फक्त

     फक्त 
गुलमोहराच्या झाडा 
उधळणा रक्तवर्णी फुले 
सळसळू दे माझेही रक्त 
पेटून ऊठू दे तुझ्यासंगे 
फक्त न्यायासाठीच........ !

सोनचाफ्याच्या झाडा 
शिंपडना पीतवर्णी फुले 
भळभळू दे माझेही रक्त 
खवळू दे तुझ्यासंगे 
फक्त लढण्यासाठीच.......!

पारिजातकाच्या झाडा 
उधळणा शुभ्रवर्णी फुले 
हुळहुळू दे माझेही रक्त 
चेतवू दे तुझ्यासंगे 
फक्त शांततेसाठी........!   

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या