निरीक्षण
निरीक्षण
भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबर २०१८ ला आमचे दोंडाईच्याचे व्याही आणि विहिणबाई लेकीला (आमच्या सूनबाईला) घ्यायला आले असता आमचे पाटील साहेब मला म्हणाले, "सकाळपासून कुणी ना कुणी पाहुणे येऊन राहिले आहेत तर आज आपण सर्वजण जेवायला हॉटेलमध्येच जाऊ या." आम्हीही खूपच दमलो होतो त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही लागलीच, 'हो' म्हणालो.
शाकाहारी व मांसाहारी जेवण करायचे असल्यामुळे आम्ही 'हॉटेल याहू' ला गेलोत तेव्हा दुपारचे अडीच वाजायला आले होते. आम्ही पाचजण हॉटेलमध्ये पोहचलो नि माझा मुलगा व व्याही,विहिणबाई आमच्या नंतर आले असता. सगळ्यांनी पटापट ऑर्डर दिली कारण व्याह्यांना दोंडाईच्याला पोहचायला उशीर होईल म्हणून आम्ही पटकन जेवणाची ऑर्डर देऊन जेवण आटोपले नि वेटरने फिंगर बाऊल आणले आणि माझ्या सासूबाईंनी फिंगर बाऊलमध्ये हात बुडवला नि तितक्यात मी टेबलवरील टिश्यू पेपर काढून माझ्या सासूबाईंच्या हातात दिला आणि त्यानंतर मीही फिंगर बाऊलमध्ये हात धुऊन पर्समधला हातरुमाल काढून माझा ओला झालेला हात हातरूमालाने पुसला असता माझी सून दिपश्री मला म्हणते कशी, "आई, टिश्यू पेपर आहे ना, त्याला हात पुसू शकता." तिला मी हातरूमालाला हात का पुसला? असा प्रश्न पडला होता आणि तिचे निरीक्षण किती लक्षपूर्वक होते याचे मला आश्चर्य वाटले होते. तिचा उडालेला गोंधळ पाहून मी तिला सांगितले, "टिश्यू पेपर वापरणे म्हणजे झाडांची कत्तल करण्यासारखे होय. हातरुमाल आपण धुवून पुन्हा वापरू शकतो. आजीकडे हातरुमाल नव्हता म्हणून टिश्यू पेपर दिला पण माझ्याकडे असताना मी टिश्यू पेपर वाया घालवण्यासारखे होय म्हणून मी हातरुमाल वापरते. कधी कधी हातरुमाल जवळ नसला तरच मी टिश्यू पेपरचा वापर करीत असते. आपण उष्ण प्रदेशात राहतो नि आपल्याकडे कपडे लगेच वाळत असतात त्यामुळे आपण हातरुमाल वापरणे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्यासारखे होय. याउलट थंड प्रदेशात कपडे वाळत नाहीत तेव्हा तेथील लोकांनी टिश्यू पेपर वापरणे अधिक योग्य होय. आपले पूर्वज 'जसा देश, तसा वेश ' असे उगीच म्हणत होते का!" माझ्या या स्पष्टीकरणानंतर दिपश्री मला म्हणते कशी, "आई, मीही यापुढे हातरुमाल जवळ बाळगत जाईल नि तुम्ही म्हणतात ते मला मनापासून पटले आहे." तिचे उत्तर ऐकल्यावर मी तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहिले. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात याची पुन्हा प्रचीती आली.
©ज्योत्स्ना पाटील
©ज्योत्स्ना पाटील
Namaste Aai, Tumchya Hya Eka Chotyasha Krutitun Mi Barach Kahi Shikle. Tissue Cha Honara Sarras Vapar Ata Mi Talate. Tevadhich Ek Paryavaranala Madat Hote.
ReplyDeleteThanks beta!
Deleteतुमचे लेख वाचून माझी वाचनाची आवड ही वाढते आहे, कारण तुमच्या प्रत्येक लेखात खूप काही शिकायला मिळते आहे.
ReplyDeleteएकच विनंती करतो की तुम्ही रोज लेख लिहा.
(स्वार्थ - चांगली शिकवण मिळते आहे आणि जिची आज सर्वांना खूप गरज आहे)
मनापासून धन्यवाद सर,
Delete