माय मराठी
म्हाईंभटांची लिळा
सांगे मराठीची कळा
ज्ञानेशांची ओवी
सांगे मराठीची थोरवी
तुकोबांची गाथा
सांगे मराठीची कथा
शाहिरांची ललकारी
सांगे मराठीची लयकारी
जोतीबांचे अखंड
सांगती मराठीचे खंड
बहिणाईची बोली
सांगे मराठीची खोली
माय मराठीची गोडी
कोणासही ना सोडी
माय मराठीचा गजर
करू साऱ्या जगभर
माय मराठीची लेक
ज्योत्स्ना आहे एक

           ज्योत्स्ना पाटील

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या