पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
आज सकाळी सकाळीच मालेगावच्या चिऊ ताईंचा फोन आला आणि त्यांच्याशी बोलताना आमच्या रावसाहेबांच्या आठवणींनी पुन्हा उचल खाल्ली. आज उठल्यापासूनच एक वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे २मे २०१८ला सगळे अगदी आनंदात होते. चि. स्वप्नीलच्या लग्नानिमित्ताने माझे मोठे जेठ व जाऊबाई, लहान जाऊबाई, पुतण्या राकेश त्याची पत्नी कल्याणी, माझी आई, सासूबाई, नणंद, बहीण, बहिणीची मुलं, पूर्ती, स्वप्नील, असे अनेक पाहुणे घरात होते. इतके सगळे पाहुणे घरी असताना नि त्यातच आमचे रावसाहेब व कल्पना माई यांचा दोघांचा लग्नाचा वाढदिवस मग काय सगळ्यांनी त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले.
मुलांनी काका काकूसाठी केक आणला आणि सगळ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होताच रावसाहेब म्हणाले, " आजपर्यंत आमचा वाढदिवस साजरा झाला नव्हता. स्वप्नीलच्या लग्नानिमित्ताने आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस कायमचा लक्षात राहील." आणि रावसाहेबांचे बोल खरेच ठरले. जणुकाही त्यांना भविष्यातील काही गोष्टींचे ज्ञान झाले होते की काय! त्यांच्या म्हणण्यानुसार खरंच त्यांचा साजरा केलेला वाढदिवस शेवटचाच ठरला नि सर्वांना कायमचेच लक्षात ठेवून ते यावर्षी लग्नाच्या वाढदिवसापूर्वीच सगळ्यांचा निरोप घेऊन गेलेत ते कायमचेच. दि. १२ एप्रिल २०१९ ची काळरात्र संपूर्ण घरालाच दुःखाच्या खाईत लोटून गेली.
मनात एकच भुंगा थैमान घालित असतो. माणसाचं जगणं इतके बेभरवशाचे कसे काय असू शकते! सर्वकाही ठिक असूनही आपल्यातून आपलीच जवळची व्यक्ती अशी अचानक कशी काय हे जग सोडून जाते. शेवटी 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....!'

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.