पुस्तक वाचू या, आनंद लुटू या
वाचन एक चांगली सवय
आज २३ एप्रिल २०२०, जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने मला लिहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या रसिक वाचकांचे आभार मानणे आवश्यक आहे. वेळोवेळी मला अभिप्राय देणाऱ्या नातलगांचे, मित्रमैत्रिणींचे आणि रसिक वाचकांचे आभार मी माझ्या आधीच्या पुस्तकात वाचकांच्या नावासह मानले आहेतच पण आज मात्र एकाच लेखावरील प्रतिक्रियेविषयी तेही अनोळखी वाचकांविषयी लिहून त्या सर्वांचे आभार पुस्तक दिनानिमित्त मानत आहे.

वाचन करणारे वाचक कमी झालेत, अशी ओरड सर्वत्र होत असते पण मला मात्र नेहमीच याच्या उलट अनुभव येत असतो. आज ललित वाचन करणारे वाचक कमी झाले असे दिग्गजांचे निरीक्षण सांगते परंतू मी जेव्हा जेव्हा ललित लेख लिहला तेव्हा तेव्हा मला वाचकांच्या प्रतिक्रिया सर्वात अधिक प्रमाणात आलेल्या आहेत.
दै. गांवकरी, दै. सकाळ, दै. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दै. दिव्य मराठी या सर्व व्रुतपत्रात जेव्हा जेव्हा माझे लेख प्रकाशित झालेत तेव्हा तेव्हा अनेक वाचकांनी फोनद्वारे, पत्राद्वारे, व्रुतपत्रात वाचकांच्या प्रतिक्रिया सदरात आणि आता व्हाटसअप व फोनद्वारे अनेक वाचक वेळोवेळी प्रतिसाद देतात तेव्हा आम्हां लेखकांना लिहण्यास बळ मिळत असते.
दि.१२ एप्रिल २०२० ला दै. दिव्य मराठीमध्ये संपादक श्रीकांत सराफ सरांनी 'संमेलन' पुरवणीत 'सूर्याचे रंग चोरणारा गुलमोहर' हा लेख प्रकाशित केला नि जळगाव, उस्मानाबाद, भडगाव, चाळीसगाव, यावल, औरंगाबाद, जालना, नगर, सांगली, नंदुरबार, धुळे व नाशिक येथून अनेक वाचकांनी फोनद्वारे फक्त लेख आवडला एवढेच नाही सांगितले तर तो का आवडला हेही आवर्जून सांगितले.
एका वाचकाने सांगितले, "मँडम, वीस वर्षांपूर्वी माझ्या अंगणात गुलमोहर होता त्याची आज खूप आठवण आली आणि माझे डोळे भरून आलेत. तुम्ही माझ्या गुलमोहरची लेखामुळे भेट घालून दिली." एका लेखकाला यापेक्षा अजून काय हवं असतं. अर्थात पैश्याने आनंद मोजू पाहणाऱ्यांना अशा सात्विक आनंदाची कल्पना कशी काय येणार!
लेखक जेव्हा एखादा लेख लिहतो तेव्हा तो लेख काही आला मनात विचार आणि लिहिला लेख असे होत नाही. काही लेख सुचता क्षणी लिहिले जातात तर काही लेखांची प्रक्रिया ही अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्षे ही मनात रुंजी घालत असतात आणि मग एखादया दिवशी ते लिखित स्वरूपात प्रकट होत असतात. एवढे करुन लेखकाला काय मिळते असा प्रश्न पडणाऱ्या अनेकांना त्याची कल्पना कधीच येत नसते कारण त्यांना फक्त एवढेच माहीत असते की पैसा हेच सर्वस्व होय आणि सारे काही पैश्यातच मोजले जात असते असे समजणाऱ्यांना सात्त्विक आनंदाची कल्पना येणे कसे शक्य असणार!
औरंगाबाद येथील वाचकांनी सांगितले, मँडम, तुम्ही आम्हाला बालपणाची आठवण करून दिली. आम्ही गुलमोहराच्या झाडाखाली खेळायचो पण तुम्ही ज्या पद्धतीने गुलमोहराच्या झाडाकडे पाहिले तसे आम्ही कधीच पाहिले नाही."
नाशिकचे कोरडे यांचा फोन आला असता त्यांनी प्रथम उशिरा फोन केल्यामुळे माफी मागितली आणि सांगितले," मँडम, कोरोनामुळे आमची ड्यूटी चालू आहे नि आता घरी आलो आणि निवांतपणे पेपर वाचत असताना तुमचा लेख वाचण्यात आला. लेख खूपच छान लिहला, दिवसभराचा ड्यूटीवरील तणाव तुमचा लेख वाचून दूर झाला. लेख मनापासून आवडला."
गोविंद पाटील सरांचा फोन आला असता ते म्हणाले,"मँडम, लहानपणीचा गुलमोहर आम्हांला वेगळ्याच विश्वात घेऊन गेला आणि तुम्ही त्याच्याकडे एका वेगळ्या द्रुष्टिकोनातून पाहण्यास शिकविले."
प्रा.युनूस शेख म्हणतात, "मँडम, गुलमोहराची ओळख खूप चांगल्याप्रकारे करून दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद!"
प्रा.युनूस शेख म्हणतात, "मँडम, गुलमोहराची ओळख खूप चांगल्याप्रकारे करून दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद!"
जळगावहून अरुण सपकाळे सर म्हणाले, "मॅडम, तुमच्या लेखातील प्रत्येक गोष्ट एक वेगळा संदेश देऊन जाते. तुम्ही खूपच सुंदर लेख लिहिला आहे. सांगलीहून विशाल पवार लिहितात, "मॅडम, गुलमोहराची फँन्सी ड्रेस स्पर्धा' ही कल्पना खूपच आवडली आणि लेख वाचून बालपण आठवले."
डॉ. आशिष जाधव म्हणाले, "मँडम, तुमचे ललित लेखन खूपच आवडले. ललित लेखन लिहणारे विचारशील क्रुती करणारे असतात. बालपणीचा गुलमोहर वेगळ्या रूपात समोर ठाकला."
पवन रॉय म्हणतात, "मैं हिंदी भाषिक हूँ लेकिन मराठी पढ़ लेता हूँ और समझ भी लेता हूँ। आप ने गुलमोहर के बारे में जो कुछ लिखा, उसे पढ़कर नया संदेस मिला इसलिए धन्यवाद मँम।"
इयत्ता बारावीत शिकणारी आदिती देशपांडे म्हणते, "मँम, तुमचा लेख खूपच छान लिहिला आहे. माझ्या आईला व मला तुमचा लेख खूप आवडला." बारावीत शिकणारी विद्यार्थीनी लेख वाचून प्रतिक्रिया देते तेव्हा आजची पिढी वाचत नाही ,असे म्हणणे चुकीचे ठरते. मुळात आमच्याकडे योग्य पुस्तक योग्य हातात पोचत नाही ही शोकांतिका आहे.

सूरज अंगुले म्हणतात, "मँडम, तुम्ही मला बालपणाची आठवण करून दिली. आम्ही गुलमोहराची फुलेही खायचो. ते सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिलेत. धन्यवाद मँम."
ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले, "मँडम, तुमचा लेख वाचला नि मन जुन्या आठवणीत गुतले. सारे बालपण डोळ्यांसमोर उभे राहिले. गुलमोहराचा संदेश वाचून लक्षात आले की आपण या द्रुष्टीने कधी विचारच केला नाही. खरंच तुमच्या लेखातून खूप शिकायला मिळाले. धन्यवाद मँम."
सध्या नंदुरबार, धुळे येथे कोरोना पेशंटच्या सेवेत गुंतलेले डॉ. संतोष सर म्हणतात, "मँडम, तुमचे लेखन म्हणजे आजच्या तणावग्रस्त जीवनाला तणावमुक्त करणारे आहे. तुमच्यासारख्या लेखकांचे लेखन वाचून आम्ही आमच्यात सुधारणा करीत असतो नि आनंदही घेत असतो. तुमचे लेख मी माझ्या सर्व ग्रुप्सवर शेअर केले आणि सगळ्यांनी अभिनंदन केले आणि धन्यवादही दिलेत. धन्यवाद मँम."
खरंच या सर्व रसिक वाचकांना मी ओळखत नाही परंतु माझे लेखन यांना एक ऊर्जा देते, जगण्याचं बळ देते नि परिस्थितीशी दोन हात करायला शिकविते. सर्वत्र स्वार्थाचा बाजार चालू असताना माझ्या लेखणीने निःस्वार्थ भावाने सेवा करावी नि अनेकांना आनंद द्यावा हेच त्या सर्वव्यापी नियंत्याकडे मागणे करते नि अहंकाराचा वारा न लागो माझ्या लेखणीला, हीच प्रार्थना.

डॉ. संतोष, नंदुरबार
उद् य देशमुख, भडगाव
युनूस शेख एस एन डी.टी कॉलेज
गोविंद पाटील
पवन रॉय, नाशिक
डॉ. आशिष जाधव, जळगाव
ज्ञानेश्वर चौधरीची
सूरज अंगुले
गोपाल महाजन
उद्धव तारख पाटील, जालना
उद्धव तारख पाटील, जालना
विकास पवार
श्रीमती देशपांडे
श्रीमती देशपांडे
आदिती देशपांडे, औरंगाबाद
प्रकाश कोरडे, नाशिक पोलिस
भागवत पाटील
राजेंद्र, उस्मानाबाद
भूषण कुलकर्णी
विशाल पवार
अरूण सपकाळे, जळगाव
केदार रामपुरे, अक्कलकोट
केदार रामपुरे, अक्कलकोट
सर्व वाचकांचे मनापासून आभार! जागतिक पुस्तकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वाचत राहा नि वाचनाचा आनंद घ्या नि ताणतणावापासून दूर राहा, हीच सदिच्छा.
©ज्योत्स्ना पाटील
©ज्योत्स्ना पाटील
माझी आवडती पुस्तके
१) माती, पंख आणि आकाश
२) गेले लिहायचे राहून
३) वाईज अँण्ड अदरवाईज
४) चिपर बाय दी डझन
५) झोंबी
६) आई समजून घेताना
७) सुनंदिनी
८) इडली, ऑर्किड आणि मी
९) बंध अनुबंध
१) माती, पंख आणि आकाश
२) गेले लिहायचे राहून
३) वाईज अँण्ड अदरवाईज
४) चिपर बाय दी डझन
५) झोंबी
६) आई समजून घेताना
७) सुनंदिनी
८) इडली, ऑर्किड आणि मी
९) बंध अनुबंध
Wonderful 😊
ReplyDeleteThank you very much!
Deleteछानच... पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जोस्ना.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद शिवानी!
Deleteतुलाही पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
छानच ज्योत्स्ना तुझे लेख सुंदरच असतात
ReplyDeleteमनापासून धन्यवाद मीना!
Deleteछान
ReplyDelete