धन्यवाद व रेसिपी
माझा ब्लॉग वाचणाऱ्या सर्व रसिक वाचकांना ज्योत्स्नाचा नमस्कार.
अनेक वाचकांनी आम्हांला ब्लॉगवर प्रतिक्रिया पाठवता येत नाहीत असे व्हाटसअपवर कळविले. तर काही वाचकांनी 'मावस सासूबाईंची खव्याची पोळी' हा लेख वाचून खव्याच्या पोळीची रेसिपी पाठविण्याविषयी सूचना केली त्यामुळे आज खव्याच्या पोळीची रेसिपी संक्रांतीच्या सणाकरिता लिहून पाठवित आहे.
खव्याच्या पोळीची पाककृती
साहित्य : पाव किलो खवा, एक वाटी साखर, पाच-सहा वेलदोडे, शंभर ग्रॅम मैदा, शंभर ग्रॅम गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ, शेंगदाणा तेल दोन टेबल स्पून, तूप पन्नास ग्रॅम.
कृती : सारण : प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात खवा परतून घ्यावा नंतर हा खवा थंड होऊ द्यावा. थंड झालेल्या खव्यात वेलदोडे घालून बारीक पावडर केलेली साखर(पिठी साखर) टाकून चांगले मिक्स करणे. अशाप्रकारे खव्याचे सारण तयार करावे .
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ,तेल टाकून चांगले मिक्स करून पाणी टाकून कणिक मळून घेणे. पारीसाठी कणिक तयार झाल्यावर त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून ओल्या कपड्याने सर्व गोळे झाकून ठेवावेत. नंतर पंधरा मिनिटांनी एक गोळा घेऊन पोळपाटावर लाटून छोटीशी पोळी करावी नंतर त्यात वरील खव्याचे सारण भरून पोळीला सर्व बाजूने दुमडावे व मोदकसारखे सारण भरल्यावर हा मोदक दोन्ही हातांनी दाबून हा खवा भरलेला गोळा हलक्या हाताने लाटावा. त्याला पोळीचा गोल आकार दिल्यावर ही पोळी गॅसवर गरम केलेल्या तव्यावर टाकून शिजवावी. नंतर पोळीवर चारही बाजूने तूप सोडून ही पोळी खरपूस भाजून घ्यावी. अशाप्रकारे बनवलेल्या खव्याच्या पोळ्या डब्यात भरून ठेवल्यात तर आठ दिवस छान राहतात.
व्हाटसअपवर प्रतिक्रिया पाठविणाऱ्या वाचकांची नावे खालीलप्रमाणे,
१) सुजाता गाडे
२) वर्षा रौंदळ
३) नूतन ठाकरे
४) कविता ठाकरे
५) मंदा साळुंके
६) सुनिता कुलकर्णी
८) कविता खैरनार
९) सचिन साळुंके
१०) भूषण साळुंके
११)दीपक थोरात
१२) रुपाली पवार
१३) अर्चना पाटील
१४) आशा मराठे
१५) राजेंद्र पवार
१६) सरला सोनवणे
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!
काही वाचकांची नावे नंतरच्या पोस्टमध्ये समाविष्ट करण्यात येतील.
धन्यवाद रसिक वाचकांनो!
Nice रेसिपी
ReplyDelete