सर्व रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा नमस्कार.
सर्वांनी माझ्या ब्लॉगला चांगल्याप्रकारे पसंती दिली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
अनेक वाचकांनी फोन करून व व्हॉटसएपवर प्रतिक्रिया देताना विचारले की आम्ही ब्लॉगवर कमेंटस पाठवली पण पोस्ट झालीच नाही. तरी सर्व रसिक वाचकांना मी विनंती करते की मीही आताच कुठे ब्लॉग लिहिण्यास सुरवात केली आहे त्यामुळे मलाही बरीचशी फंक्शनस अजून चांगल्याप्रकारे माहिती झाले नाहीत.
आपण जर कमेंट बॉक्समध्ये 'कमेंट' लिहिली तर 'पब्लिश' या शब्दावर क्लिक केले तरच ती पोस्ट सेंड होते अन्यथा ती सेंड होत नाही. सर्व रसिक वाचकांनी मनमोकळेपणाने विचारले त्यामुळे खूप आनंद वाटला. तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे नाव व गावाचे व शहराचे नाव कमेंटच्या खाली अवश्य लिहावे कारण मी माझ्या पुस्तकात मला प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांची नावे आवर्जून लिहित असते. माझ्या पूर्वीच प्रकाशित झालेल्या तीनही पुस्तकात मी वाचकांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपण स्वतःचे नाव व गावाचे, शहराचे नाव अवश्य टाकावे.
पुन्हा एकदा धन्यवाद!
कौतुकभरली पुरणपोळी
सर्व रसिक वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! होळी रे होळी पुरणाची पोळी अशी बोंब मारीत होळीभोवती उड्या मारणारे सगळे सवंगडी आजही प्रत्येकाला हमखास आठवतात आणि बालपणाच्या मधुर आठवणी घेऊन येणारी होळी जीवनाला एका वेगळ्याच रंगात न्हाऊन काढीत असते. मला मात्र माझ्या सर्व बालमैत्रिणींची हमखास आठवण करून देणारी होळी पुरणपोळीचीही वेगवेगळी तऱ्हा आठवण्यास भाग पाडते नि पुन्हा बालमैत्रीण संगीताची प्रकर्षाने आठवण करून देत असते. कौतुकभरली पुरणपोळी मराठी माणूस दुसऱ्याचे कौतुक करण्यास फारसा उत्सुक नसतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे असे मला नेहमी वाटत असते कारण मला मात्र नेहमीच याच्या विपरीत अनुभव आलेले असल्यामुळे असावे. मला मात्र माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेणारे नातेवाईक व मित्रमंडळी भेटल्यामुळेही असावे. असाच एक पदार्थ मला नेहमीच कौतुक भरली थाप मिळवून देतअसतो आणि तो पदार्थ म्हणजेच महाराष्ट्रीयन जेवणातील खरीखुरी राणी असणारी अशी तुमची माझी आवडती ' पुरणपोळी ...
अवश्य.
ReplyDeleteChan