वाचन एक चांगली सवय आज २३ एप्रिल २०२०, जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने मला लिहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या रसिक वाचकांचे आभार मानणे आवश्यक आहे. वेळोवेळी मला अभिप्राय देणाऱ्या नातलगांचे, मित्रमैत्रिणींचे आणि रसिक वाचकांचे आभार मी माझ्या आधीच्या पुस्तकात वाचकांच्या नावासह मानले आहेतच पण आज मात्र एकाच लेखावरील प्रतिक्रियेविषयी तेही अनोळखी वाचकांविषयी लिहून त्या सर्वांचे आभार पुस्तक दिनानिमित्त मानत आहे. वाचन करणारे वाचक कमी झालेत, अशी ओरड सर्वत्र होत असते पण मला मात्र नेहमीच याच्या उलट अनुभव येत असतो. आज ललित वाचन करणारे वाचक कमी झाले असे दिग्गजांचे निरीक्षण सांगते परंतू मी जेव्हा जेव्हा ललित लेख लिहला तेव्हा तेव्हा मला वाचकांच्या प्रतिक्रिया सर्वात अधिक प्रमाणात आलेल्या आहेत. दै. गांवकरी, दै. सकाळ, दै. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दै. दिव्य मराठी या सर्व व्रुतपत्रात जेव्हा जेव्हा माझे लेख प्रकाशित झालेत तेव्हा तेव्हा अनेक व...
Superb👌
ReplyDeleteMany many thanks.
DeleteMast Kavita
ReplyDeleteThank you very much.
ReplyDelete