रसिक वाचक

नमस्कार रसिक वाचक,
आता माझा ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांमध्ये इंडोनेशिया, फिलिपीन्स येथील वाचकांचीही भर पडली याचा विशेष आनंद होत आहे. मराठी भाषेशी माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांची नाळ किती घट्ट जोडली गेली आहे, याचा अभिमान वाटतो. मराठी भाषेत ब्लॉग लिहून माय मराठीची सेवा करण्यात खारीचा वाटा उचलता आला नि माझ्या लिहण्याचे सार्थक झाले. असो, सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद नि जाता जाता महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर एक चारोळी,

पक्षाला बहुमत नसता
सारे बांधावर धावले
हातात जुडी असता
सारे कास्तकार झाले
©ज्योत्स्ना पाटील.

Comments

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या