व्हॉटसअपवरील गंमतीजमती

व्हॉटसअपवरील गंमतीजमती 
            
                ब्लॉगवरील 'माझी सवत भेंडी' हा लेख वाचून माझा वर्गमित्र अविनाश याने व्हॉटसअप ग्रुपवर एक पोस्ट टाकली 'मला ज्योत्स्ना ताईचे एक गुपित कळले आहे की,ज्योत्स्ना ताईला एक सवत आहे, हे वाचून मला खूप वाईट वाटले आहे आणि ज्योत्स्ना ताई कुणाकडे जेवायला आली तर भेंडीची भाजी अवश्य करावी कारण ज्योत्स्ना ताईला भेंडी खूप आवडते.' अविनाशच्या या पोस्टने सगळेच बालमित्र विचारात पडलेत नि दिवसभर कुणीच पोस्ट टाकायला धजावले नाही. अविनाशने सांगितले 'सवती' शब्दाची बघितली किती दहशत आहे! कुणीच पोस्टला रिप्लाय द्यायला तयार नाही.काही मित्रांनी अविनाशला फोन करून विचारले तर काही मित्र चक्क त्याला भेटलेच. जनाबाई या बालमैत्रिणीने तर संध्याकाळी न राहवून विचारलेच, 'हे काय आहे अवि!' त्यावर अविने तिला मोठ्या गंमतीने रिप्लाय दिला, 'खूपच दुर्दैवी घटना, किमान तुला तरी वाईट/आश्चर्य वाटले.' जनाबाईच्या पोस्टनंतर थोडेसे धाडस दाखवत अनिल साळुंकेने पोस्ट टाकली, 'अवि दादा हे काय? ज्योत्स्ना माईने पण पाठींबा?' अशी दिवसभर अविनाश व माधुरी वहिनीने सगळ्यांची चांगलीच फिरकी घेतली नि मग रात्री अविनाशने लिहिले,'ज्योत्स्ना ताईच्या सवतीचे नाव, रंग, रूप व पत्ता सांगतो' असे लिहून 'माझी सवत-भेंडी' हा लेख पोस्ट केला तेव्हा सगळ्यांना सवतीचे कोडे सुटले नि जनाबाई, अनिल, सुभाष जोशी, सूरज पाटील या सगळ्यांनी अविनाशच्या या फिरकीला दादही दिली. 
               भेंडीवरील कथा सुरस व भन्नाट आहे, अशी दाद देत अविनाशने व्हॉटसअपवर कथेला एक वेगळा आयाम दिला आणि प्रत्येकाला विचार करण्याची चालनाही दिली त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद!  

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या