धन्यवाद वाचकांनो

नमस्कार रसिक वाचकहो,

मी माझ्या ब्लॉगचे नाव बदलल्यामुळे ब्लॉग बरेच दिवस कार्यरत नव्हता त्याबद्दल नियमितपणे ब्लॉग वाचणाऱ्यांची गैरसोय झाल्याबद्दल क्षमा असावी. आता तर करोनाने सगळ्या जगभर कहर माजविल्यामुळे व सततच्या त्याच त्याच बातम्या ऐकून भीती व नैराश्य या दोन गोष्टींनी सर्वच परेशान झाल्यामुळें हलकंफुलकं आणि जगण्यावर विश्वास ठेवता येईल असे लेखन वाचण्याकडे वाचकांचा कल वाढत आहे त्यामुळे मी माझ्या परीने असे लेखन पुरवून आपली जगण्याविषयीची आसक्ती कशी वाढेल याचा विचार करून लेखन करण्याचा यापुढे प्रयत्न करीन.
आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व!
आपण माझा ब्लॉग वाचून मला लिहण्यास प्रव्रुत्त करतात त्याबद्दल मनापासून जगभरातल्या ब्लॉग वाचकांना धन्यवाद!
    वाचत राहा, मनाला रिफ्रेश करीत राहा, घरात राहण्याचा आनंद स्वतः घ्या आणि आपल्या परिवाराला आनंदित ठेवा. मान-अपमान हे सर्व आपल्या मनाचे नसते खेळ असतात त्याला तिलांजली द्या आणि आजूबाजूचा निसर्ग आपल्या घराच्या खिडकीतून न्याहळा नि निसर्गाकडून नम्रता व देणे या दोन गोष्टी शिकू या नि स्वच्छ मनाने जगू या. काळजी घ्या, स्वस्थ व निरोगी राहा याच शुभेच्छा तुम्हां सर्व वाचकांना.
        धन्यवाद रसिक वाचकांनो!
ब्लॉगर,
ज्योत्स्ना पाटील.

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या