माझी चुलबुली

माझी चुलबुली 
           
             आज सून दीपश्रीचा स्टॉकहोमहून कॉल येताच तिच्या आवाजात नेहमीप्रमाणे खदखदून हसण्याचा सूर काही दिसत नव्हता म्हणून मला शंका आली आणि मी तिला न राहवून विचारलेच, "का रे बेटा! आज नाराज का आहेस?" मी असे विचारताच तिला खूप रडायला आले. तिला शांत करताच ती म्हणाली, "आई, खूप एकटं एकटं वाटतं. तुम्हां सर्वांची खूप आठवण येत आहे. आत्ता आम्ही पुण्याला राहायला हवे होते. ताऊ पुण्याला नि मी, स्वप्नील इकडे आलोत त्यामुळे आम्हांला ताऊचीही खूप आठवण येत आहे." तिची समजूत घालून तिला शांत केले नि फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर बराच वेळ मी विचार करीत बसले. 'जग एक खेडे आहे. जग जवळ आले.' असे आपण किती सहज म्हणून जातो पण प्रत्यक्षात तसे असते का? मोबाईल, व्हॉटसअप चॅट, व्हिडीओ कॉलिंग ही सर्व साधने फक्त आभासी वाटतात. या आभासी जगाऐवजी माणसाला सहवास हवा असतो. राग, रुसवा, फुगवा, कौतुक, मायेचा स्पर्श या सर्व गोष्टींसाठी एकत्र राहणे महत्त्वाचे असते. सोशल मिडिया दुधाची तहान ताकावर भागवण्याचे काम करीत असले तरी माणसाचे एकाकीपण दूर करण्यासाठी एकमेकांचा सहवास किती आवश्यक आहे याची जाणीव दूर गेल्यावर प्रकर्षाने होत असते. माझा बेटा मात्र महाबिलंदर आहे. कितीही आठवण आली तरी समोर भासू देणार नाही पण एकांतात मात्र सगळ्या भावनांना वाट करून मोकळा होईल. याउलट माझी चुलबुली मैना (सून दीपश्री) माझ्याजवळ मनमोकळं करून मन हलके करून घेईल. अशी ही दोन टोकाची जोडगोळी.      
           स्वप्नीलचा दिवस कंपनीत काम करण्यात निघून जातो पण  सतत बडबड करणारी दीपश्री दिवसभर घरात एकटी कशी राहते! या कल्पनेनेच मन सैरभैर होऊन जाते नि वाटते सरळ उठावे नि स्वीडनला जाऊन तिला कडकडून मिठी मारावी. 
              एकीकडे लेकीचे सासरी जाणे नि दुसरीकडे सूनही सासरीच (स्वीडनला गेल्यामुळे) गेल्यासारखे वाटते. दोघी लेकी व मुलापासून दूर राहणे फारच कठीण पण पाखरांना भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरण्याचे काम आईवडिलांना करावेच लागते. 
                                            

Comments

  1. आजच्या मुलांनी परदेशात घेतलेली ही उंच
    भरारी खरंच कौतुकास्पद आहे.नोकरी निमित्त
    किंवा शिक्षणासाठी परदेशात जातात. पण तिथे
    त्यांना जाणवणारी आपल्या माणसांची उणीव
    ही आठवण त्यांना व पालकांना त्रासदायक असते.
    पण नाण्याला दोन बाजू असतात.त्याची आठवण ठेवून दुसरी बाजू बघत त्यांची प्रगती पाहत आपण लवकरच भेटू आशी आशा करूया !!

    शारदा पवार

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या