प्रेरणेचे आगार-डॉ. उषाताई सावंत 
            
              मला नेहमीच प्रेरणा देणाऱ्या डॉ. उषाताई सावंत यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, "ज्योत्स्ना, तुझा 'उकडपेंडीची गोष्ट' हा लेख वाचून मला जो आनंद झाला तो मी तुला शब्दात नाही सांगू शकत. खरंच तुझ्या या लेखाने माझा संपूर्ण भूतकाळ डोळ्यांसमोर उभा केला आणि विशेष म्हणजे मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण झाली. माझी आई कुणीही पाहुणा आला की, झटपट उकडपेंडी करून सगळ्यांना खाऊ घालायची. आईची ती मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि खरं सांगू का! तुझे लेखन वाचताना ते प्रसंग अगदी हुबेहुब आपल्यासमोर घडत आहेत असा भास होत असतो. तुझं लेखन मला खूपच मोहात टाकत असतं. तुझ्या लेखनातली सहजता मनाला खूप भावते. तू लेखाला दिलेले शीर्षक तर मला खूपच आवडते. तुझी ती 'नखरेल लसूणी मेथी' शीर्षक वाचूनच भुरळ घालते. 'अडेलतट्टू टोमॅटो ऑम्लेट' वाचतांना तर खूपच मजा आली. तुझा प्रत्येक लेख वेगळा असतो नि वाचताना गुंतवून ठेवत असतो. 
जवळ जवळ पंचवीस-तीस मिनिटे ताई माझ्या लेखांवर बोलत होत्या तेव्हा मला खूप आनंद झाला पण खरं सांगू का उषाताई स्वतःच एक अभ्यासू व चिंतनशील व्यक्तिमत्त्व असून आणि स्वतः एक सिद्धहस्त लेखिका असून त्यांना माझे लेखन आवडते हे माझे सौभाग्य होय. त्यांच्यासारख्या अभ्यासू लेखिकेने मला नेहमीच प्रेरणा देत राहावे त्यामुळे मी स्वतःला खरंच नशीबवान समजत असते. मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर डॉ. उषाताई सावंत यांच्यासारख्या अनेक व्यक्ती भेटत गेल्यात वेळोवेळी मी तसा उल्लेख केलाच आहे पण आजच्या घडीला ताईंनी माझे मनोबल वाढविण्यास लावलेला हातभार मी कदापिही विसरू शकत नाही. त्यांना 'धन्यवाद' म्हटलेले आवडत नाही म्हणून त्यांच्या ऋणात राहणेच संयुक्तिक ठरेल आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभोत हीच प्रभुचरणी प्रार्थना!                        

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या