कौटुंबिक ट्रिप 'द ऑर्कीड व्हिला'
(या
लेखात
लेखाच्या
गरजेनुसार
राजकीय
व्यक्तींची
नावे
घेतली
आहेत
त्याबद्दल
मी
त्यांची
क्षमा
मागत
आहे.आदरणीय
सुमित्रा
मॅडम,
रेणुका
मॅडम
यांच्याविषयी
मला
आदर
आहे.)
आमच्याकडे दिवाळीच्या कौटुंबिक ट्रीपची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात कारण सर्व मिळून तीस-पस्तीस सदस्य तरी दिवाळीला एकत्रित येत असतात आणि जो काही गोंधळ घालतात त्याविषयी विचारायलाच नको. दिवाळी महिनाभर पुढे असते तेव्हापासून माझ्या सासूबाईंची माझ्या पाठीमागे भुणभुण सुरू होते,"यावर्षी दिवाळी कुठे करायची?" यावर माझे उत्तरही ठरलेले असते,"आई, ते आत्ता नाही सांगता येणार. सगळ्यांना विचारून वेळेवर ठरवू आपण." मग काय चार दिवसांवर दिवाळी आली की, माझ्या घरी बाप-बेट्याची पहिली खडाजंगी उडते ती ट्रीपसाठी डेस्टिनेशन कोणते निवडायचे यावरून? आमच्या घरची ही खडाजंगी पाहून मला मात्र लोकसभेत व राज्यसभेत एखादे विधेयक पास करून घेत आहोत का? असेच वाटायला लागते. सुनेची पहिलीच दिवाळी त्यामुळे सून,लेक,सासूबाई नि मी अशा आम्ही चौघी लोकसभेतल्या व राज्यसभेतल्या सभासदांप्रमाणे त्या दोघांची खडाजंगी पाहून मध्येच खुदूखुदू हसतो तेव्हा माझा लेक चिडून म्हणतो कसा,"तुम्हांला काय झाले हसायला, येथे आम्ही डिस्कस करत आहोत ना! दिवाळीचे सगळे रिसॉर्ट नि हॉटेल्स आधीच बुक झाले आहेत. किती ठिकाणी फोन करून झालेत आणि त्यात पप्पांचं वेगळंच काहीतरी असतं." त्याच्या या वक्तव्यावर आम्हांला आणखी जोरात हसायला येते. त्यात मध्येच रेणुका चौधरी स्टाईलने माझी लेक त्याला फटकन काहीतरी बोलल्यावर तर लोकसभेतला गोंधळ माझ्याच घरात चालू असल्याचा फील यायला लागतो. शेवटी एकदाचे माझ्या घरातले डेस्टिनेशनचे विधेयक पास होते नि मग मी सुटकेचा सुस्कारा टाकते तेव्हा मात्र मला सुमित्रा महाजन यांची आवर्जून आठवण येत असते. अशाप्रकारे माझ्या घरातील लोकसभा एकदाची तहकूब होऊन ट्रीपच्या पुढील कामकाजाला सुरवात होते.
डेस्टिनेशन निवडल्यानंतर स्वप्नील सगळ्या काकांना व आतेमामांना फोन करून सविस्तर माहिती देतो. सगळे,"हो बेटा, आम्ही पोहचतो वेळेवर." मी मात्र विचारातच पडते. या सगळ्यांना 'हो बेटा' म्हणण्यापूर्वी माझ्या घरातली खडाजंगीची कल्पना तरी असेल का? ज्याप्रमाणे सरकारने आणलेल्या नागरिकांसाठीच्या योजना नागरिकांपर्यंत कशा पोहचल्यात याची सर्वसामान्यांना कल्पना नसते अगदी तसेच होय. पण काही का होईना एकदाचे सर्वजण ट्रीपच्या तयारीला लागतात नि मग जी काय गडबड सुरु होते ती विचारायलाच नको. आपण जाऊ तेथे स्विमिंग पूल आहे का? क्रिकेट, बॅडमिंटन खेळता येईल का? असे नाना प्रश्न विचारून एकमेकांना भंडावून सोडणार.
यावेळेस मात्र दोघा तिघांना कॉलेज असल्यामुळे फक्त दोनच दिवस एन्जॉय करायला मिळणार होते म्हणून नाशिकजवळचे मोहगांव येथील 'द ऑर्कीड व्हिला' बुक केले नि मग सगळेजण दि. ८ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता तेथे पोहचलो. त्यानंतर एक एक परिवार येत येत दुपारचे तीन वाजलेत, त्यानंतर सगळ्यांनी जेवणावर चांगलाच ताव मारला. लहानशा विहान,शिव व अंकितने जेवण झाल्याबरोबर दिलिप आजोबांना स्विमिंग पुलात डुबकी मारायलाच लावली. त्यांना सगळ्यांनी सांगितले,"विहान,शिव आत्ताच जेवण झाले आहे. जेवणानंतर पोहायचे नसते,थोड्या वेळाने आपण पोहू पण लहान मुलांना सांगून काही उपयोग नसतो. शेवटी एक-दीड तास पाण्यात उड्या मारल्यावर कुठे त्यांचे समाधान झाले. संध्याकाळी सहा वाजता सगळ्या बायका,मुली, सुना नटूनथटून औक्षण करण्यासाठी तयार होत असताना मुलांनी व पुरुष मंडळींनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटून घेतला त्यानंतर सगळे हॉलमध्ये जमा झालेत आणि दीड तास दिवे उतरवण्याचा कार्यक्रम चालला. दिवे उतरवून झाल्यानंतर माझ्या लहान जावेने (भावना ) सगळ्यांना गेम्स खेळायला भाग पाडले. टिल्ल्या पिल्ल्यांनी लिंबू-चमचा शर्यतीत भाग घेतला. कॉलेजमध्ये शिकणाऱ्यांनी फुगा फुगवून त्यावर पेनने घरातल्या सदस्यांची नावे लिहायची. एका मिनिटात जो जास्त नावे लिहिल त्याला बक्षीस देण्यात आले. स्ट्रॉने फुटाणा ओढून कपात टाकायचा तेही स्ट्रॉला हात न लावता. अशा दोन स्पर्धा घेतल्यात. कपल्ससाठी नवऱ्यांनी बायकोच्या चेहऱ्यावर एका मिनिटात जास्तीत जास्त टिकल्या लावून स्पर्धा जिंकायची. नवरा बायकोने पाठीच्यामध्ये फुगा ठेवून पळायचे तेही फुगा न फुटता. या सर्व स्पर्धांमधून जिंकणाऱ्यांसाठी माझ्या जावेने महिलांसाठी ज्वेलरीचे सेटस, पर्स, पुरुषांसाठी बेल्ट, वॉलेट, मुलांसाठी खेळणी व स्टेशनरी आणले होते. गेम्स खेळताना चिअर अप करणे तर मध्येच 'नो चिटिंग' असा चालणारा आरडाओरड नि त्यातच गडगडाटी हास्याने पूर्ण 'द ऑर्कीड व्हिला' दणाणून गेला होता.
'द ऑर्कीड व्हिला' मधील बिहारी कूक कपिल व श्यामकुमार यांनी बनवलेल्या स्वादिष्ट जेवणावर रात्री अकरा वाजता सगळ्यांनी ताव मारला. जेवण झाल्यावर पुन्हा मैफिल जमली नि रात्रीचे दोन केव्हा वाजलेत कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोहणे, टेबल टेनिस,कॅरम खेळणे, चालले असताना मला माझ्या लेकीने पूर्तीने स्नूकर कसे खेळायचे ते शिकवले नि स्वप्नीलने टेबल टेनिस कसे खेळायचे ते शिकवले. भविष्यात दोन्ही खेळ खेळण्याची नक्कीच प्रॅक्टिस करण्याची खूणगाठ मनाशी बांधली नि पुन्हा फोटो सेशन नाश्ता-चहाचा आस्वाद घेत तो दिवसही एन्जॉय केला.
'द ऑर्कीड व्हिला' मधील स्वच्छता, टापटीपपणा व निसर्गरम्य वातावरण मनाला खूप भावले. समोरून जाणारी दारणा नदी नि पक्ष्यांचे कूजन विचारायलाच नको! त्यात कपिल व श्यामकुमारने बनवलेले रूचकर भोजन या सर्व गोष्टींमुळे नेहमीच स्मरणात राहणारी कौटुंबिक ट्रिपने भरपूर आनंद दिला जो वर्षभर पुरेल इतका..!
©ज्योत्स्ना पाटील

Very Good as well interesting article . While reading the artiale I was feeling so awesome because it remember me that day how we enjoyed .So awesome Hats off........
ReplyDeleteThank you so much.
Deleteउत्कृष्ट वर्णन... अशी कौटुंबिक ट्रीप करायची इच्छा झाली हे वाचून .. अप्रतिम.. !!!
ReplyDeleteThanak you so much.
Deleteहे वाचताना मला असा अनुभव येत होता की मी स्वतः तिथे आहे आणि enjoy करतोय.. मॅडम आपली family खुप छान आहे आहे..
ReplyDeleteThank you so much
Deleteखूपच सुंदर लेख...👍👍
ReplyDeleteThanak you so much
Deleteअप्रतिम लेख 👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअप्रतिम लेख 👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteHello tai , a wholeheartedly congratulations to you for such a beautiful article. The explanation of "Diwali" celebration is too good .
ReplyDeleteWe hope that from your article everyone will get an inspiration of celebrating all festivals like Diwali . I liked your article very much . I hope you will continue writing such a beautiful articles .
Many many thanks!
DeleteVery nice
ReplyDeleteDhanyavad!
Deleteकिती छान...! ओघवत्या सहज सुंदर शब्दांतून व्यक्त झालेल्या लेखामुळे...मी ही आॅर्किड व्हिला ची सफर केल्याचा भास झाला.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद शिवानी!
Delete