रसिक वाचकहो,
सप्रेम नमस्कार.
माझी ब्लॉगवरील ही पोस्ट माझ्याकडूनच डिलीट झाली त्यामुळे ही पोस्ट पुन्हा पब्लिश करीत आहे.
खूप वर्षांपासून ब्लॉगवर लिहिण्याचे ठरवूनही योग येत नव्हता नि शेवटी काल म्हणजेच १६ नोव्हेंबर २०१८ ला मी ब्लॉगवर पहिला लेख लिहिला तो आमच्या घरचा दिवाळीचा सण याविषयी. तसेच मी माझ्या ब्लॉगला 'माझी भटकंती' असे नाव दिले कारण की भटकंती ही फक्त प्रवासापुरतीच सिमित नसून ती सर्वच क्षेत्रात असणारी भटकंती होय. कधी माझी लेखणी भावभावनांची भटकंती घडवेल तर कधी खाद्ययात्रेत असेल तर कधी नात्यागोत्यात भटकेल तर कधी देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींवर स्वार होईल तर कधी काव्य प्रांतात भटकेल तर कधी ललितच्या (साहित्यातला ललित हं, नाहीतर तुम्हांला दुसराच ललित वाटायचा) वाटेला जाईल तर कधी कथेत विहार करेल तर कधी नाटकातही विहरणार अशी सर्वत्र विहार करणारी मी व माझी लेखणी ब्लॉगवर फेरफटका मारणार तेव्हा तुम्ही रसिक वाचकांनी माझा रस्ता चुकल्यावर योग्य रस्ता दाखवण्याचे काम मात्र जरूर करावे तरच हा लेखन प्रवास सुखकर होईल नि इप्सित साध्य होऊन भटकंतीचा आनंद सर्वांनाच मिळेल.
धन्यवाद.
ज्योत्स्ना पाटील
कौतुकभरली पुरणपोळी
सर्व रसिक वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! होळी रे होळी पुरणाची पोळी अशी बोंब मारीत होळीभोवती उड्या मारणारे सगळे सवंगडी आजही प्रत्येकाला हमखास आठवतात आणि बालपणाच्या मधुर आठवणी घेऊन येणारी होळी जीवनाला एका वेगळ्याच रंगात न्हाऊन काढीत असते. मला मात्र माझ्या सर्व बालमैत्रिणींची हमखास आठवण करून देणारी होळी पुरणपोळीचीही वेगवेगळी तऱ्हा आठवण्यास भाग पाडते नि पुन्हा बालमैत्रीण संगीताची प्रकर्षाने आठवण करून देत असते. कौतुकभरली पुरणपोळी मराठी माणूस दुसऱ्याचे कौतुक करण्यास फारसा उत्सुक नसतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे असे मला नेहमी वाटत असते कारण मला मात्र नेहमीच याच्या विपरीत अनुभव आलेले असल्यामुळे असावे. मला मात्र माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेणारे नातेवाईक व मित्रमंडळी भेटल्यामुळेही असावे. असाच एक पदार्थ मला नेहमीच कौतुक भरली थाप मिळवून देतअसतो आणि तो पदार्थ म्हणजेच महाराष्ट्रीयन जेवणातील खरीखुरी राणी असणारी अशी तुमची माझी आवडती ' पुरणपोळी ...
Very nice
ReplyDeleteThank you so much!
Delete