सर्व साहित्य रसिकांना, 
ज्योत्स्नाचा सप्रेम नमस्कार. 
नूतन वर्षाच्या सर्व रसिक वाचकांना हार्दिक शुभेच्छा! 
गेल्या पंधरा दिवसांपासून एकही पोस्ट टाकली नाही म्हणून अनेक रसिक वाचकांनी विचारणा केली तर काही ओळखीच्या वाचकांनी,"काय! लेकीचं लग्न म्हणून लेखन बंद आहे का?" आणि हो! खरंच गेल्या पंधरा दिवसांपासून घरात लेकीच्या लग्नाची जी गडबड चालू होती त्यामुळे क्षणभरही विचार करण्यास वाव नव्हता.
लेक सासरी गेली नि मुलगा व सून स्विडनला गेल्यावर पुन्हा घर खायला उठू लागले नि मग पुन्हा शब्दांशी झटापट करण्याशिवाय पर्यायच उरला नाही त्यामुळे पुन्हा लेखन हाच माझा श्वास होय याची प्रचीती आली आणि आजपासून पोस्टचा सिलसिला सुरू करीत आहे रसिक वाचकांसाठी. 
धन्यवाद! 

 २०१९ 

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या