लेकीची बॅग
लेकीची बॅग
लेकीच्या घरी गेल्यावर लेक म्हणते कशी, "आई, मला आपल्या फ्लॅटवर जाऊन माझं सामान आणायचे आहे." सासरी गेलेल्या लेकीने माझं सामान आणायचे, असे म्हणताच काळजात चर्र झाले. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत म्हणाले, "बेटा, तुझं राहिलेले सामान उद्या परवा कधीही आणता येईल. आजच आणायला पाहिजे का?" मी असे म्हणताच ती कळवळून म्हणाली, "अगं आई, दोन दिवसांनी जॉबला गेल्यावर मला आपल्या फ्लॅटवरून सामान आणणे कसे शक्य होईल बरे." तिचे म्हणणेही खरेच होते पण लेकीचं सामान आपल्या घरातून तिच्या सासरच्या घरी जाणे म्हणजे काय असते हे त्या लेकीला नि तिच्या आईलाच ठाऊक असते. एक एक वस्तू बॅगेत भरताना लेकीचा चेहरा बघण्याचे साहस मला होत नव्हते. जणुकाही एकेका वस्तूबरोबर ती माहेरच्या घरापासून दूर दूर जात आहे याचे वाईट वाटत होते. तिच्याबरोबर केलेली शॉपिंग आणि त्या शॉपिंगवरून आमचे होणारे लुटुपुटुचे वाद आठवत होते. एक नेलपेंटची बाटली घ्यायला जायचे नि चार-पाच नेलपेंटच्या बॉटल्स खरेदी करायची तेव्हा तिची नि माझी होणारी तू तू मै मै ठरलेली असायची. मी कितीही नाही म्हटले तरी ती तिला पाहिजे असलेल्या नेलपेंटच्या बॉटल्स खरेदी करणारच. बांगड्या असो, क्लचर, रबर बँड्स, परफ्यूम, किंवा कॉस्मेटिक्स घेणे असो. जे जे चांगले दिसले ते घ्यायचे नि मला म्हणायचे, "तू काळजी नको करूस, मी बाबांचे डेबिट कार्ड आणले आहे." जेथे बाबाच बेटीला सामील झालेत तेव्हा मी तरी काय करणार?" तीच बाब कपड्यांच्या बाबतीतही. एक ड्रेस घ्यायला जायचे नि दोन-तीन ड्रेस घेऊनच बाईसाहेब बाहेर पडायच्या.
आज मात्र लेकीने घेतलेल्या सगळ्या वस्तूंशी तिचे नि माझे जे भावबंध जोडले गेले होते ते काही केल्या सुटू नयेत असे वाटत होते. आज त्या सर्व वस्तू माझ्याशी जे काही बोलत होत्या ते मी कुणालाच सांगू शकत नव्हते. लेकीची बॅग जसजशी भरली जात होती तसतसे माझे मन आतल्या आत आक्रंदत होते. पूर्वीचे लोक मुलींची लग्नं लहानपणीच करायचेत त्यामागे नक्कीच मानसशास्त्रीय कारण तर नसावे ना! मुलींमध्ये आईवडिलांनी भावनिक दृष्ट्या जास्त गुंतू नये असे तर नसावे ना!
लेकीच्या बॅगेत सामानाबरोबरच आईचे नि तिच्या बाबांचे तिळ तिळ तुटणारे मनही गेले होते.
मॅडम तुमचा हा लेख वाचून मन गहिवरून आले.
ReplyDeleteमला असे वाटते की कदाचित ते पण ठिक आहे, कारण रोज घरी तुम्हाला ते दिसणार आणि मग दररोज मन तुटणार त्यापेक्षा हे एकदा ठिक आहे.
आणि हो ती आनंदात तर आपण सुद्धा आनंदात.
मग आता मनाला काही वाटुन घेऊ नका, नाहीतर तिला कसेतरी वाटेल..
चला या निमित्ताने तुम्हाला व कुटुंबियांना संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा..
khup khup dhanyavad !
Deleteताई पुर्वी आई म्हणायची ना कि तुम्ही आई झाल्यावर कळेल कि आई आणी मुलीचं नातं काय असतं .त्याचीच अनुभुती आता तुम्हाला येत असेल .आणी त्यात मुलीचं लग्न झाल्यावर ती आता दुसर्यांची झाली ही भावना सुखावणारीही असते आणी परकेपणाचा भास होणारीही असते .पण आपल्या काळजाचा तुकडा आपण सुरक्षित आणी योग्य अशा हातात दिला आहे याचा आनंदही असतो.
ReplyDeleteAabhari aahe!
DeleteSpeechless
ReplyDeleteGahivaralya manane dhanyavad!
Deleteगलबलून आले.
ReplyDeleteBhavanancha aadar karit dhanyavad!
Deleteमन भरुन आले
ReplyDeleteThanaks my dear, same here!
Deleteलेख वाचून मनाची खूपच घालमेल झाली
ReplyDeleteखरंच हा प्रसंग प्रत्येक मुलीच्या न आई वडिलांच्या जीवनात येत असतो त्यामुळे
लेख वाचताना प्रत्येकाच्या मनाची अवस्था
तुमच्या सारखीच होते ..
शारदा
Manapasun Dhanyavad Sharada!
Delete