रसिक वाचक

सर्व रसिक वाचकांना,                                 
सप्रेम नमस्कार. 
'माझी भटकंती' आणि 'माय किचन जेडी' या माझ्या दोन्ही ब्लॉगला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
पहिला ब्लॉग मी मराठी भाषेतून लिहीत आहे तर दुसरा ब्लॉग हा खास रेसिपीसाठी आणि तोही हिंदी भाषेतून लिहीत आहे कारण बऱ्याच अमराठी भाषिक वाचकांची हिंदी भाषेतून ब्लॉग लिहिण्याची सूचना असल्यामुळे नि मला हिंदी भाषेत लिहिण्यास प्रवृत्त केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. हिंदी भाषेतून रेसिपी लिहिण्यामागचे खरे कारण म्हणजे माझे चौथे पुस्तक 'अंतरंग सुगरणींचे, खवय्येगिरी सर्वांची' या पुस्तकात मी अनोखा प्रयोग केला नि त्यात ललित लेख, कथा, कविता यासोबत मी पाककृतीही दिल्या आहेत आणि या पाककृती अमराठी भाषिक वाचकांना हिंदीतून वाचण्यासाठी मिळाव्यात म्हणून मी रेसिपी व रेसिपीशी संबंधित अनुभव हिंदी ब्लॉगवर लिहिण्याचा प्रयत्न केला आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचकांनी ब्लॉगला पसंती दिली त्याबद्दल सर्व रसिक वाचकांना मनापासून धन्यवाद देते. 
                भारतात ब्लॉग वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे याचा आनंद वाटतो. काही वाचकांनी विचारले की ब्लॉगवर मागच्या पोस्ट दिसत नाहीत त्या सर्व वाचकांना माझी विनंती आहे की हिंदी ब्लॉगमध्ये पोस्टच्या खाली कमेंट बॉक्स व त्याच्याखाली 'होम' या नावाच्या खाली 'व्ह्यू वेब व्हर्जन' यावर क्लिक केले की आपल्याला सर्व पोस्ट वाचता येतील. 
                   आज ५ जून 'पर्यावरण दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला गेला आपणही आपापल्या पद्धतीने पर्यावरण दिनाला हातभार लावू या. ज्यांना झाडे लावणे शक्य नाही ते बांधवही काही गोष्टींचे पालन करून पर्यावरणाला हातभार लावू शकतात.  प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करू या. हॉटेलमध्ये जेवायला जाताना टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करू या. अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळून पर्यावरणाला हातभार लावू या. पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करू या. ज्याला जसे जमेल तसे प्रयत्न करू या. 
                     माझे आजोबा, वडील आम्ही लहान असताना सहजपणे बोलून जायचे ' हा देह मातीतच जन्मला नि मातीतच मिसळणार. शेवटी ही मातीच सर्वकाही आहे. माती आहे तर माणूस आहे. लहानपणी आजोबा व वडिलांचे म्हणणे काहीच कळत नसे. अरे, आपला आणि मातीचा काय संबंध!  आपल्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांनी लहानाचे मोठे केले असे वाटायचे पण जेव्हा मोठे झालो तेव्हा आजोबा व वडिलांच्या म्हणण्यामागचा अर्थ कळू लागला. प्रत्येकाचाच देह हा मातीत पिकणाऱ्या धनधान्यावरच पोसला जातो. माती आहे तर आपण आहोत आणि या मातीला हिरवं कोंदण लाभेल तेव्हाच ती आपल्याला साथ देईल म्हणून आपण आपापल्या परीने जसे जमेल तसे पर्यावरणाला हातभार लावण्याचा कसोशीने प्रयत्न करू या!
                   'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती.'                           

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या