझ्या मुलाने चि . स्वप्नीलने पुण्याला सिंहगड कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला . कॉलेजच्याच होस्टेलमध्येच राहण्याची व्यवस्था होती . होस्टेलमधील त्याचे रुममेट हे गुजरातमधून आलेले होते . माझा मुलगा रूमबाहेर पडताना प्रत्येकवेळेस रूममधील पंखा व दिवा बंद करूनच बाहेर पडायचा तर याउलट त्याचे तिघे सहकारी पंखा व दिवे बंद न करताच बाहेर पडायचे . एके दिवशी माझा मुलगा व त्याचे तिघे सहकारी एकाचवेळी रूमबाहेर पडलेत आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या मुलाने पंखा व दिव्याचे बटन बंद केले असता त्याचे सहकारी त्याला म्हणाले , " पंखा व दिवा चालूच राहू दे, बंद करू नकोस, आपल्याला चाळीस हजार रुपये भरूनही गरम पाणी मिळत नाही, चांगले जेवण मिळत नाही त्यामुळे होस्टेलचे लाईट बिल येऊ दे चांगले दणकून, आपल्याला काय फरक पडतो." मित्रांच्या या वक्तव्यावर माझा मुलगा स्वप्नील त्यांना म्हणाला, "तुम्हांला फरक पडत नसेल पण मला फरक पडतो, मी जेव्हा इथला पंखा व दिवा बंद करेल तेव्हा या वाचवलेल्या विजेवर माझ्या गावातील एका घराचे तर दिवे लागतील. माझ्या नांद्रे या गावी पंधरा पंधरा तास वीज नसते. आपण विजेशिवाय थोडा वेळ राहू शकत नाही तेव्हा गावाकडचे लोक पंधरा तास विजेशिवाय कसे राहतात ! याची कल्पना करून पाहा. वीज ही कुणाची वैयक्तिक संपत्ती नाही तर ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचा वापर जपूनच केला पाहिजे." स्वप्नीलच्या मित्रांना स्वप्नीलचे म्हणणे पटले आणि त्यांनी एका सुरात म्हटले, "point is noted and save energy." त्या दिवसापासून स्वप्नीलच्या मित्रांनी वीज व पाणी बचतीचा मंत्र अंमलात आणला. स्वप्निलने होस्टेलमध्ये घडलेला प्रसंग जेव्हा सांगितला तेव्हा मला पाच सहा वर्षाचा स्वप्नील आठवला . माझ्या वडिलांनी आम्हांला वीज व पाणी बचतीचे महत्व वेळोवेळी सांगितले आणि माझे पतीही वीज व पाणी बचत करण्यात अग्रेसर . त्यामुळे आमच्याकडे वीज व पाणी बचत याविषयी सर्वच जागरूक असतात. आणि हाच संस्कार मुलांमध्ये असल्यामुळे स्वप्नील पाच सहा वर्षाचा असल्यापासून रस्त्याने जाताना कुठेही पाण्याचा नळ चालू असला की त्याच्या बाबांना गाडी थांबवण्यास भाग पाडायचा आणि स्वतः नळ बंद करायचा. त्याची नळ बंद करायला जातानाची दुडूदुडू चाल पाहून आम्हांला एक वेगळाच आनंद मिळायचा . संस्कार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप परावर्तीत होत जातात त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नसते तर फक्त आपण आपले काम चोखपणे पार पाडणे महत्वाचे असते, याचे प्रत्यंतर आले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये आपल्या आचरणातूनच येत असतात . राष्ट्रभक्ती , देशभक्ती ही सीमेवर जाऊन लढण्यापुरतीच मर्यादित नसते, याची पुन्हा अनुभूती आली .

Comments

  1. Really appreciate what he did as not so many youngsters are aware of these issues and don’t think that taking care of the natural resources is our responsibility.
    No doubt his parenting is done the right way!

    ReplyDelete
  2. आई वडिलांच्या संस्कार मुलांनी जपले यातच आईवडिलांना समाधान असच आपले जे लोक शहरात राहतात त्यांना गावाकडील परिस्थिती चा आडवा नसतो आणि कधीं अडचणी जाणल्या नसतात पण स्वप्नील ने जे केलं त्याच कौतुक करावे तेवढे कमी लेझ वाचून फार बरे वाटले अप्रतिमच

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या