अखेर अरुणा भेटली ....!
अखेर अरुणा भेटली ....!
अनेक वर्षांपासून 'मी अरुणा बोलतेय' हा एकपात्री प्रयोग पाहण्याची इच्छा होती. अनेक वृत्तपत्रांतून 'मी अरुणा बोलतेय' या एकपात्री प्रयोगाविषयी वाचण्यात येत होते त्यामुळे एक उत्सुकता होतीच. तसेच प्रयोग करणाऱ्या डॉ. प्रतिभा जाधव यांना एका संमेलनात सूत्रसंचालन करताना पाहिलेले, ऐकलेले होते त्यामुळेही त्यांचा एकपात्री प्रयोग पाहण्याची इच्छा अजूनच बळावली. मध्यंतरी रविंद्र मालुंजकर सरांनी याच एकपात्री प्रयोगाचे निमंत्रण पाठवले तेव्हाही 'मी अरुणा बोलतेय' पाहण्याची संधी हुकली नि मनाला एक रुखरुख लागून राहिली नि अचानक २४ मार्च २०१९ ला महिला साहित्य संमेलनात 'मी अरुणा बोलतेय' पुढ्यात येऊन उभी राहिली तेव्हा अंगावर जे शहारे आलेत आणि त्यानंतर अरुणाची कहाणी ऐकताना मन इतके सैरभैर झाले की, पुन्हा तोच प्रश्न 'का?' 'असे का व्हावे?' एखाद्याच्या नशिबात इतकी सारी वेदना,अवहेलना का? डॉ.प्रतिभा जाधव निकम यांच्या अभिनयातून जिवंत होऊन पुढ्यात उभ्या राहिलेल्या अरुणाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमतच आपल्यात उरत नाही नि आपण स्वतःच माणूस म्हणून स्वतःच्या नजरेतून उतरून जात असतो तेव्हा ही व्यथा अरुणाची न राहता समस्त स्त्री वर्गाची होऊन जात असते.
'मी अरुणा बोलतेय' हा प्रयोग मात्र पुन्हा पाहण्याचं साहस मात्र माझ्याच्याने होणार नाही. काही कलाकृती पुनःपुन्हा पाहण्यात आनंद असतो तर काही कलाकृती एकदाच पाहिल्यावर कायमच्याच आपल्या मेंदूला झिंजोडत राहतात.
'मी अरुणा बोलतेय' हा प्रयोग मात्र पुन्हा पाहण्याचं साहस मात्र माझ्याच्याने होणार नाही. काही कलाकृती पुनःपुन्हा पाहण्यात आनंद असतो तर काही कलाकृती एकदाच पाहिल्यावर कायमच्याच आपल्या मेंदूला झिंजोडत राहतात.
डॉ. प्रतिभाचा अभिनय पाहून अरुणा शानभागच्या सर्वच नातलगांना नक्कीच पश्चात्ताप होईल आणि त्यांचे काय चुकले याची जाणीव करून देणारा हा एकपात्री प्रयोग अरुणाची व्यथा दर्शकांच्या काळजाला तर हात घालतेच पण अरुणाचाही विसर पडू देत नाही हेच या प्रयोगाचे खरे यश होय त्याबद्दल डॉ. प्रतिभा यांच्या अभिनयाला नि लेखणीला मनापासून सलाम!

प्रिय ज्योत्स्ना, तू लिहिलेला हा ब्लॉग म्हणजेच 'मी अरूणा बोलतेय..' वरील विस्तृत प्रतिक्रिया म्हणजे तुझ्यासारख्या विचारी, सकस लिहिणाऱ्या लेखिकेने ,एका जाणकार रसिक प्रेक्षकाने दिलेली माझ्या कामाची,धडपडीची पावती आहे असे मानते. तुझी हे थेट आतून आलेली प्रतिक्रिया माझ्यात बळ ओतणारी आहे. तुला पुन्हा 'अरूणा' बघायला आवडणार नाही हे तू म्हंटलीस हेदेखील सकारात्मक compliment म्हणून मी घेतेय. आपण लेट भेटलो पण थेट भेटलो याचा मनस्वी आनंद आहे. खुप खूप धन्यवाद या लाख मोलाच्या प्रतिक्रियेसाठी😍🙏
ReplyDeleteमनापासून धन्यवाद प्रतिभा. इतिहासातल्या अनेक स्री व्यक्तिरेखांवर तुला बरेच काम करता येईल.
Delete