पुस्तके माझे सांगाती     
           दि.१८ जानेवारी २०१९ ला आमची बालपणीची वर्गमैत्रिण सुरेखा हिच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने काही मित्रमैत्रिणी लग्नासाठी नाशिकला आले असता, सगळ्यांनी बालपणीच्या आठवणी काढून त्यावेळच्या जगण्यातला आनंद आज कुठेतरी हरवल्याची खंत व्यक्त केली. आमच्यासोबत आमच्या आदरणीय गुरू कमलबाई पण होत्या. त्यांनी आमच्यावर घेतलेली मेहनत वेळोवेळी दिलेली शिक्षा आज आम्हांला खूप प्रगल्भ बनवून गेली. याचा सर्वांनाच अभिमान वाटत होता कारण असे हाडाचे शिक्षक भेटायलाही नशीब लागते. सर्वजण सुरेखाच्या मुलगा विनय व सूनेला आशीर्वाद देऊन माझ्या घरी आले आणि जवळ जवळ दीड तास गप्पागोष्टी व चहापाणी करून जाण्यासाठी निघाले असता मी माधुरी वहिनी व भारती वहिनीला म्हणाले, "वहिनी, इकडे या मी तुम्हांला माझी लायब्ररी दाखवते." मी माझ्या दोन्ही रूममधील पुस्तकांचे कपाट दाखवत होते तितक्यात अविनाश म्हणाला, "ज्योत्स्नाताई, बायका कपाटातल्या साड्या दाखवतात आणि तू मात्र पुस्तके दाखवित आहेस." अविनाशने असे म्हणताच अनिल, संजय, सुभाष व सर्वचजण हसायला लागलेत. अर्थात त्यादिवशी माझ्याकडे आलेले सर्वचजण शिक्षकी पेशातील असल्यामुळे मी माझी लायब्ररी दाखवली.   याउलट मी नाशिकच्या कुणालाही माझ्या पुस्तकांचे कपाट दाखवित नाही कारण अनेकांनी वाचायला नेलेली पुस्तके परत केली नाहीत त्यामुळे मी कानाला खडा लावला की यापुढे मोजक्याच व्यक्तींना लायब्ररी दाखवायची. एकवेळ माझी पैठणी कुणी नेली तरी चालेल पण पुस्तक मात्र कुणी वाचायला नेले नि परत नाही केले तर खूप वाईट वाटते. पुस्तकांचे नि माझे कोणते नाते आहे ते मलाही कळत नाही. जातांना सर्वांना पुस्तके भेट दिलीत. मराठी भाषा व वाचन चळवळीला मी माझ्यापरीने जमेल तसा प्रयत्न करीत असते.
बहिणाबाई चौधरी म्हणतात,
माझी माय सरसोती
माले शिकविते बोली
आपण मात्र आपल्या बोलीला आपापल्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करावा हेच खरे.

Comments

  1. छान लिखाण.
    जो वाचेल नियमित पुस्तक
    विचाराने भक्कम होईल त्याचे मस्तक.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या